Farooq Shabbir leads MIM through the city center | शहर मध्यमधून एमआयएमचे फारुक शाब्दी आघाडीवर

शहर मध्यमधून एमआयएमचे फारुक शाब्दी आघाडीवर

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर असणाºया प्रणिती शिंदे आता पिछाडीवर गेल्या असून पाचव्या फेरी अखेर एमआयएमचे फारुक शाब्दी यांनी आघाडी घेतली आहे़ पाचव्या फेरीअखेर त्यांना ९ हजार ५२३ इतके मते पडली आहेत.  बार्शीत राजेंद्र राऊत, अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी तर करमाळ्यातून शिवसेनेच्या रश्मी बागल आघाडीवर आहे.

दुसºया क्रमांकावर असणाºया प्रणिती शिंदे यांच्यापेक्षा शाब्दी यांना ४ हजार २९१ ने आघाडीवर आहेत. याच मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले शिवसेनेचे दिलीप माने यांना ३ हजार ४४ तर शिवसेनेतून बंडखोरी केलेले अपक्ष महेश कोठे यांना ५ हजार ३२ मते पडली आहेत.

याशिवाय शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयकुमार देशमुख १३ हजार १ मताने आघाडीवर आहेत़ शिवाय सांगोल्यातून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, बार्शीतून राजेंद्र राऊत १६००, पंढरपुरातून सुधाकरपंत परिचारक ३५८ मतांनी आघाडी घेतली आहे़ 

Web Title: Farooq Shabbir leads MIM through the city center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.