All religious saints should be vaccinated immediately | Corona vaccine -सर्वधर्मीय साधुसंताना तातडीने लसीकरण करा

गुजराती समाज महासंघाच्या वतीने राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना निवेदन देताना अध्यक्ष राजेंद्र शहा ,तेजपाल शाह आदी

ठळक मुद्देसर्वधर्मीय साधुसंताना तातडीने लसीकरण करागुजराती समाज महासंघाच्या वतीने निवेदन

शिराळा : जैनधर्मीय साधु - साध्वी समुदयासह सर्वधर्मीय साधुसंताना तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना गुजराती समाज महासंघाने केली आहे.

या निवेदनात म्हंटले आहे की , सर्व संसार परित्याग करून साधु धर्माची दिक्षा घेणाऱ्या साधु - साध्वी समुदयाकडे आधार कार्ड कींवा इतर कायदेशीर रहिवासी पुरावा असत नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ठीक ठीकाणी वास्तव्यास असणाऱ्या सर्व धर्मीय साधुसंतासह जैन धर्मीय साधु - साध्वी समुदयाला तातडीने लसीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना लेखी आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. यावेळी आरोग्य राज्य मंत्री राजेन्द्र पाटील यांनी वरील मागणी बाबत एक दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र शाह , राज्य कार्यकारी समितीचे सदस्य तेजपाल शाह , अरविंद मणियार , प्रकाश शाहू , युवराज शाहू , स्वप्निल शाह , रोपन शाह , अक्षय शाह व अक्षय आलासे आदी उपस्थित होते.

Web Title: All religious saints should be vaccinated immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.