Weight Loss : एकदा का वजन वाढलं तर ते कमी करण्यात अनेकांच्या नाकी नऊ येतात. म्हणजे वजन जेवढ्या वेगानं वाढतं, त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ वजन कमी करण्यास लागतो. कारण वजन कमी करणं काही खायचं काम नाही. एक्सरसाईज, डाएट, झोपणं अशा कितीतरी गोष्टी फॉलो कराव्या लागतात. तेव्हा कुठे वजन कमी होतं. पण फक्त वजन कमी करणं अवघड नाही तर त्याहून अवघड कमी झालेलं वजन नियंत्रित ठेवणं आहे. बरेच लोक खूप नको नको त्या गोष्टी करून वजन कमी करतात, पण एक महिन्यांनंतर पुन्हा त्यांचं वजन वाढू लागतं. आता संशोधकांनी याचं मोठं कारण शोधून काढलं आहे. ते म्हणजे मेटाबॉलिक मेमरी.
कमी झालेलं वजन पुन्हा का वाढू लागतं याबाबत करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये उंदीर आणि मनुष्यांचा अभ्यास करण्यात आला. The New England Journal of Medicine मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, यात आढळून आलं की, वजन कमी झालं, पण त्यांच्या शरीरातील फॅट सेल्समध्ये सूज आणि गडबड राहते. मनुष्यांमध्येही असंच काही आढळून आलं. वजन कमी झाल्यावर 2 वर्षानी सुद्धा फॅट सेल्स अॅक्विट राहतात.
याचा अर्थ असा होतो की, आपल्या शरीरारत फॅट सेल्सना 'जाड' राहण्याची सव पडलेली असते. त्यामुळे आपण कमी केलेलं वजन पुन्हा काही महिन्यांनी हळूहळू वाढू लागतं. या शोधातून हे स्पष्ट झालं आहे की, केवळ डाएट आणि एक्सरसाईज करून काही होणार नाही. अशात काहीतरी मोठं प्लॅनिंग करण्याची गरज आहे जेणेकरून मेटाबॉलिक मेमरीवर लक्ष देता येईल.
मेटाबॉलिक मेमरी म्हणजे काय?
जेव्हा आपण लठ्ठ असतो तेव्हा आपल्या शरीरातील फॅट सेल्स एक 'मेमरी' तयार करतात. त्यामुळे वजन कमी झाल्यावरही या सेल्स आपल्या जुन्या सवयी विसरत नाही. जसे की, सूज किंवा फॅट स्टोर करणं. याच कारणानं शरीराचं पुन्हा वजन वाढू लागतं.
फॅट सेल्सची भूमिका
बरेच लोक असा विचार करतात की, फॅट सेल्स शरीरात फक्त चरबी जमा करतात. पण तसं नाहीये. हे फॅट सेल्स हार्मोन बनवतात आणि मेटाबॉलिज्मही कंट्रोल करतात. त्यामुळे जेव्हा वजन कमी होतं, तेव्हाही सेल्स पूर्णपणे शांत होत नाहीत आणि हळूहळू पुन्हा अॅक्टिव होतात.
वजन कंट्रोल कसं ठेवाल?
एकदा वजन कमी झाल्यानंतर वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही महिन्यांची डाएट किंवा एक्सरसाईज पुरेसा नाही. यासाठी वेगळा प्लान करावा लागेल.
-हेल्दी रूटीन
- पुरेशी झोप घेणे
-स्ट्रेस कंट्रोल करा
- हळूहळू लाइफस्टाईल बॅलन्स ठेवा
- मेटाबॉलिक मेमरी समजून प्लान करा
वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी वरील गोष्टी करण्यासोबतच तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं टाळावं लागेल. खाण्याबाबत खूप काळजी घ्यावी लागेल. तरच तुम्ही कमी झालेलं वजन कंट्रोल ठेवू शकता.