बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांची टोन्ड फिगर आणि जबरदस्त फिटनेस पाहून अनेकींना प्रश्न पडतो की, त्या एवढ्या बिझी शेड्युलमध्ये देखील स्वतःला इतक्या परफेक्ट मेंटेन्ड कसं - काय ठेवतात... बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी दीपिका आणि कतरिना यांच्या फिटनेस आणि ग्लोइंग स्किनचे कौतुक नेहमीच होत असते. उत्तम फिगरसाठी जिममध्ये घाम गाळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकाच महत्त्वाचा असतो त्यांचा आहार आणि खाण्याच्या सवयी... अलीकडेच यास्मिनने, आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत सेलिब्रिटींना फिट आणि मेंटेन ठेवण्यासाठी त्या काय खातात, त्यांच्या आहारात कोणत्या सवयी पाळतात आणि दिवसभरातील त्यांचा हेल्दी रुटीन काय असते याचे सिक्रेट शेअर केले आहे(Katrina Kaif & deepika Padukone Trainer Shares One Healthy Snack For Weight Loss).
यास्मिनच्या मते, फिट शरीरासाठी महागड्या डायटपेक्षा संतुलित खाणं, वेळेवर जेवण आणि एक्सरसाइज अधिक महत्त्वाची असते. जर तुम्हालाही सेलिब्रिटीजसारखी तंदुरुस्त आणि टोन्ड फिगर हवी असेल, तर त्यांच्या या खास डाएट सिक्रेट्स आणि सवयी बद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. आपण यास्मिन कराचीवाला यांनी शेअर केलेले ते खास डाएट सिक्रेट्स पाहणार आहोत, जे दीपिका आणि कतरिनाला केवळ फिट नव्हे, तर ग्लॅमरस ठेवण्यास मदत करतात(celebrity nutrition secrets for weight loss).
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन सांगतात की...
अनेकदा आपल्याला सकाळी नाश्त्यानंतर, दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतरही काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि अशावेळी आपण चिप्स, कुकीज किंवा तळलेले पदार्थ भरपेट खातो. परंतु असे न करता, या भूकेला शांत करण्यासाठी आपण काही स्मार्ट ट्रिक्स वापरुन स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ खाऊ शकतो.
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला, ज्यांनी दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांसारख्या सेलिब्रिटीजना फिटनेस ट्रेनिंग दिले आहे, त्यांनी नुकताच, सेलिब्रिटी खात असलेला एक हेल्दी स्नॅक शेअर केला आहे. हा स्नॅक त्यांना दिवसभर फिट आणि एनर्जेटिक ठेवतो. वजन कमी करण्यासाठी या स्नॅकचा रोजच्या आहारामध्ये समावेश केला जाऊ शकतो.
फिटनेससाठी एक हेल्दी स्नॅक...
एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये यास्मीन यांनी एका खाद्यपदार्थाबद्दल सांगितले आहे, जो भूक नियंत्रित करतो आणि फिट राहण्यास मदत करतो. तो पदार्थ आहे बदाम (Almonds). यास्मीन यांनी बदामाला पोषक तत्वांचा नैसर्गिक खजिना असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, बदाम प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सयुक्त असतात. यामुळेच ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा दीर्घकाळ पोट भरलेले ठेवायचे आहे, अशा लोकांसाठी बदाम एक उत्कृष्ट स्नॅक आहे.
आपल्या व्हिडिओमध्ये यास्मीन यांनी दुपारच्या वेळी (मिड-डे) खाण्याची तीव्र इच्छा होणाऱ्या (craving) लोकांना बदाम खाण्याचा सल्ला दिला आहे आणि फिट राहण्यासाठी हा एक हेल्दी आणि सोपा मार्ग असल्याचे सांगितले आहे.
सोहा अली खानचे सिक्रेट मॉर्निंग ड्रिंक! रोज कपभर प्या - फरक पाहा - शरीर राहील तंदुरुस्त...
सुपरफिट राहण्यासाठी अक्षय कुमार फॉलो करतो वडिलांनी सांगितलेला गोल्डन रुल! म्हणून दिसतो आजही तरुण...
त्यांनी सांगितले की, संशोधनात, 'जर्नल ऑफ न्यूट्रिशनल सायन्स' (Journal of Nutritional Science) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक सकाळी बदाम खातात, त्यांना दिवसभर तेवढ्याच कॅलरी असलेले इतर स्नॅक्स खाणाऱ्या लोकांपेक्षा कमी भूक (Less Hungry) लागते.
अमेरिकेच्या 'हेल्थलाइन' (Healthline) वेबसाइटवर आणि अनेक अभ्यासांमध्ये असे सांगितले आहे की, बदाम (Almonds) हा सर्वात जास्त पोषक तत्त्वे असलेला खाद्यपदार्थ आहे. यात व्हिटॅमिन 'ई', अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाचे आरोग्य कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.