Baramati Election Results 2019: dilip sopal,sachin kalyanshetti,shahajibapu patil, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | सांगोल्यात शहाजीबापू, अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी तर बार्शीत दिलीप सोपल आघाडीवर

सांगोल्यात शहाजीबापू, अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी तर बार्शीत दिलीप सोपल आघाडीवर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीस सुरूवात झाली़ पहिल्या फेरीअखेर सांगोल्यातून शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील, मोहोळमधून शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर, पंढरपूरमधून सुधाकरपंच परिचारक, बार्शीतून दिलीप सोपल तर अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आघाडीवर आहेत.

सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरूवात झाली़ सुरूवातील सर्व्हिस व्होटरच्या पोस्टलची मतमोजणी झाली़ दरम्यान, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख यांनी आघाडी घेतली आहे.

Web Title: Baramati Election Results 2019: dilip sopal,sachin kalyanshetti,shahajibapu patil, Maharashtra vidhan sabha election Results 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.