कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

Updated:June 12, 2025 17:23 IST2025-06-12T16:53:32+5:302025-06-12T17:23:57+5:30

8 Healthy Fillings To Make Paratha Weight Loss Friendly : 8 Must Try Healthy Weight Loss Paratha Recipes : Healthy Diet Parathas for Quick Weight Loss : 8 tasty and healthy stuffed parathas for weight loss : वेटलॉससाठी उपयुक्त असे स्टफिंग्ज भरुन नेहमीचाच पराठा अगदी सहज वेटलॉस फ्रेंडली करु शकतो.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

'पराठा' हा असा पदार्थ आहे की जो (8 Healthy Fillings To Make Paratha Weight Loss Friendly) आपल्याकडे सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही आवडीने खाल्ला जातो. पराठा तयार करताना शक्यतो तो वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग्ज, भरपूर तेल, तूप लावून तयार केला जातो. त्यामुळे पराठा खाल्ला की वजन वाढते असा बऱ्याचजणांचा समज होतो. यासाठीच, वजन कमी करताना आपल्यापैकी अनेकजण पराठा खायला आवडूनही, तो खाणच सोडून देतात.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

वेटलॉस करताना पराठा खायचे सोडून देण्यापेक्षा, आहे त्याच पराठ्याला (8 tasty and healthy stuffed parathas for weight loss) हेल्दी कसे करता येईल याचा विचार केला पाहिजे. वजन कमी करताना पराठ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टीक आणि वेटलॉससाठी उपयुक्त असे स्टफिंग्ज भरुन नेहमीचा पराठा अगदी सहज वेटलॉस फ्रेंडली करु शकतो.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

वेटलॉस करताना पराठ्यात आपण कोणकोणत्या पदार्थांचे स्टफिंग्ज भरुन तो ( 8 Must Try Healthy Weight Loss Paratha Recipes) अधिक पौष्टिक करु शकतो ते पाहूयात.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळा खाणे फायदेशीर ठरते. दुधी भोपळा किसून त्याला हलक्याशा तेलात जिरे आणि हिरव्या मिरचीची फोडणी देऊन मग हे सारण पराठ्यात स्टफिंग्ज म्हणून भरुन घ्यावे. दुधी भोपळ्यात पाणी आणि फायबरचे प्रमाण अधिक जास्त असते जे वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

पराठ्यात नेहमीचे पनीर घालण्यापेक्षा आपण लो फॅट्स पनीर देखील किसून घालू शकतो. यासाठी लो फॅट् पनीर किसून त्यात थोडा ओवा, काळीमिरी पूड आणि अळशीची बारीक पूड असे सगळे मिश्रण घालून एकजीव करून घ्यावे. असा हा प्रोटीनरीच पराठा वजन कमी करण्यास आणि स्नायूंना मजबुती देण्यासाठी फायदेशीर ठरतो.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

वेटलॉस करताना हिरव्या मुगाचे पदार्थ खाल्ल्याने वजन झटपट कमी करण्यास मदत होते. हिरवे मूग उकडवून ते हलकेच मॅश करावेत. मग थोड्याशा तेलात कांदा, लसूण, मॅश केलेले हिरवे मूग आणि आमचूर पावडर घालून पराठ्याचे सारण तयार करून घ्यावे. हे सारण पराठ्यात भरून पराठा तयार करून घ्यावा. हिरव्या मुगातील फायबर आणि प्रोटिन्समुळे वजन कमी करण्यास मदत होते.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

गाजर आणि बीटरुट यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. गाजर व बीटरुट किसून घ्यावे. मग तेलात मोहरी आणि किसलेलं आलं घालून फोडणी द्यावी, यात किसलेले गाजर बीट घालूंन सारण तयार करून घ्यावे. हे सारण पराठ्यात भरून पराठा लाटून घ्यावा.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

वेटलॉससाठी मेथी फारच फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहित आहे. थोड्याशा तेलात मेथीची पाने, भाजलेले बेसन आणि तिखट, मीठ इतर मसाले घालूंन स्टफिंग तयार करून घ्यावे. मेथीची पाने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात, तसेच बेसनमधील फायबर आणि प्रोटिन्स वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

शिल्लक राहिलेली डाळ थोडी आटवून घट्ट करावी यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घालूंन मिश्रण तयार करावे. पराठयासाठीची कणिक मळताना आपण त्यात हे सारण मिसळून पराठा तयार करु शकतो. डाळीतील प्रोटिन्समुळे आपला पराठा अधिकच चविष्ट आणि पौष्टिक होतो.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

किसलेल्या फ्लॉवरला थोड्याशा तेलात ओवा, हळद आणि लिंबाचा रस घालूंन परतवून घ्यावे. हे स्टफिंग आपण पराठ्यात भरून वेटलॉससाठी फायदेशीर असा चविष्ट पराठा तयार करु शकतो. या पराठ्यातील लो - कार्ब्स आणि पचनास हलका असा पराठा वेटलॉस साठी खाणे फायदेशीर ठरते.

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

हलकेच उकडवून घेतलेला पालक आणि किसलेला टोफू यांच्या एकत्रित मिश्रणाला लसणाची फोडणी देऊन पराठ्यासाठीचे सारण तयार करून घ्यावे. पालक आणि टोफू मधील आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटिन्स वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.