Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं का सोडायचं? दिवसभरात 'एवढ्या' चपात्या खा, मेंटेन दिसाल

वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं का सोडायचं? दिवसभरात 'एवढ्या' चपात्या खा, मेंटेन दिसाल

How Many Roti Should I Eat For Weight Loss (वजन कमी करण्यासाठी किती चपात्या खायच्या) : चपाती खाणं टाळण्यापेक्षा यात काही बदल करून तुम्ही  चपाती खाण्याचे प्रमाण कमी करून वजन नियंत्रणात ठेवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 03:49 PM2024-01-14T15:49:29+5:302024-01-15T15:18:24+5:30

How Many Roti Should I Eat For Weight Loss (वजन कमी करण्यासाठी किती चपात्या खायच्या) : चपाती खाणं टाळण्यापेक्षा यात काही बदल करून तुम्ही  चपाती खाण्याचे प्रमाण कमी करून वजन नियंत्रणात ठेवू शकता.

How Many Roti Should I Eat For Weight Loss : How Many Chapatis Can You Have in a Day | वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं का सोडायचं? दिवसभरात 'एवढ्या' चपात्या खा, मेंटेन दिसाल

वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं का सोडायचं? दिवसभरात 'एवढ्या' चपात्या खा, मेंटेन दिसाल

चपाती (Chapati) हा भारतातील सर्वांच्याच आहाराचा महत्वाचा भाग आहे. लंच, डिनर असो किंवा ब्रेकफास्ट प्रत्येकालाच निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी  आहारात चपातीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. (Chapati Diet For Quick Weight Loss) वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना अनेकजण चपाती खाणं सोडतात. चपाती खाणं टाळण्यापेक्षा यात काही बदल करून तुम्ही  चपाती खाण्याचे प्रमाण कमी करून वजन नियंत्रणात ठेवू शकता. (How Many Chapatis Can You Have in a Day)

चपातीत किती कॅलरीज असतात

हेल्दीफाय मी च्या रिपोर्टनुसार चपातीचा आकार, जाडी आणि वापरलेल्या पिठाच्या प्रकारानुसार चपातीच्या कॅलरीजची संख्या बदलूही शकते.  एका चपातीत जवळपास 75 ते 100 कॅलरीज असतात. इतर मैदायुक्त ब्रेड्सच्या तुलनेत यात कमी कॅलरीज असतात. 

केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

कॅलरीनुसार पाहायला गेले तर एक व्यक्ती जवळपास १८०० ते २००० ग्रॅम कॅलरीजचा आहार घेते. यात जवळपास २२५   ते ३२५ ग्रॅम कार्बोहायड्रेटस असतात. आहारात याचा समावेश करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. एका चपातीत जवळपास १५ ग्राम प्रोटीन, ०.४ ग्राम फॅट आणि ७१ कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात १०० ते १५० ग्रॅम कॅलरीज कमी घ्या.  दिवसभरात ६ ऐवजी ४ चं चपात्या खा. गव्हात कार्ब्स जास्त प्रमाणात असते. म्हणूनच बाजरीची भाकरी खा यात पोषक तत्व जास्त असतात.

चपातीतून योग्य प्रमाणात फायबर्स मिळतात ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. महिलांनी सकाळी आणि रात्री २-२ चपात्या खाव्यात आपल्या भुकेनुसार तुम्ही याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. पुरूषांनी सकाळी आणि रात्री ३-३ चपात्या खाव्यात रात्री चपाती खात असाल तर जेवल्यानंतर वॉक नक्की करा. गव्हाच्या पीठाऐवजी बाजरी, ज्वारी, नाचणी या पिठांचा आहारात समावेश करा. जर तुम्ही चपाती खाणं कमी करत असाल तर त्याऐवजी  हिरव्या भाज्या, फळं जास्तीत जास्त खा, जंक फूड, फास्ट फूड जास्त प्रमाणात खाऊ नका. परिणामी लठ्ठपणा वाढणार नाही.

वजन कमी करण्यासाठी चपातीऐवजी काय खावे? (Best Ways To Eat Chapati)

फूड न्युट्रिशन ऑर्गनायजेशनच्या रिपोर्टनुसार कमीत कमी  कॅलरीज घेण्यासाठी तुम्ही चपातीत ओट्स घालून त्याची  चपाती खाऊ शकता. ज्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहतं. बदामाच्या पीठाची चपाती ही हेल्दी ऑपश्न आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असून ग्लूटेन फ्री असल्यामुळे गव्हापेक्षा हेल्दी ठरते.  याशिवाय नारळाची पावडर लो कॅलरी, लो फॅट आणि जास्तीत जास्त फायबर्सने परिपूर्ण असते. ज्यामुळे बराचवेळ पोट भरलेलं जातं. तुम्ही आहारात या पीठापासून तयार केलेली चपाती खाऊ शकता.

Web Title: How Many Roti Should I Eat For Weight Loss : How Many Chapatis Can You Have in a Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.