No one will stop the servants from coming to Konkan: Vinayak Raut | चाकरमान्यांना कोकणात येण्यापासून कोणीही अडवणार नाही : विनायक राऊत

चाकरमान्यांना कोकणात येण्यापासून कोणीही अडवणार नाही : विनायक राऊत

ठळक मुद्देचाकरमान्यांना कोकणात येण्यापासून कोणीही अडवणार नाहीखासदार विनायक राऊत यांचे आश्वासन

कुडाळ : कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कोणीही अडवू शकणार नाही, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याचा कोणताच अधिकार नसून मुंबईत बसून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भाषा करणाऱ्यांनी चाकरमान्यांची काळजी करू नये. आम्ही सक्षम आहोत, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला.


कुडाळ शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी शुक्रवारी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, नगरसेवक सचिन काळप, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, जिल्हा युवा समन्वयक सुशील चिंदरकर, राजू जांभेकर, सुयोग ढवण, राजू गवंडे तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी खासदार राऊत म्हणाले, जिल्हा प्रशासनाने गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाºया चाकरमान्यांबाबत कोणता निर्णय घ्यावा याबाबत प्रत्येक अधिकाºयांकडे माहिती मागविली होती.

त्याबाबतचे इतिवृत्त सर्वत्र जाहीर झाल्यानंतर गणेश चतुर्थी सणासाठी चाकरमान्यांना बंदी करण्यात येणार असल्याची अफवा पसरू लागली. काहींनी तर चाकरमान्यांना येऊ दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भाषा केली आहे.


मात्र, चाकरमानी गणेश चतुर्थीत कोकणात येणे किंवा न येणे याबाबतचा निर्णय हा जिल्हा प्रशासन घेऊ शकत नाही. हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. त्यामुळे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गणेश चतुर्थी सणात कोकणात येणाºया चाकरमान्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी आचारसंहिता बनविली. तसेच त्यांना कमीतकमी दिवसांचे क्वारंटाईन करण्यात यावे. जे चाकरमानी येत असतील त्यांची जिथून येत असतील तेथेच कोविड चाचणी सवलतीच्या दरात करण्यात यावी, अशाप्रकारच्या मागण्या केल्या असून मुख्यमंत्री व राज्य सरकार लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे.


मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाच्या इतिवृत्ताचे भांडवल करून चाकरमान्यांना परवानगी न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा मुंबईत बसून करणाºयांनी चाकरमान्यांची काळजी करू नये. त्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे.

गणेशोत्सव काळात भजने बंद ठेवणे गरजेचे
गणेशोत्सवात भजनांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर्षी तरी भजने बंद ठेवणे गरजेचे आहे. तसेच गणपती जास्तीत सात दिवस ठेवावेत असे आपले मत आहे, असे त्यांनी सांगितले. चाकरमान्यांना गणेश चतुर्थी सण साधण्यासाठी जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

 

Web Title: No one will stop the servants from coming to Konkan: Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.