Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > आर. माधवननं फक्त २१ दिवसांत वजन घटवलं ना व्यायाम ना डाएट; पाहा खास वेट लॉस सिक्रेट

आर. माधवननं फक्त २१ दिवसांत वजन घटवलं ना व्यायाम ना डाएट; पाहा खास वेट लॉस सिक्रेट

R madhavan 21 Days Weight Loss Secret : आर. माधवननं सांगितलं की त्याने प्रत्येक घास ४५ ते ६० वेळा चावायला सुरूवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:14 IST2025-09-17T16:06:16+5:302025-09-17T16:14:22+5:30

R madhavan 21 Days Weight Loss Secret : आर. माधवननं सांगितलं की त्याने प्रत्येक घास ४५ ते ६० वेळा चावायला सुरूवात केली.

R madhavan 21 Days Weight Loss Secret Just Chewing Right Changed Everything | आर. माधवननं फक्त २१ दिवसांत वजन घटवलं ना व्यायाम ना डाएट; पाहा खास वेट लॉस सिक्रेट

आर. माधवननं फक्त २१ दिवसांत वजन घटवलं ना व्यायाम ना डाएट; पाहा खास वेट लॉस सिक्रेट

आजकाल प्रत्येकजण वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रयत्नात असतो. पण डाएट, व्यायाम न करता वजन कसं कमी करता येईल. या विचारात सगळे असतात. डाएट करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही, व्यायामही सर्वांनाच जमतो असं नाही. प्रसिद्ध बॉलिवूड स्टार आर. माधवनं हे सिद्ध केलं आहे की लाईफस्टाईलमध्ये सोपे, साधे बदल करून तु्म्ही वजन कमी करू शकता. रॉकेट्री : द नंबी इफेक्ट या चित्रपटासाठी तब्बल २१ दिवसांत आर, माधवननं वजन कमी केलं आहे. (R madhavan 21 Days Weight Loss Secret)

आर, माधवननं वजन कसं कमी केलं?

कर्ली टेल्सशी बोलताना आर, माधवननं सांगितलं की आपल्या सगळ्यात महत्वाच्या सवयींपैकी एक म्हणजे चावणं, अन्न घाई घाईत न चावता ४५ ते ६० वेळा बारीक चावायला हवं. मी आपल्या खाण्यापिण्यावर अधिक लक्ष दिलं. आर. माधवननं सांगितलं की त्याने प्रत्येक घास ४५ ते ६० वेळा चावायला सुरूवात केली. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण आला नाही. २०१४ च्या एका अभ्यासानुसार जास्तवेळा अन्न चावून खाल्ल्यानं फूड इन्टेक कमी होतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

पोट खूपच लटकतंय? रामदेव बाबा सांगतात बसल्या बसल्या ३ व्यायाम करा, सपाट होईल पोट

आर माधवनचं डाएट आणि फिटनेस

प्रोसेस्ड फूड पुर्णपणे बंद करा. हिरव्या भाज्या आणि ताजं शिजवलेलं अन्न खा, दुपारी ३ नंतर कच्च अन्न खाऊ नका. शेवटचं जेवण 7 च्या आधी घ्या. आपल्या शरीराच्या हिशोबानं एलर्जी टेस्ट करून घ्या. त्या आधारावर अन्नाची निवड करा.

सद्गुरू सांगतात तांब्याच्या भांड्यात पाणी प्या 'हे' आजार बरे होतील; पाणी कसं, कधी प्यावं? वाचा

इंटरमिटेंट फास्टींग आणि माईंडफुल इटिंग

आर, माधवननं आपल्या डाएटला टाईम विंडोमध्ये बांधले आणि त्याचवेळी आमलात आणले. योग्यवेळी खाणं, चावून खाणं, हलका-एनर्जेटीक आहार घेणे. सकाळी चालायला जाणे, भरपूर पाणी पिऊन शरीर कायम हायड्रेट ठेवले, स्क्रीन टाईम कमी केला आणि लवकर झोपण्याची सवय लावली. हे छोटे छोटे बदल करून तुम्ही लाईफस्टाईल बॅलेंस करू शकता. वजन कमी करण्यासाठी औषधांची नाही तर योग्य लाईफस्टाईलची गरज असते. योग्यवेळी खाणं, योग्यवेळी झोपणं, कमी खाणं, या सवयींचा अवलंब करून तुम्ही वजन कमी करू शकता.

Web Title: R madhavan 21 Days Weight Loss Secret Just Chewing Right Changed Everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.