प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्याच्या इतर समस्या टाळण्यासाठी हळदीचं दूध पिण्याची शिफारस केली आहे. त्यांच्यामते हळदीचं दूध हे फक्त पेय नसून ते शरीरातील रिकव्हरी आणि हॉर्मोनल संतुलन सुधारण्यास मदत करतं. जे अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यास हातभार लावते. वजन कमी करण्यासाठी हळदीचं दूध कसं प्यावं. याबाबत रुजूता दिवेकर यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. (Turmeric Milk Haldi Vala Dhoodh For Weight Loss Benefits And Recipe Rujuta Diwekar)
रुजूता दिवेकर रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिण्याची शिफारस करतात. रात्री हे दूध प्यायल्यानं शरीराला व्यायामाच्या किंवा दिवसाच्या तणावातून लवकर सावरण्यास मदत होते. तसंच रात्री हे प्यायल्यानं तुमचे हॉर्मोनल संतुलन सुधारते. ज्यामुळे चांगली आणि शांत झोप लागते. चांगली झोप वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी खूप महत्वाची असते.
हळदीचे दूध तयार करण्याची पद्धत
स्थानिक डेअरीमधून मिळणारं फुल फॅट दूध वापरा. फुल फॅट दूध हे फॅटी एसिड्स, एंटी ऑक्सिडेंट्स आणि दाहक विरोधी गुणधर्मांचे एक शक्तीशाली मिश्रण बनवते जे चरबी कमी करण्यास मदत करते. एक ग्लास कोमट दुधात फक्त एक चिमूटभर हळद घाला. हळदीचा अतिवापर टाळा.
शक्य असल्यास स्थानिक आणि नैसर्गिकरित्या वाढलेली हळद पावडर वापरा. चवीसाठी तुम्ही गूळ किंवा साखर घालू शकता. सर्दी आणि संसर्ग टाळण्यासाठी हळदीसोबत काळी मिरी आणि जायफळ यांची चिमूटभर पावडर घालावी. ज्यामुळे हळदीचे फायदे वाढतात.
हळदीचं दूध थेट चरबी जाळत नाही पण ते खालीलप्रकारे वजन कमी करण्यास मदत करते. व्यायामानंतर आणि दिवसभराच्या ताणानंतर शरीरातील झीज भरून काढण्यास मदत करते. ज्यामुळे पुढील वर्कआऊटसाठी शरीर तयार होते. (Ref)
चांगली झोप लागण्यास मदत होते. शांत झोप ही हॉर्मोनल संतुलन टिकवण्यासाठी आवश्यक असते. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते. हळदीतील दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील सूज आणि वेदना कमी करतात ज्यामुळे चयापचन सुधारण्यास मदत होते.
साऊथचे लोक रोज भात खातात तरी पोट का सुटत नाही? ५ कारणं, भात खाण्याची योग्य पद्धत पाहा
ऋजूता दिवेकर यांच्या मते हळदीचं दूध हे गोल्डन मिल्क ट्रेंड नसून ही एक पारंपारीक आणि प्रभावी 'नाईट कॅप' आहे जी चांगल्या आरोग्यासाठी आणि अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यासाठी दररोज रात्री प्यावे. हळदीच्या दुधाच्या सेवनानं मेटाबॉलिझ्म वाढवण्यासही मदत होते.
