lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नेहमी तांदुळाचाच कशाला करा ग्लुटन फ्री ज्वारी डोसा, परफेक्ट वेट लॉस रेसिपी- चव जबरदस्त

नेहमी तांदुळाचाच कशाला करा ग्लुटन फ्री ज्वारी डोसा, परफेक्ट वेट लॉस रेसिपी- चव जबरदस्त

ज्वारीच्या पिठाचा डोसा (healthy jowar dosa) अनेकांगानं आरोग्यास फायदेशीर असतो. तो वरचेवर खाल्ल्यास आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी (jowar dosa benefits for health) कमी होतात. आरोग्यदायी ज्वारीच्या पिठाचा डोसा (how to make instant jowar dosa) तयार करणं खूपच सोपं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 07:15 PM2022-07-15T19:15:51+5:302022-07-15T19:27:39+5:30

ज्वारीच्या पिठाचा डोसा (healthy jowar dosa) अनेकांगानं आरोग्यास फायदेशीर असतो. तो वरचेवर खाल्ल्यास आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी (jowar dosa benefits for health) कमी होतात. आरोग्यदायी ज्वारीच्या पिठाचा डोसा (how to make instant jowar dosa) तयार करणं खूपच सोपं आहे. 

How to make weight loss friendly instant jowar dosa.. Jowar dosa beneficial for health | नेहमी तांदुळाचाच कशाला करा ग्लुटन फ्री ज्वारी डोसा, परफेक्ट वेट लॉस रेसिपी- चव जबरदस्त

नेहमी तांदुळाचाच कशाला करा ग्लुटन फ्री ज्वारी डोसा, परफेक्ट वेट लॉस रेसिपी- चव जबरदस्त

Highlightsज्वारीच्या पिठाचा डोसा करताना पीठ आंबवावं लागत नाही. डोशाच्या पिठात दही घातल्यानं डोशाला आवश्यक असलेला आंबटपणा येतो. डोसा एकाच बाजूनं कुरकुरीत शेकून घ्यावा. 

डोशांच्या सर्व प्रकारातला आरोग्यदायी आणि झटपट होणारा प्रकार म्हणजे ज्वारीचा डोसा. ज्वारीच्या डोशाचं (jowar dosa)  वैशिष्ट्य म्हणजे डोसा असूनही ज्वारीचा डोसा करताना पीठ आंबवावं लागत नाही. ज्वारीचा डोसा हा अनेक अंगानं आरोग्यास फायदेशीर असतो. ज्वारीचा डोसा  रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर  (jowar dosa benefits to health) असतो.म्हणूनच मधुमेह असलेल्या रुग्णांनाही ज्वारीचा डोसा खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. कोलेस्टेराॅल नियंत्रित करण्यासाठी सूचवल्या जाणाऱ्या आहारात ज्वारीच्या डोशाचा समावेश होतो. ज्वारीच्या पिठात 25 टक्के फायबर असतं. ज्वारीचा डोसा खाल्ल्यानं पोट भरल्याची जाणीव लवकर होते, जास्त खाणं टाळलं जातं. त्यामुळे ज्वारीचा डोसा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. ज्वारीच्या पिठात फायटो केमिकल्स हे ॲण्टिऑक्सिडण्ट्स असतात. यामुळे पेशींचा दाह होत नाही. आरोग्याचं मुक्त मुलकांपासून संरक्षण होतं. ज्वारीच्या पिठाचा डोसा वरचेवर खाल्ल्यानं कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. हा डोसा खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते.  या डोशातील क आणि के जीवनसत्वांमुळे मेंदुचं कार्य सुधारतं, मेंदुला ऊर्जा मिळते. ज्वारीच्या पिठाच्या डोशातून शरीराला ब6 जीवनसत्व, नियासिन, थियामिन हे घटक मिळतात. ज्वारीचा हा आरोग्यदायी डोसा करण्याची पध्दत (how to make instant healthy jowar dosa)  अगदी सोपी आहे.  

Image: Google

कसा करायचा ज्वारीच्या पिठाचा डोसा?
ज्वारीच्या पिठाचा डोसा करण्यासाठी 2 कप ज्वारीचं पीठ, दीड कप पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, अडीच कप आंबट दही, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा किसलेलं आल आणि 2-3 चमचे तेल घ्यावं. 
डोशाचं पीठ करताना एका मोठ्या भांड्यात ज्वारीचं पीठ घ्यावं. त्यात दही, पाणी आणि तेल सोडून बाकी सर्व जिन्नस घालून ते पिठात एकत्र करुन घ्यावं. दुसऱ्या भांड्यात 1 कप पाणी घ्यावं त्यात दही घालून ते फेटावं. दही फेटताना त्यात गुठळी राहू देवू नये. मग फेटलेलं दही ज्वारीच्या पिठात घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. दही घातल्यानं डोशाच्या पिठाला आंबटपणा येतो.  पीठ फेटताना गुठळी राहू देवून् नये. एकदा पीठ चांगलं हलवून घेतलं की अर्धा तास ते झाकून ठेवावं. अर्ध्या तासानंतर पीठ हलवून घ्यावं. त्यात पाणी घालून डोशाच्या पिठाप्रमाणे पीठ सरसरीत करावं. ज्वारीच्या पिठाचा डोसा करताना पीठ घट्ट राहाता कामा नये. 

Image: Google

डोसा करण्यासाठी तवा मध्यम आचेवर गरम करावा. त्यावर थोडं पाणी शिंपडून तवा फडक्यानं पुसून घ्यावा. मग तव्याला तेल लावून डोशाचं पीठ घालावं. ते तव्यावर नीट गोल  पसरवावं. 2 मिनिटं डोसा शेकावा. डोशाला थोडं तेल लावावं. डोसा कुरकुरीत वाटत नसल्यास तो आणखी शेकावा. नंतर डोसा काढून घ्यावा. ज्वारीच्या पिठाचा गरम गरम डोसा चटणीसोबत खावा.

Web Title: How to make weight loss friendly instant jowar dosa.. Jowar dosa beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.