Weight Loss Drink : आजच्या काळात लठ्ठपणा ही समस्या अनेक लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे लोक वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात, पण अनेक वेळा सर्व प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. जर तुमच्याही बाबतीत असंच काही होत असेल किंवा वाढत्या चरबीमुळे तुम्ही चिंतेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते.
अलिकडे होलिस्टिक न्यूट्रिशनिस्ट देवयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एका खास ड्रिंकबाबत सांगितले आहे, जे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतं. चला तर पाहुया हे ड्रिंक कसं बनवाल आणि ते शरीरासाठी सं फायदेशीर ठरतं.
ड्रिंक बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी:
3 चमचे मेथीदाणे
3 चमचे हळद पावडर
3 चमचे ओवा
3 चमचे बडीशेप
2 तुकडे दालचिनी
बनवण्याची पद्धत
सर्व गोष्टी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करा. तयार झालेलं मिश्रण एअर टाइट डब्यात साठवून ठेवा. प्रत्येक जेवणाच्या सुमारे 30 मिनिटे आधी हे मिश्रण एक मोठा चमचा अर्धा ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या.
काय मिळतात फायदे?
मेटाबॉलिझम बूस्ट होतं
हळद आणि दालचिनी शरीरातील थर्मिक अॅक्टिव्हिटी वाढवतात, ज्यामुळे फॅट बर्निंग प्रक्रिया वेगानं होते.
पचन सुधारतं
बडीशेप आणि ओवा हे गॅस, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्या कमी करतात.
फॅट बर्निंगसाठी उपयुक्त
मेथीचे दाणे भूक नियंत्रित ठेवतात, त्यामुळे अति खाणं टळतं. अशा वेळी शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी साचलेली चरबी जाळायला सुरुवात करतं.
गट हेल्थ सुधारते
हे सर्व मसाले अँटी-इंफ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफाइंग गुणांनी समृद्ध आहेत, ज्यामुळे गट हेल्थ चांगली राहते आणि वजन कमी करण्यात मदत होते.
काय काळजी घ्याल?
न्यूट्रिशनिस्ट देवयानी सांगतात की, हे ड्रिंक वजन कमी करण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. मात्र, काहीही एका रात्रीत होत नाही. नियमितता आवश्यक आहे. दररोज दिवसातून दोन वेळा, सलग 30 दिवस हे ड्रिंक घेतल्यास तुम्हाला महिन्याभरात चांगला परिणाम दिसू शकतो.