Join us

वजन कमी करण्यासाठी 'असं' प्या पाणी, वजन होईल झरझर कमी - तब्येत राहील ठणठणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 18:59 IST

How Much Water Should You Really Drink Each Day Doctor Advice To Control Weight : Water Helps Weight Loss Right Way Drink Water : How Drinking More Water Can Help You Lose Weight : वेटलॉस करण्यासाठी, शरीर आणि लाईफस्टाईलनुसार दररोज किती पाणी पिणे फायदेशीर आहे ते पाहूयात.

आजकाल आपल्यापैकी बरेचजण वाढलेलं वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असतात. वजन कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज आणि डाएट करण्यावर (How Much Water Should You Really Drink Each Day Doctor Advice To Control Weight) अधिक भर देतो. खरंतर, वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज आणि डाएट (Water Helps Weight Loss Right Way Drink Water) सोबतच दिवसभरात पुरेसे पाणी पिणे देखील महत्वाचे असते. बरेचदा आपल्यापैकी काहीजण एक्सरसाइज आणि डाएट फॉलो करतात पण पुरेसे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. शरीरातील प्रत्येक क्रिया सुरळीत चालण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते, आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत तर याची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते( How Drinking More Water Can Help You Lose Weight).

योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी प्यायल्याने ते फक्त तहानच भागवत नाही, तर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, पचनसंस्थेला चालना देते, भूक नियंत्रित ठेवते आणि चयापचय क्रियेचा वेग वाढवते तसेच वजन कमी करण्यास मदत करते. असे असले तरी पाणी पिण्याची वेळ, प्रमाण आणि पद्धत योग्य नसेल, तर त्याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत नाही. पाणी हा वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असून वेटलॉस करण्यास पाण्यामुळे अधिक मदत होते. वजन कमी करण्यासाठी दिवसभरात नेमके किती पाणी प्यावे ते पाहूयात. नवी दिल्लीतील, जनरल फिजिशियन आणि लसीकरण अधिकारी डॉ. पियुष मिश्रा यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार, वजन कमी करण्यासाठी पाण्याची खूप महत्त्वाची भूमिका असते. आपले शरीर आणि लाईफस्टाईलनुसार दररोज किती पाणी पिणे फायदेशीर आहे ते पाहूयात. 

वजन कमी करण्यात पाण्याची महत्वाची भूमिका...

जेव्हा शरीर पुरेसे हायड्रेटेड असते, तेव्हा चयापचय क्रिया वेगाने चालते, त्यामुळे अधिक कॅलरीज जळतात. पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, भूक नियंत्रणात राहते आणि नको तेव्हा खाण्याची सवय कमी होते. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज असलेला आहार घेत असताना, शरीरातील आवश्यक खनिजांचे संतुलन टिकवून ठेवण्याचे कामही पाणी करतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवणे गरजेचे असते. 

वेटलॉससाठी मध आणि दालचिनी करतात जादू, वजन होईल झरझर कमी - करुन पाहा हा खास उपाय...

वेटलॉससाठी नेमकं किती प्रमाणात पाणी पिणे आवश्यक... 

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार पाण्याची गरज वेगवेगळी असते. एका निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज सुमारे २.५ ते ३ लिटर पाणी प्यायला हवे. परंतु जर तुम्ही वजन कमी करत असाल, विशेषतः नियमित एक्सरसाइज करत असाल, तर पाण्याचे हे प्रमाण थोडं वाढवणं उपयुक्त ठरू शकतं. डॉक्टरांच्या मते, प्रत्येक २० किलो वजनासाठी किमान १ लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजेच, जर एखाद्याचं वजन ६० किलो असेल, तर त्याने दिवसाला किमान ३ लिटर पाणी प्यावं. याचबरोबर, एकाच वेळी खूप पाणी पिणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे पाणी दिवसभर थोड्या-थोड्या प्रमाणात, संतुलित पद्धतीने प्यावं. यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि चयापचय क्रियाही योग्य रीतीने सुरू राहील, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल. 

वेटलॉससाठी मेथी दाणे की बडीशेप काय फायदेशीर? डॉक्टर सांगतात, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं ?

रिकाम्या पोटी आणि जेवणापूर्वी पाणी पिण्याचे फायदे... 

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने शरीर डिटॉक्स होते आणि चयापचय क्रियेचा वेगही वाढतो. या सवयीमुळे शरीरातील साठलेले विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि दिवसाची सुरुवात फ्रेश होते. जेवणाच्या सुमारे ३० मिनिटे आधी पाणी प्यायल्यास भूक थोडी कमी होते, ज्यामुळे अति खाण्याची शक्यता कमी होते. यामुळे एकूण कॅलरीचे प्रमाण नियंत्रित राहतं आणि वजन वाढण्यावर नियंत्रण मिळवता येतं. ही एक सोपी, नैसर्गिक आणि परिणामकारक पद्धत असून ती नियमितपणे फॉलो केल्यास दीर्घकालीन फायदे मिळू शकतात.

गरम पाणी पिणे जास्त फायदेशीर आहे का?

वजन कमी करण्यासाठी थंड पाणी प्यावं की गरम? हा प्रश्न अनेकांना सतावतो. खरंतर, कोमट पाणी हे वजन कमी करण्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते. कोमट पाणी शरीरात साचलेली चरबी विरघळवण्यास मदत करते, चयापचय क्रिया सुधारते आणि पचन क्रिया अधिक सुरळीतपणे चालण्यास मदत करते. विशेषतः जेवल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास अन्न सहज पचते, पोटफुगी, गॅस कमी होते आणि पोट हलकं वाटतं. यामुळेच वजन कमी करताना कोमट पाणी पिण्याची सवय अतिशय फायदेशीर ठरु शकते. वजन कमी करण्यासाठी पाणी पिताना आपण त्यात लिंबू, पुदिना किंवा काकडी घालून नैसर्गिक स्वाद वाढवू शकता, यामुळे पाण्याची चव तर सुधारतेच, शिवाय शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते. वजन कमी करण्याच्या आणि एकूण आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने ही सवय फायदेशीर ठरते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सपाणी