हिवाळ्याच्या (Winter) दिवसांत अनेकांना गॅस, ब्लॉटिंग आणि अपनचनासारख्या समस्या उद्भवतात. अशा स्थितीत आपली पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी तुम्ही हेल्दी पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करू शकता. योग्य प्रमाणा पाणी पिणं, नियमित व्यायाम केल्यानं ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त ताक किंवा दही यांसारखे प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ खाण्याचा सल्लाही दिला जातो. औषधी गुणांनी परिपूर्ण ताकाचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते याशिवाय आरोग्य सुधारण्यासही मदत होते. (Should you drink buttermilk in winter)
आहारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ अर्चना जैन यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांच्यामते ताकात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स आणि एंटी ऑक्सिडंट्सयुक्त गुण असतात. याशिवाय यात कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटामीन्स यांसारखी पोषक तत्व असतात. याच्या सेवनानं पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. ताकात योग्य प्रमाणात प्रोबायोटिक्स आणि एंटी ऑक्सिडेटंस असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. तसंच अन्न पचणंही सोपं होतं.
गट बॅक्टेरिया वाढतात
ताकात भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. याच्या सेवनानं आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरियाज वाढतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.
औषधी गुणांनी परिपूर्ण ताकाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अशा स्थितीत जेवणासोबत तुम्ही ताकाचे सेवन केले तर गॅस, एसिडिटी, ब्लॉटिंग, पोट जड होणं अशा समस्या उद्भवत नाहीत.
केस गळून गळून भांग रूंद झाला? शहनाज सांगतात 'हे' घरगुती तेल लावा, दाट-मऊ होतील केस
ताकाचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. ओव्हरइटींगपासून बचाव होतो. वजन कमी होण्यास मदत होते याशिवाय पोटाचे आरोग्यही चांगले राहते.
ताकाचे सेवन करताना त्यात मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळी मिरी, चुटकीभर चूर्ण घालून ताक जेवणासोबत प्या. रोजच्या आहारात ताकाचा समावेश करायचा असेल तर तुम्ही ताकाची कढीसुद्धा थंडीच्या दिवसांत बनवू शकता.
जेवणानंतर लगेच चालायला गेल्यानं वजन पटकन घटतं? पाहा कसं-किती चालावं..
सर्दी, खोकला, घसा खवखवणं यांसारख्या कोणत्याही समस्या असल्यास रात्रीच्यावेळी ताकाचे सेवन करू नये. याव्यतिरिक्त किडनी किंवा हाय ब्लड प्रेशर असल्यास ताकात मीठ घालून पिऊ नये. ताकाचे सेवन योग्य प्रमाणातच करा.
