Lokmat Sakhi >Fitness > लिंबू पाणी की ऍपल सायडर व्हिनेगर ? वजन कमी करण्यासाठी काय प्यावे ? आहारतज्ज्ञ सांगतात....

लिंबू पाणी की ऍपल सायडर व्हिनेगर ? वजन कमी करण्यासाठी काय प्यावे ? आहारतज्ज्ञ सांगतात....

Which is better for weight loss, apple cider vinegar or lemon juice ? : ऍपल सायडर व्हिनेगर किंवा लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी या दोघांपैकी नेमकं काय प्यावं ? बघा आहारतज्ज्ञ काय सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2024 03:56 PM2024-06-14T15:56:18+5:302024-06-14T16:05:20+5:30

Which is better for weight loss, apple cider vinegar or lemon juice ? : ऍपल सायडर व्हिनेगर किंवा लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी या दोघांपैकी नेमकं काय प्यावं ? बघा आहारतज्ज्ञ काय सांगतात...

Which is better for weight loss, apple cider vinegar or lemon juice reasons why you should choose lemon over Apple Cider Vinegar | लिंबू पाणी की ऍपल सायडर व्हिनेगर ? वजन कमी करण्यासाठी काय प्यावे ? आहारतज्ज्ञ सांगतात....

लिंबू पाणी की ऍपल सायडर व्हिनेगर ? वजन कमी करण्यासाठी काय प्यावे ? आहारतज्ज्ञ सांगतात....

बदलत्या लाईफस्टाइलमुळे वजन वाढणे ही एक कॉमन समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी सगळेच डाएट आणि एक्सरसाइजची मदत घेतात. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण विविध उपाय करतात. दररोज एक्सरसाइज व योग्य डाएट केल्याने वजन सहजपणे नियंत्रणात ठेवता येते. असे असले तरीही सगळ्यांनाच झटपट आणि फारशी मेहेनत न घेता लगेच काही दिवसांत वजन कमी झाले पाहिजे अशी इच्छा असते(Apple Cider Vinegar & Lemon Juice for Weight Loss).

यासाठी एक्सरसाइज आणि डाएटसोबतच अनेक पर्यायांचा वापर केला जातो. जसे की, गरम पाणी पिणे, डिटॉक्स वॉटर, आल्याचे पाणी, ओव्याचे पाणी, रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे , ऍपल सायडर व्हिनेगर पाण्यात (Apple Cider Vinegar and Lemon Juice Drink) घालून पिणे. असे एक ना हजार पर्याय आजमावून पाहिले जातात. खरंतर, वजन कमी करण्यास लिंबू पाणी, ऍपल सायडर व्हिनेगर हे दोन्ही उपयुक्त ठरतात. परंतु या दोघांपैकी नेमकं काय आपल्या शरीरासाठी चांगलं आहे ? हे आहारतज्ज्ञांकडून समजून घेऊयात(Which is better for weight loss, apple cider vinegar or lemon juice).  

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी घ्यावे की ऍपल सायडर व्हिनेगर ? 

ऍपल सायडर व्हिनेगर किंवा लिंबू पाणी दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे दररोज प्यायल्याने केवळ वजन कमी होण्यासच मदत होत नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. नोएडास्थित डॉ. व्ही.डी. त्रिपाठी या क्लिनिकल आहारतज्ज्ञांच्यानुसार "वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि रोज एक्सरसाइज करणे महत्त्वाचे असते. ऍपल सायडर व्हिनेगर किंवा लिंबू पाणी रोज घेतल्याने वजन कमी करण्यास फक्त मदत होते. याच्याबरोबर योग्य डाएट आणि आपल्या लाईफस्टाईलकडे देखील तितकेच लक्ष दिले पाहिजे." याउलट परंतु जर आपण वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज न करता फक्त ऍपल सायडर व्हिनेगर किंवा लिंबू पाणी पीत असाल तर त्याने वजन कमी होणार नाही.   

व्यायामानंतर दणकून भूक लागते म्हणून वाट्टेल ते खाता? वाढेल वजन, बघा व्यायामानंतर काय खायचं...

ऍपल सायडर व्हिनेगर :- ऍसिटिक ऍसिड नावाचा घटक ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये असतो. हा घटक शरीरातील लोहाची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो असे मानले जाते. रक्तातील साखरेचे नियंत्रण भूक कमी करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. असे असले तरीही ऍपल सायडर व्हिनेगर एका संतुलित प्रमाणात पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ऍपल सायडर व्हिनेगर अधिक प्रमाणात घेतल्यास दात आणि पचनसंस्थेवर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. 

चक्रासन करताना हमखास होणाऱ्या ४ चुका टाळा, मिळतील अनेक फायदे.... 

लिंबू पाणी :- लिंबू पाण्यात आढळणारे व्हिटॅमिन 'सी' चयापचय क्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, लिंबू पाणी पिण्यामुळे हायड्रेशन वाढते, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, केवळ लिंबू पाणी वजन कमी करू शकत नाही. तसेच यामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड दातांच्या इनॅमलला नुकसान पोहोचवू शकते.

लिंबू पाणी पिणे आहे अधिक फायदेशीर :- 

लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लिंबात असलेले आरोग्यवर्धक गुणधर्म शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि  वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. परंतु लिंबू पाणी प्यायल्यानंतरही वजन कमी होत नसल्याची अनेकांची तक्रार असते. अशा परिस्थितीत तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लिंबू पाणी प्यावे. लिंबू पाणी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर असते. लिंबू पाणी रोज प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्सही बाहेर पडतात. लिंबू पाणी योग्य प्रमाणात रोज प्यायल्याने शरीरातील अंतर्गत अवयव निरोगी राहण्यास मदत होते. परंतु वजन कमी करण्यासाठी लिंबू पाण्याचे योग्य वेळी सेवन करणे फायदेशीर ठरते.

Web Title: Which is better for weight loss, apple cider vinegar or lemon juice reasons why you should choose lemon over Apple Cider Vinegar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.