विशीच्या आत डोक्यावर चमकतात पांढरे केस भरमसाठ? ‘या’ पद्धतीने आवळा वापरा-एकेक केस होईल काळाभोर

Updated:January 13, 2026 19:19 IST2026-01-13T11:30:17+5:302026-01-13T19:19:43+5:30

विशीच्या आत डोक्यावर चमकतात पांढरे केस भरमसाठ? ‘या’ पद्धतीने आवळा वापरा-एकेक केस होईल काळाभोर

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूपच वाढली आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांचे केसही हल्ली पांढरे झाले असून त्यांना ते नियमितपणे रंगवावे लागत आहेत.

विशीच्या आत डोक्यावर चमकतात पांढरे केस भरमसाठ? ‘या’ पद्धतीने आवळा वापरा-एकेक केस होईल काळाभोर

अशा लोकांसाठी आवळा खूप जास्त उपयुक्त ठरतो. कारण आवळ्यामध्ये असणारे काही घटक केसांचा काळेपणा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात (use of amla to get rid of white hair). त्यासाठी आवळा कशा पद्धतीने वापरावा याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ sys_power_yoga या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.(how to use amla for black hair?)

विशीच्या आत डोक्यावर चमकतात पांढरे केस भरमसाठ? ‘या’ पद्धतीने आवळा वापरा-एकेक केस होईल काळाभोर

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ३ ते ४ ताजे आवळे घ्या. त्यांच्यामधल्या बिया काढून टाका आणि आवळ्याचे बारीक तुकडे करा.(home hacks to reduce gray hair)

विशीच्या आत डोक्यावर चमकतात पांढरे केस भरमसाठ? ‘या’ पद्धतीने आवळा वापरा-एकेक केस होईल काळाभोर

यानंतर आवळ्याच्या तुकड्यांमध्येच ५ ते ६ मिरे आणि ८ ते १० कडिपत्त्याची पानं घाला.

विशीच्या आत डोक्यावर चमकतात पांढरे केस भरमसाठ? ‘या’ पद्धतीने आवळा वापरा-एकेक केस होईल काळाभोर

त्यातच आल्याचा छोटासा तुकडा आणि थोडंसं काळं मीठ घाला. हे सगळे पदार्थ ग्लासभर पाणी घालून मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या आणि त्यानंतर ते पाणी गाळून घ्या.

विशीच्या आत डोक्यावर चमकतात पांढरे केस भरमसाठ? ‘या’ पद्धतीने आवळा वापरा-एकेक केस होईल काळाभोर

हे पाणी सलग ८ दिवस सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी प्या. दर १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा. केसांमध्ये खूप छान बदल दिसून येईल. अकाली केस पांढरे होणं बऱ्याच प्रमाणात कमी होईल.