Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > शरीरातील 'ही' लक्षणं ओरडून ओरडून सांगतात वाढणार आहे लठ्ठपणा, कसा कराल बचाव?

शरीरातील 'ही' लक्षणं ओरडून ओरडून सांगतात वाढणार आहे लठ्ठपणा, कसा कराल बचाव?

Obesity Signs : लठ्ठपणा वाढणार असेल तर शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशाच काही लक्षणांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:18 IST2025-05-30T10:17:53+5:302025-05-30T10:18:38+5:30

Obesity Signs : लठ्ठपणा वाढणार असेल तर शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशाच काही लक्षणांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Obesity Signs : Warning signs of future weight gain | शरीरातील 'ही' लक्षणं ओरडून ओरडून सांगतात वाढणार आहे लठ्ठपणा, कसा कराल बचाव?

शरीरातील 'ही' लक्षणं ओरडून ओरडून सांगतात वाढणार आहे लठ्ठपणा, कसा कराल बचाव?

Obesity Signs : लठ्ठपणा आज जगभरात एक मोठी समस्या बनत चालला आहे. एकदा का लठ्ठपणा वाढला की, फिगर तर बिघडतोच, सोबतच शरीरात वेगवेगळे आजारही घर करतात. एकदा वाढलेला लठ्ठपणा कमी करणं काही खायचं काम नसतं. लठ्ठपणा कुणालाच नको असतो. पण याच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर लठ्ठपणा काही तुमचा पिच्छा सोडत नाही. अशात लठ्ठपणा वाढणार असेल तर शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशाच काही लक्षणांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

ज्याप्रमाणे आपल्याला जर एखादा आजार झाला असेल तर शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसतात. तशीच काही लक्षणं वजन वाढण्याआधी दिसू लागतात. ज्यांकडे सामान्यपणे सगळेच दुर्लक्ष करतात. मग हेच दुर्लक्ष करणं तुम्हाला पुढे जाऊन महागात पडतं.

अशात आज आम्ही लठ्ठपणा वाढत असल्याच्या काही लक्षणांबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही यापासून बचाव करू शकाल किंवा वजन कमी करू शकाल.

कंबरेचा घेर वाढणं

जेव्हा आपल्या शरीरात फॅट वाढू लागतं तेव्हा सामान्यपणे सगळ्यात आधी कंबरेच्या आजूबाजूला ते दिसू लागतं. अशात तुम्हाला सुद्धा तुमच्या कंबरेचा घेर वाढल्याचं जाणवत असेल, वजन कमी करण्याचं प्लानिंग लगेच करा. जराही उशीर कराल तर पुढे पश्चाताप होईल.

सतत थकवा

चांगला पौष्टिक आहार घेऊन, रोज वेळेवर जेवून आणि पुरेशी झोप घेऊनही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुम्ही वजन कमी करण्यावर भर दिला पाहिजे. 

झोपेत घोरणं

जेव्हा आपल्या मानेच्या किंवा छातीच्या आजूबाजूला फॅट वाढतं, तेव्हा यामुळे श्वास घेण्यास समस्या होते. याच कारणानं रात्री अनेक लोक घोरतात. 

जॉइंटमध्ये वेदना

वजन वाढल्यावर जॉइंट खासकरून गुडघे, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागावर जास्त प्रेशर येतो. त्यामुळे या भागांमध्ये नेहमीच वेदना होतात. अशात तुम्ही लगेच वजन कमी करण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजे.

पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा

वजन वाढल्यामुळे हार्मोन्समध्येही असंतुलन होतं, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. तुम्हाला सुद्धा जेवण केल्यावरही काही खाण्याची इच्छा होत असेल तर लगेच वजन कमी करण्यास सुरूवात करा.

वर सांगण्यात आलेली लक्षणं जर तुमच्या शरीरातही दिसत असतील तर तुम्ही लगेच प्रोसेस्ड फूड्स आणि शुगर घेणं कमी केलं पाहिजे. हेल्दी डाएट आणि एक्सरसाईज केला पाहिजे. असं केलं नाही तर काही महिन्यात तुम्ही सुद्धा लठ्ठपणाचे शिकार व्हाल आणि नंतर वेगवेगळ्या आजारांचे शिकार व्हाल.

Web Title: Obesity Signs : Warning signs of future weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.