lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ओटी पोट सुटलंय-मागून कंबर मोठी दिसते? रोज 'हा' पदार्थ खा-झरझर घटेल चरबी, मेटेंन राहाल

ओटी पोट सुटलंय-मागून कंबर मोठी दिसते? रोज 'हा' पदार्थ खा-झरझर घटेल चरबी, मेटेंन राहाल

Sweet Potato Upma For Weight Loss (Pot Kami karnyache upay sanga) :वजन कमी करण्यासाठी जास्तवेळ उपाशी न राहता तुम्ही योग्य खाण्यापिण्याच्या पदार्थांची निवड करायला हवी.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:26 AM2024-03-20T11:26:19+5:302024-03-20T11:36:30+5:30

Sweet Potato Upma For Weight Loss (Pot Kami karnyache upay sanga) :वजन कमी करण्यासाठी जास्तवेळ उपाशी न राहता तुम्ही योग्य खाण्यापिण्याच्या पदार्थांची निवड करायला हवी.

Sweet Potato Upma For Weight Loss : How Sweet Potato is Good For Weight Loss According to Research | ओटी पोट सुटलंय-मागून कंबर मोठी दिसते? रोज 'हा' पदार्थ खा-झरझर घटेल चरबी, मेटेंन राहाल

ओटी पोट सुटलंय-मागून कंबर मोठी दिसते? रोज 'हा' पदार्थ खा-झरझर घटेल चरबी, मेटेंन राहाल

फिट आणि निरोगी राहण्यासाठी शरीरात व्हिटामीन्स, मिनरल्स आणि हॉर्मोन्स योग्य असणं गरजेचं असतं. (Weight Loss Tips) जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही वेळीच आपल्या दिनचर्येकडे आणि आहाराकडे लक्ष द्यायला हवं. वजन कमी करण्यासाठी जास्तवेळ उपाशी न राहता तुम्ही योग्य खाण्यापिण्याच्या पदार्थांची निवड करायला हवी. (How to Loss Weight in Simple Way)

चवदार, चविष्ट पदार्थांचे सेवन करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. काही हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढून शकता. (What To Do For Weight Loss) आहारतज्ज्ञ सिमरन यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना  वजन कमी करण्यासाठी  कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा याबाबत सांगितले आहे.  (Easy Weight Loss Tips)

वजन कमी करण्यासाठी रताळे खा

युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरच्या रिपोर्टनुसार रताळ्यांमध्ये डायटरी फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं  राहतं आणि वजन  घटवण्याची प्रक्रियाही वेगाने होते.  हे खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म वेगाने वाढतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. रताळ्यांमध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण कमी असते. (Ref) रताळ्यांमध्ये  २०.१ ग्रॅम कार्ब्स, ३ ग्रॅम फायबर्स, ०.१ ग्रॅम फॅट्स, १.६ ग्रॅम प्रोटीन्स असतात. 

तुम्ही रताळ्यांचा उपमा नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता. यात  व्हिटामीन आयर्न, कॅल्शियम, बीटा कॅरोटीन, मॅग्नेशियम, फॉस्फरेस, पोटॅशियम, नियासिन आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. यात पाण्याचे प्रमाणही भरपूर असते. जेव्हा तुमचे शरीर डिहायट्रेड होते तेव्हा रताळ्यांचे सेवन तब्येतीसाठी उत्तम ठरते. रताळ्याचा उपमा बनवताना त्यात कढीपत्ता, हिंग, मेथीचे दाणे, नारळाचा वापर केला जातो. यामुळे डायजेशन चांगले राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. फक्त रताळ्यांचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. 

वजन कमी करण्यासाठी रताळ्यांचा उपमा कसा करायचा? (How to Make Weight Loss Upma)

रताळे कुकरमध्ये उकळून घ्या त्यानंतर सालं काढून छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या.  एका पॅनमध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर हिंग, जीरं, कढीपत्ता, उडीदाची डाळ, मेथीचे दाणे घाला.  हलकं भाजून त्यात कांदा घाला. कांदा हलका भाजून त्यात रताळ्याचे तुकडे घाला आणि थोडावेळ चमच्याने ढवळत राहा. धणे, मीठ आणि नारळ घाला तयार आहे वेटलॉस उपमा.

Web Title: Sweet Potato Upma For Weight Loss : How Sweet Potato is Good For Weight Loss According to Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.