Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > विद्या बालन करते 'नो रॉ फूड' डाएट, हे डाएट नेमकं आहे तरी काय ?

विद्या बालन करते 'नो रॉ फूड' डाएट, हे डाएट नेमकं आहे तरी काय ?

Vidya Balan Says She Follows 'No Raw' Food, Gluten Free Diet : अभिनेत्री विद्या बालनने अलीकडेच सांगितले की ती 'नो रॉ फूड डाएट' फॉलो करते, डाएटचा हा नवीन ट्रेंड कोणता ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2024 01:03 PM2024-06-15T13:03:36+5:302024-06-15T13:21:19+5:30

Vidya Balan Says She Follows 'No Raw' Food, Gluten Free Diet : अभिनेत्री विद्या बालनने अलीकडेच सांगितले की ती 'नो रॉ फूड डाएट' फॉलो करते, डाएटचा हा नवीन ट्रेंड कोणता ते पाहूयात...

Vidya Balan follows a ‘no raw’ food diet Vidya Balan Says She Follows 'No Raw' Food, Gluten Free Diet Vidya Balan Follows A 'No Raw' Food Lifestyle | विद्या बालन करते 'नो रॉ फूड' डाएट, हे डाएट नेमकं आहे तरी काय ?

विद्या बालन करते 'नो रॉ फूड' डाएट, हे डाएट नेमकं आहे तरी काय ?

वाढलेलं वजन, चेहेऱ्यावर चब्बीनेस, सुडौल बांधा नाही यामुळे बॉलिवूडमध्ये ट्रोल झालेली अभिनेत्री म्हणजे (Vidya Balan) विद्या बालन. आजवर विद्याने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये काही हिट चित्रपट केले, परंतु तिच्या जाडेपणामुळे तिला भरपूर नाव ठेवण्यात आली. विद्या बालन लहानपणापासूनच जाडजूड, गुबगुबीत होती तिच्या या जाडेपणामुळे तिला अनेकांची बोलणी व टिका सहन कराव्या लागत होत्या. सध्याच्या या झिरो फिगरच्या ट्रेंडमध्ये एखादी अभिनेत्री अंगाने जाडजूड असेल तर तिला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो हे सांगता येत नाही(Vidya Balan Follows A 'No Raw' Food Lifestyle). 

वजन वाढल्यावर ते कमी करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आपल्याला वाटत असेल की हे केवळ सामान्य लोकांसाठीच आहे तर तसे नाही. अनेक सेलिब्रिटींनाही याचा सामना करावा लागला आहे. बदलत्या काळानुसार डाएटचे ट्रेंडही बदलत असतात. नुकतेच विद्या बालनने तिच्या एका मुलाखतीमध्ये ती 'नो रॉ फूड' डाएट फॉलो करत असल्याचे सांगितले आहे. दिल्लीतील भाग्य आयुर्वेदा क्लिनिकच्या डाएटिशियन पूजा सिंह (Pooja Singh, Dietician, Bhagya Ayurveda, Delhi) यांनी 'नो रॉ फूड' डाएट बद्दल अधिक माहिती दिली आहे. हे नेमकं कोणत्या प्रकारचं डाएट आहे ? यात काय खाल्लं जात याविषयी अधिक माहिती घेऊयात(Vidya Balan follows a ‘no raw’ food diet). 

१. 'नो रॉ फूड' डाएट म्हणजे नेमकं काय ?

या डाएटच्या नावाप्रमाणेच यात रॉ म्हणजे कच्चे अन्नपदार्थ खाणे टाळले जाते. विद्या सांगते या डाएटमध्ये ती, ग्लूटेन फ्री व कच्चे अन्नपदार्थ खाणे संपूर्णपणे टाळते. ज्याचा चांगला परिणाम तिच्या तब्येतीमध्ये पाहायला मिळतो. 'नो रॉ फूड डाएट' मध्ये कच्चे अन्नपदार्थ खाल्ले जात नाहीत, याउलट फक्त शिजवलेले, वाफवलेले किंवा उकडलेले अन्नपदार्थ खाण्यावर जास्त भर दिला जातो. या डाएट प्रकारामध्ये, भाज्या, फळे, मांस आणि दुग्धजन्य पदार्थ हे कच्चे न खाता व्यवस्थित शिजवून मगच खाल्ले जातात.  

येताजाता गारेगार बर्फ खाण्याची इच्छा होते ? बर्फ खाण्याचा हा आजार म्हणजे शरीरात ‘ही’ कमतरता... 

'नो रॉ फूड' डाएट चे फायदे :-

१. जर तुम्ही शिजवलेले अन्न खाल्ले तर त्यामुळे बॅक्टेरिया आणि जंतूसंबंधित आजारांचा धोका कमी होतो. कारण शिजवलेल्या अन्नामधील हानिकारक जीवाणू नष्ट होतात. जेव्हा कच्चे पदार्थ हाय फ्लेमवर शिजवले जातात तेव्हा त्यातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात. विशेषतः, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि मांसमध्ये सर्वात हानिकारक जीवाणू असू शकतात. अशा परिस्थितीत असे पदार्थ शिजवल्यानंतरच खाल्ल्याने शरीराला फायदा होतो.

२. शिजवून घेतलेले अन्न सामान्यतः अधिक पचण्यायोग्य असते, त्यामुळे पचनसंस्थेला फारसे कष्ट करावे लागत नाहीत. शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे  पचनाच्या समस्या कमी होतात. शिजवलेले अन्न पोषक तत्वांचे शोषण सुधारते, ज्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.

लिंबू पाणी की ऍपल सायडर व्हिनेगर ? वजन कमी करण्यासाठी काय प्यावे ? आहारतज्ज्ञ सांगतात....

३. कोणताही कच्चा आहार शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करत नाही, त्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ लघवी आणि मलमार्गे बाहेर पडतात. असे अन्न खाल्ल्याने वजन नियंत्रित करणे देखील सोपे होते.

४. काही भाज्या अशा आहेत ज्यामध्ये असलेले घटक शिजवल्यानंतरच शरीरात योग्यरीत्या शोषले जातात. यासोबतच शिजवलेल्या अन्नामध्ये जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि रोगांपासून आपले रक्षण करतात.

५. ज्या पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, ते शिजवल्यानंतरच खाणे शरीरासाठी चांगले असते. शिजवलेले असताना प्रथिने शरीराद्वारे सहजपणे शोषले जाऊ शकतात.

६. शिजवलेले अन्न खाल्ल्याने मानसिक आरोग्य देखील सुधारते, त्याचा सुगंध आणि चव यांचा मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यामुळेच जेवण जेवल्यानंतर आपल्याला बरे वाटते.

७. आधीच शिजवलेले अन्न पचवण्यासाठी शरीराला कमी ऊर्जा लागते, त्यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत.यामुळे शारीरिक थकवा कमी होतो.  

Web Title: Vidya Balan follows a ‘no raw’ food diet Vidya Balan Says She Follows 'No Raw' Food, Gluten Free Diet Vidya Balan Follows A 'No Raw' Food Lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.