Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बेली फॅट्स कमी होऊन पोट होईल सपाट! आहारतज्ज्ञ सांगतात झोपण्यापूर्वी 'या' बियांचे पाणी पिणे असरदार...

बेली फॅट्स कमी होऊन पोट होईल सपाट! आहारतज्ज्ञ सांगतात झोपण्यापूर्वी 'या' बियांचे पाणी पिणे असरदार...

Seeds Water To Drink To Reduce Belly Fat During Night : Home Remedies to Lose Belly Fat Without Exercise At Home : How To Reduce Tummy : What to add to water to lose belly fat overnight : 5 best night-time drinks to lose belly fat : बेली फॅट कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये नेमकं काय काय करता येऊ शकत ते पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2025 17:58 IST2025-06-12T17:28:42+5:302025-06-12T17:58:43+5:30

Seeds Water To Drink To Reduce Belly Fat During Night : Home Remedies to Lose Belly Fat Without Exercise At Home : How To Reduce Tummy : What to add to water to lose belly fat overnight : 5 best night-time drinks to lose belly fat : बेली फॅट कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये नेमकं काय काय करता येऊ शकत ते पाहूयात.

Seeds Water To Drink To Reduce Belly Fat During Night 5 best night-time drinks to lose belly fat Home Remedies to Lose Belly Fat Without Exercise At Home | बेली फॅट्स कमी होऊन पोट होईल सपाट! आहारतज्ज्ञ सांगतात झोपण्यापूर्वी 'या' बियांचे पाणी पिणे असरदार...

बेली फॅट्स कमी होऊन पोट होईल सपाट! आहारतज्ज्ञ सांगतात झोपण्यापूर्वी 'या' बियांचे पाणी पिणे असरदार...

पोटाभोवतीची वाढलेली चरबी किंवा बेली फॅट्सची समस्या सगळ्यांनाच सतावते. वाढलेल्या पोटाच्या ढेरीमुळे फक्त आपल्या दिसण्यावरच नाही तर आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. बेली फॅट्स (Seeds Water To Drink To Reduce Belly Fat During Night) वाढल्यामुळे वजन वाढीबरोबरच डायबिटीस, हृदयविकार, ब्लड प्रेशर यांसारखे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. यासाठी, वेळीच याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन बेली फॅट्स कमी करणं अत्यावश्यक (Home Remedies to Lose Belly Fat Without Exercise At Home) असते. प्रत्येकालाच वाटतं की आपलं पोट (What to add to water to lose belly fat overnight) अगदी स्लिम - ट्रिम असावं. सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये, बरेचजण बेली फॅटस कमी करण्यासाठी डाएटिंग, एक्सरसाइज आणि वेगवेगळ्या महागड्या सप्लिमेंट्सचा वापर करतात.असे अनेक उपाय करुन पाहिले तरीही एकदा पोटाची चरबी वाढली की ते कमी करणं मोठं कठीण काम असतं(5 best night-time drinks to lose belly fat).

पोटावरची हट्टी  चरबी कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आपण काही खास बियांचे पाणी प्याल्यास त्याची नक्की मदत होऊ शकते. बेली फॅट कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये नेमकं काय काय करता येऊ शकत ते पाहूयात. एसेन्ट्रिक्स डाएट क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ शिवली गुप्ता यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीनुसार, बेली फॅट्स कमी करण्यासाठी कोणकोणत्या बियांचे पाणी पिणे फायदेशीर ठरु शकते ते पाहूयात. 

बेली फॅट्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय... 

१. मेथी दाण्यांचे पाणी :- ग्लासभर पाण्यांत मेथी दाणे भिजत घालून ते पाणी गाळून, सकाळी उपाशी पोटी प्यावे. आपण रात्री झोपण्यापूर्वी देखील हे पाणी पिऊ शकता फक्त ते रात्री पिताना हलकेच गरम करून प्यावे. मेथीचे दाणे चयापचय क्रिया गतिमान करण्यास, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, पचन सुधारण्यास, भूक नियंत्रित करण्यास मदत करतात. मेथीचे पाणी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. 

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

२. ओव्याचे पाणी :- रात्री हलक्या कोमट पाण्यांत चमचाभर ओवा घालून भिजत ठेवावा. सकाळी हे पाणी गाळून हलकेच गरम करून प्यायल्याने पोटावरची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. या उपायांमुळे गॅस, अपचन आणि पोटफुगीपासून आराम मिळतो, पचनसंस्था मजबूत होते आणि पोटावरील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते. 

३. धण्याचे पाणी :- रात्री एक कप पाण्यात १ चमचा धणे भिजवा. सकाळी हे पाणी उकळवा, ते गाळून घ्या आणि हे पाणी प्या. याचबरोबर, आपण रात्री  झोपण्यापूर्वी देखील हे कोमट पाणी पिऊ शकता. हे पाणी शरीराला आतून विषमुक्त करते, चयापचय सुधारते आणि पोटाभोवतीची चरबी कमी करते. धण्याचे पाणी यकृत आणि मूत्रपिंड देखील निरोगी ठेवते, ज्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते. 

सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता सांगतात, वेटलॉससाठी ७-७-७ चा मंत्र! म्हणून तर ते दिसतात फिट...

४. कलोंजी बियांचे पाणी :- कलौंजीच्या बिया पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. हे पाणी तयार करण्यासाठी १/२ चमचा कलौंजी रात्रभर पाण्यांत भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी थोडे गरम करून प्या. हे पाणी चरबीच्या पेशी तोडण्यास मदत करते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. 

५. चिया सीड्सचे पाणी :- चिया सीड्सचे पाणी वजन नियंत्रित करण्यास मदत करते. यासाठी, ग्लासभर पाण्यात १ चमचा चिया सीड्स घाला आणि ते ३० ते ४५ मिनिटे भिजवून ठेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी प्या. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते. याचबरोबर,  पोट बराच काळ भरलेले ठेवते आणि चयापचय क्रियेचा वेग वाढवते आणि वेटलॉस करण्यास मदत करते.

Web Title: Seeds Water To Drink To Reduce Belly Fat During Night 5 best night-time drinks to lose belly fat Home Remedies to Lose Belly Fat Without Exercise At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.