Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > करीना आठवड्यातून ४ वेळा खाते ही खिचडी; पौष्टीक खिचडीची रेसिपी, वजन पटकन होईल कमी

करीना आठवड्यातून ४ वेळा खाते ही खिचडी; पौष्टीक खिचडीची रेसिपी, वजन पटकन होईल कमी

Kareena Kapoor Favorite Green Moong Dal Khichdi Recipe : हिरवी साल असलेल्या मुगाच्या डाळीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:05 IST2025-09-16T16:01:32+5:302025-09-16T16:05:00+5:30

Kareena Kapoor Favorite Green Moong Dal Khichdi Recipe : हिरवी साल असलेल्या मुगाच्या डाळीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते.

Kareena Kapoor Favorite Green Moong Dal Khichdi Effective For Weight Loss | करीना आठवड्यातून ४ वेळा खाते ही खिचडी; पौष्टीक खिचडीची रेसिपी, वजन पटकन होईल कमी

करीना आठवड्यातून ४ वेळा खाते ही खिचडी; पौष्टीक खिचडीची रेसिपी, वजन पटकन होईल कमी

Kareena Kapoor Favorite Food: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनं (Kareena Kapoor)आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती आठवड्यातून ४ वेळा खिचडी खाते. खिचडी हे तिचं कम्फर्ट आणि फेव्हरेट फूड आहे. खिचडी खाणं हे हेल्दी मानलं जातं. खिचडी मूग डाळीमुळे चविष्ट आणि हेल्दी होते. हिरव्या मूग डाळीची स्वादीष्ट आणि चविष्ट खिचडी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. प्रसिद्ध कुकिंग एक्सपर्ट शालिनी सांगतात की करीना कपूर खानला मूग डाळीची खिचडी खायला आवडतं. (Kareena Kapoor Favorite Green Moong Dal Khichdi Effective For Weight Loss)

मुगाच्या डाळीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. हिरवी साल असलेल्या मुगाच्या डाळीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. ज्यामुळे मसल्स वाढण्यासाठी आणि शरीरातील सेल्स रिपेअर होण्यास मदत होते. यासाठी सगळ्यात आधी १ वाटी मूग डाळ घ्या आणि रात्रभर भिजवण्यासाठी ठेवा. (Kareena Kapoor Favorite Green Moong Dal Khichdi Recipe)

हिरवी मूग डाळ एका वाटी घ्या. त्यात अर्धा कप तांदूळ घाला. हे सर्व पदार्थ प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून  शिजवून घ्या. कमीत कमी ५ शिट्ट्या घ्या. फोडणी देण्यासाठी तुम्ही टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, गाजर, मटार, कोबी, काजू घ्या. हे पदार्थ तेलात व्यवस्थित फ्राय करा. थोडं जीरं पावडर आणि लाल मिरची हे सर्व पदार्थ घाला. व्यवस्थित शिजल्यानंतर यात डाळ, तांदूळाचे शिजवलेले मिश्रण घाला आणि ५ मिनिटं शिजू द्या. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

डायटिशियन डॉक्टर प्रभात सांगतात की हिरव्या मुगाच्या डाळीची खासियत अशी की ही खिचडी वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. आठवड्यातून सातही दिवस तुम्ही कधीही ही खिचडी खाऊ शकता. एका आठवड्यात तुमचं २ ते ३ किलो वजन  सहज कमी होईल. कारण यात प्रोटीन्स जास्त असतात आणि कॅलरीज कमी असतात. यामुळे शरीराला आतून ताकद मिळते. शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.

खिचडी खाण्याचे फायदे
 
खिचडी हा पचायला सोपा आणि हलका असा पौष्टीक आहार आहे. तुम्ही कधीही  कोणत्याही वेळी खिचडी खाऊ शकता. यात तुमच्या आवडीनुसार भरपूर भाज्या घाला. हा एक संतुलित आहार आहे ज्यामुळे पोट भरलेलं राहतं सतत भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यासही मदत होते. खिचडीत गव्हाचा वापर नसतो. त्यामुळे जे लोक ग्लुटेन फ्री डाएट घेतात त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय  आहे.

Web Title: Kareena Kapoor Favorite Green Moong Dal Khichdi Effective For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.