Lokmat Sakhi >Fitness > चक्रासनाने तब्येत कायमची ठणठणीत होते, पण ४ चुका टाळा- नाहीतर पाठीचे दुखणे जन्मभर छळेल

चक्रासनाने तब्येत कायमची ठणठणीत होते, पण ४ चुका टाळा- नाहीतर पाठीचे दुखणे जन्मभर छळेल

Do You Make These Mistakes In Wheel Pose ? : चक्रासन आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु ते करताना दुखापत होऊ नये म्हणून नेमकी कोणती खबरदारी घ्यावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 06:30 PM2024-06-11T18:30:54+5:302024-06-12T16:07:36+5:30

Do You Make These Mistakes In Wheel Pose ? : चक्रासन आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु ते करताना दुखापत होऊ नये म्हणून नेमकी कोणती खबरदारी घ्यावी...

Common mistakes in wheel pose do you make these mistakes in wheel pose | चक्रासनाने तब्येत कायमची ठणठणीत होते, पण ४ चुका टाळा- नाहीतर पाठीचे दुखणे जन्मभर छळेल

चक्रासनाने तब्येत कायमची ठणठणीत होते, पण ४ चुका टाळा- नाहीतर पाठीचे दुखणे जन्मभर छळेल

बहुतेक लोकांनी योगाला आपल्या रोजच्या रुटीनचा एक अविभाज्य भागच बनविले आहे. योगामुळे रोजच्या जीवनातील तणाव आणि सर्व प्रकारच्या शारीरिक अडचणी कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून योगा केल्याने दिवसभर आपण फ्रेश राहतो. वेगवेगळ्या प्रकारची योगासन करण्याचे फायदेही भरपूर असतात. दररोज योगा केल्याने व्यक्ती दीर्घकाळ स्वस्थ व निरोगी राहू शकतो. यासाठीच भारतीयांबरोबरच पाश्चिमात्य देशांनी देखील योग साधनेचा स्वीकार केल्याचेही दिसून येते(What are the common mistakes in Chakrasana?)

योगा करत असताना आपण अनेक प्रकारच्या आसनांचा सराव करतो. या आसनांमध्ये 'चक्रासन' हे देखील महत्वाचे आसन आहे. ही अशी मुद्रा आहे ज्यामध्ये शरीर चाकासारखे दिसते आणि म्हणूनच त्याला 'व्हील पोझ' (Wheel Pose) असेही म्हणतात. हे आसन करणे थोडे कठीण असल्याने, बहुतेक लोक याचा सराव करताना काही (Do You Make These Mistakes In Wheel Pose?) छोट्या चुका करतात. या छोट्या चुकांमुळे त्यांना दुखापत होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. या छोट्या चुका नेमक्या कोणत्या ? त्या कशा टाळायच्या याबद्दल ब्लॉसम योगाचे संस्थापक आणि योगतज्ज्ञ जितेंद्र कौशिक अधिक माहिती सांगत आहेत. चक्रासनाचा सराव करताना हमखास होणाऱ्या चुका कोणत्या ते पाहुयात(4 common mistakes in wheel pose).

चक्रासन करताना नेमक्या कोणत्या चुका करु नयेत ? 

चूक १ : योगा करण्याआधी वॉर्मअपकडे दुर्लक्ष करणे. 

चक्रासन हे एक असे आसन आहे, जे इतर आसनांपेक्षा करायला तुलनेने थोडे अवघड आहे. त्याचबरोबर हे आसन करताना शरीराचा मागचा भाग बॅक बेंड होतो. त्यामुळे हे आसन करायच्या आधी वॉर्मअप करणे गरजेचे आहे. परंतु काहीजण वॉर्मअप न करताच हे आसन करतात, यामुळे स्नायूंवर ताण किंवा दुखापत होण्याची शक्यता वाढते. एवढेच नव्हे तर यामुळे आपल्या सांध्यांना देखील इजा पोहोचू शकते. याचबरोबर कंबरेची दुखापत किंवा खांद्याला इजा होण्याची शक्यता असते. 

चूक २ : पाठ मागे झुकवताना ती चुकीच्या पद्धतीने झुकवणे. 

चक्रासन करताना पाठ योग्य प्रकारे उचलली पाहिजे, नाहीतर पाठीला इजा होऊ शकते. काहीजण त्यांची कंबर जास्त स्ट्रेच करतात, तर काहींची कंबर जमिनीच्या दिशेने जास्त झुकलेली असते. या दोन्ही चुकांमुळे पाठीच्या कण्यावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत, पाठदुखी किंवा मणक्याशी संबंधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात.    

चूक ३ : चक्रासन करताना श्वास रोखून धरणे. 

चक्रासनाचा सराव करणे आणि ते आसन करत असताना स्वत:ला सांभाळणे थोडे अवघड असते. चक्रासन करताना काहीजण श्वास रोखून धरतात. श्वास रोखून धरणे हे चुकीचे आहे. हे आसन करताना श्वास रोखून धरल्यास शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते. चक्रासन करताना दीर्घकाळ श्वास रोखून धरल्याने अनेकवेळा रक्तदाब वाढतो. काहीवेळा श्वास रोखून धरल्याने चक्कर येऊ शकते. 

चूक ४ : सामान्य स्थितीत येताना झटकन परत येणे. 

चक्रासन करताना बरेचजण ही चूक नेहमी करतात. जेव्हा आपण चक्रासनाचा सराव करतो तेव्हा कंबर मागच्या दिशेने झुकवत पाठ मागे नेतो. या स्थितीत येताना काहीजण अचानक कंबर उचलतात किंवा सुरुवातीच्या स्थितीत परत येताना झटक्याने खाली येतात. असे करणे आपल्या शारीरिकदृष्ट्या योग्य मानले जात नाही. यामुळे कंबर व पाठीच्या कण्याला इजा होण्याची शक्यता असते.

Web Title: Common mistakes in wheel pose do you make these mistakes in wheel pose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.