Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > येताजाता गारेगार बर्फ खाण्याची इच्छा होते ? बर्फ खाण्याचा हा आजार म्हणजे शरीरात ‘ही’ कमतरता...

येताजाता गारेगार बर्फ खाण्याची इच्छा होते ? बर्फ खाण्याचा हा आजार म्हणजे शरीरात ‘ही’ कमतरता...

Why You Might Be Craving Ice Cubes : Craving ice can be a symptom of an iron deficiency : आपल्याला अचानक बर्फ खावासा वाटू लागतो कारण, आहारतज्ज्ञ सांगतात समस्या नक्की काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2024 05:10 PM2024-06-14T17:10:26+5:302024-06-14T17:26:54+5:30

Why You Might Be Craving Ice Cubes : Craving ice can be a symptom of an iron deficiency : आपल्याला अचानक बर्फ खावासा वाटू लागतो कारण, आहारतज्ज्ञ सांगतात समस्या नक्की काय

Craving ice can be a symptom of an iron deficiency Why You Might Be Craving Ice Cubes | येताजाता गारेगार बर्फ खाण्याची इच्छा होते ? बर्फ खाण्याचा हा आजार म्हणजे शरीरात ‘ही’ कमतरता...

येताजाता गारेगार बर्फ खाण्याची इच्छा होते ? बर्फ खाण्याचा हा आजार म्हणजे शरीरात ‘ही’ कमतरता...

आपल्याला काहीवेळा एखादा पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. अशावेळी आपण तो पदार्थ जोपर्यंत खात नाही तोपर्यंत आपल्याला त्या पदार्थांचे विचार डोक्यात येतात. एवढंच नाही तर डोळ्यांसमोरही तो पदार्थ दिसू लागतो, याला 'फूड क्रेविंग्स' म्हणतात. 'फूड क्रेविंग्स' कधीही आणि कोणालाही येऊ शकतात. काहीजणांना फ्रिजमधील थंड बर्फाचा खडा खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी फ्रिजरमध्ये साचलेला फ्रोजन बर्फ किंवा ट्रे मध्ये ठेवलेला बर्फाचा खडा काढून तो चक्क दातांनी चावून (What is craving ice a symptom of) खाल्ला जातो. जर आपल्याला देखील अशी सारखं बर्फ खाण्याची इच्छा होत असेल तर आपल्याला 'पॅगोफेजिया' झाला असण्याची शक्यता आहे(What causes a craving for ice?). 

दीपशिखा जैन या न्यूट्रिशनिस्टने इंस्टग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या आजाराबद्दलची माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये दीपशिखा बर्फ खाण्याच्या क्रेविंग्स (what causes ice craving pagophagia meaning iron deficiency how to get rid of iron deficiency) बद्दल सांगत आहे. बर्फ खाणे (Why You Might Be Craving Ice Cubes) हे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. वारंवार बर्फ खाल्ल्याने (Craving ice can be a symptom of an iron deficiency) त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात. आपल्याला बर्फ खाण्याचे असे क्रेविंग्स का होतात, ते होऊ नये म्हणून नेमकं काय करावं याबद्दल न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी अधिक माहिती दिली आहे(If You're Suddenly Craving Ice, Here's What Your Body Is Trying To Tell You).

१. बर्फ खाण्याचे क्रेविंग्स का होतात ? 

न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सांगते, आपल्या शरीरात असणाऱ्या लोहाच्या कमतरतेमुळे आपल्याला बर्फ खाण्याचे क्रेविंग्स वारंवार होतात. अशावेळी त्या व्यक्तीला बर्फाचा खडा किंवा फ्रिजरमध्ये साचलेला बर्फ खाण्याची अधिक इच्छा होते.  


२. बर्फ खाण्याचे क्रेविंग्स येऊ नयेत यासाठी काय करावे ? 

न्यूट्रिशनिस्टच्या सांगण्यानुसार, आपल्या शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढली तर असे बर्फ खाण्याचे क्रेविंग्स येत नाहीत. यासाठी आपल्याला रोजच्या जेवणात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. शरीरातील लोहाची कमी भरुन काढल्यास असे क्रेविंग्स होत नाहीत. 

३. लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी कोणते पदार्थ खावेत ? 

आपल्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त पदार्थांचा समावेश रोजच्या जेवणात केला पाहिजे. यात पालक, रताळ, मटार, ब्रोकोली, केळी, स्ट्रॉबेरी, ड्रायफ्रूट्स,टरबूज, अंजीर, पीच, खजूर, अक्रोड असे पदार्थ खाऊ शकता. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, ओट्स, टोफू, गव्हाचा ब्रेड, टोमॅटो असे लोहयुक्त पदार्थ खाऊन आपण शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढू शकता. यामुळे आपल्याला बर्फ खाण्याचे क्रेविंग्स येणार नाहीत.

Web Title: Craving ice can be a symptom of an iron deficiency Why You Might Be Craving Ice Cubes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.