तांदूळ (Rice)हा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. पण आरोग्याच्या दृष्टीनं प्रत्येक तांदळाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. आहारतज्त्र सांगतात की केवळ चवीसाठी नाही तर शरीराच्या गरजेनुसार तांदळाची निवड करावी. कोणत त्रास असलेल्यांनी कोणता भात खावा ते समजून घेऊ. (Which rice do you use for rice Kolam)
इंद्रायणी तांदूळ
इंद्रायणी तांदूळ हा अत्यंत सुवासिक आणि चिकट असतो. हा तांदूळ पचायला थोडा जड असू शकतो. ज्यामुळे वारंवार अपचन किंवा गॅसेसचा त्रास हतो. त्यांनी तांदूळ कमी प्रमाणात खावा किंवा तो चांगला शिजवून खावा. मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा लहान मुलांच्या पोषणासाठी हा तांदूळ उत्तम ऊर्जा देणारा स्त्रोत मानला जातो. इंद्रायणी तांदळाचा मऊ भात लहान मुलं आणि वृद्धांसाठी पौष्टीक ठरू शकतो.
कोलम तांदूळ
कोलम तांदूळ हा मध्यम आकाराचा आणि चवीला हलका असतो. ज्यांना नियमितपणे साधे आणि संतुलित जेवण हवे असते. त्यांच्यासाठी कोलम हा एक सुरक्षित पर्याय आहे. हा तांदूळ पचायला सुलभ असल्यानं त्यांना वारंवार पोटाच्या तक्रारी जाणवतात. त्यांच्यासाठी डॉक्टरांकडून कोलम राईस खाण्याचा सल्ला दिला जातो.
आंबे मोहोर
ज्यांना वारंवार पचनाच्या समस्या उद्भवतात त्यांच्यासाठी आंबेमोहोर हा एक रिमेडी म्हणून काम करतो. हा तांदूळ पोटावर ताण पडू न देता सहज पचतो. आयुर्वेदानुसार देखील हा तांदूळ शरीराला थंडावा देणारा मानला जातो.
हा तांदूळ केवळ आरोग्यासाठीच नाही तर चवीसाठीही ओळखला जातो. सणवाराला पुरणपोळीसोबत लागणारा कटाची आमटी भात किंवा मसालेभात करण्यासाटी आंबेमोहोर वापरला जातो. ज्यांना जेवणात नैसर्गिक सुगंध आवडतो. त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
रेड राईस किंवा ब्राऊन राईस कोणी खावा?
प्रामुख्यानं ज्यांना मधुमेह किंवा रक्तातील साखर वाढण्याचा त्रास आहे. त्यांनी पांढरा पॉलिश केलेला तांदूळ टाळून रेड राईस किंवा ब्राऊन राईस खावा. लाल तांदळामध्ये एंथोसायनिन नावाचे एंटी ऑक्सिडेंट्स असतात आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे साखर झपाट्यानं वाढत नाही. तसंच हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी लाल तांदूळ फायदेशीर ठरतो. कारण तो कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
