lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > What to do after eating too much : झरझर वजन कमी होण्यासह डायबिटीसही कंट्रोलमध्ये राहिल; फक्त जेवल्यानंतर १ काम करा

What to do after eating too much : झरझर वजन कमी होण्यासह डायबिटीसही कंट्रोलमध्ये राहिल; फक्त जेवल्यानंतर १ काम करा

What to do after eating too much : अन्नाची क्वालिटी आणि क्वान्टीटी काय आहे, जेवणाची वेळ आणि अन्नामध्ये असलेली पोषकतत्त्वे इत्यादी गोष्टी तुमच्या निरोगी राहण्याच्या प्रयत्नांना मदत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 06:41 PM2021-11-12T18:41:33+5:302021-11-12T19:02:25+5:30

What to do after eating too much : अन्नाची क्वालिटी आणि क्वान्टीटी काय आहे, जेवणाची वेळ आणि अन्नामध्ये असलेली पोषकतत्त्वे इत्यादी गोष्टी तुमच्या निरोगी राहण्याच्या प्रयत्नांना मदत करतात.

What to do after eating too much : Walking light exercise after eating must do | What to do after eating too much : झरझर वजन कमी होण्यासह डायबिटीसही कंट्रोलमध्ये राहिल; फक्त जेवल्यानंतर १ काम करा

What to do after eating too much : झरझर वजन कमी होण्यासह डायबिटीसही कंट्रोलमध्ये राहिल; फक्त जेवल्यानंतर १ काम करा

आपल्या शरीराला अन्नाची म्हणजे वाढीसाठी पोषक तत्वांची गरज असते. निरोगी शरीरासाठी निरोगी आहार (Balance Diet) महत्त्वाचा आहे. पण नुसते चांगले  खाल्ल्याने तुमचे शरीर तंदुरुस्त राहील याची शाश्वती नाही. यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ, तुमचा आहार काय आहे, अन्नाची क्वालिटी आणि क्वान्टीटी काय आहे, जेवणाची वेळ आणि अन्नामध्ये असलेली पोषकतत्त्वे इत्यादी गोष्टी तुमच्या निरोगी राहण्याच्या प्रयत्नांना मदत करतात. (Walking light exercise after eating must do)

जेव्हा वजन नियंत्रणात ठेवायचे असते (Weight Loss Tips) तेव्हा काही लोक गोंधळतात. अशा लोकांना चांगला आहार आणि व्यायाम दोन्ही हवे असतात. पण व्यस्त जीवनशैलीमुळे जेवणाच्या वेळा चुकतात तर कधी व्यायामाला वेळ मिळत नाही. दररोज एक साधी दिनचर्या फॉलो करून तुम्ही तुमचे वाढते वजन नियंत्रित करू शकता. जेवणानंतर फेरफटका मारणे हा असाच एक नित्यक्रम मानला जातो. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहतेच पण डायबिटीक (Diabetes Care Tips) रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

रिसर्च काय सांगतात?

काही अभ्यास सांगतात की जेवणानंतर किमान १५ मिनिटे चालणे देखील तुमच्या उच्च रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवू शकते. विशेषत: ज्यांना टाइप 2 मधुमेह आहे. घराच्या टेरेस, पायऱ्या, हॉल किंवा लॉनवर चालता येते. असे म्हटले जाते की रक्तातील साखरेची पातळी वाढणे हे देखील लोकांचे वजन झपाट्याने वाढण्याचे एक कारण आहे. तथापि, साखरेचे प्रमाण वाढणे शरीरासाठी चांगले नाही. (Walk exercise rules )

दूध कितीही उकळलं तरी उतू जाणार नाही; व्हायरल होतेय भन्नाट ट्रिक; पाहा व्हिडीओ

जेवल्यानंतर चालल्यानं काय होते? (Benefits of walking)

जेव्हा तुम्ही थोडावेळ चालता. तेव्हा तुम्ही अन्न पचनमार्गातून सहजतेने जाऊ देता आणि पचन प्रक्रियेला गती देतो. हे पोटाच्या किंवा पचना समस्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या होत नाही. आळस येत नाही. आपली आतडेही निरोगी राहतात.

किती वेळ चालायला हवं?

आपण दररोज किमान 10-15 मिनिटे चालले पाहिजे आणि आपल्याकडे वेळ असल्यास, आपण वेळ मर्यादा देखील वाढवू शकता. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जेवल्यानंतर तासाभरात चालत जावे लागते. आणि तुम्ही अगदी घरामध्ये फिरू शकता. न चालण्यापेक्षा तुम्ही घराच्या छोट्या भागातही फिरू शकता. 

चालताना या गोष्टींची काळजी घ्या 

जेवणानंतर चालताना गती मंद असावी कारण जलद गतीने चालणे तुमची पचन प्रक्रिया खराब करू शकते. म्हणजेच, जेवणानंतर तुम्हाला धावण्याची किंवा कोणतीही कठोर कसरत करण्याची गरज नाही. तुम्हाला वजन कमी करण्यात खरोखरच स्वारस्य असल्यास, जेवणानंतर फक्त चालण्याने काही फायदा होणार नाही. याव्यतिरिक्त, काय खाता आणि किती खाता याकडेही लक्ष दिले पाहिजे.  शक्य असल्यास, आठवड्यातून किमान पाच वेळा जेवणानंतर 30 मिनिटे चाला.

Web Title: What to do after eating too much : Walking light exercise after eating must do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.