आरोग्यासाठी लाभदायक ठरतं या ८ धातुंच्या ताटात जेवणं; आयुर्वेदाचार्यांनी सांगितले गुणकारी फायदे - Marathi News | Eating in these 8 metal is beneficial for health healthiest utensil to eat food | Latest sakhi News at Lokmat.com
>आहार -विहार > आरोग्यासाठी लाभदायक ठरतं या ८ धातुंच्या ताटात जेवणं; आयुर्वेदाचार्यांनी सांगितले गुणकारी फायदे

आरोग्यासाठी लाभदायक ठरतं या ८ धातुंच्या ताटात जेवणं; आयुर्वेदाचार्यांनी सांगितले गुणकारी फायदे

Healthiest utensil to eat food : अजूनही अनेक ठिकाणी झाडाच्यां पानांवर तर कुठे मातीच्या भांड्यांमधून खाल्लं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 01:47 PM2021-07-28T13:47:04+5:302021-07-28T14:00:32+5:30

Healthiest utensil to eat food : अजूनही अनेक ठिकाणी झाडाच्यां पानांवर तर कुठे मातीच्या भांड्यांमधून खाल्लं जातं.

Eating in these 8 metal is beneficial for health healthiest utensil to eat food | आरोग्यासाठी लाभदायक ठरतं या ८ धातुंच्या ताटात जेवणं; आयुर्वेदाचार्यांनी सांगितले गुणकारी फायदे

आरोग्यासाठी लाभदायक ठरतं या ८ धातुंच्या ताटात जेवणं; आयुर्वेदाचार्यांनी सांगितले गुणकारी फायदे

Next
Highlights पितळाच्या भांड्यात जेवण जास्तवेळ गरम राहतं. पितळाच्या भांड्यात जेवल्यानं शरीराचं पीएच लेव्हल नियंत्रणात राहतं. तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. कारण यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. जे पाण्यामधून बॅक्टेरिया काढून टाकतात.

आपण आहारात काय खातो आणि कोणत्या ताटात खातो या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी महत्वाच्या असतात.  सध्या लोक चीनी माती आणि स्टीलच्या भांड्यांचा वापर जेवणासाठी जास्त करतात. सणासुदीला किंवा पाहूणे आल्यानंतर आपण जेवणाची ताटं पारंपारिक आणि रोजच्यापेक्षा थोडी वेगळी ठेवतो. अजूनही अनेक ठिकाणी झाडाच्यां पानांवर तर कुठे मातीच्या भांड्यांमधून खाल्लं जातं. मेडिकल कॉलेजचे सहायक प्रोफेसर डॉ. भारत भूषण आणि आयुर्वेदाचार्य डॉ. राहुल चतुर्वेदी यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना आयुर्वेदानुसार कोणत्या भांड्यांमध्ये जेवल्यानं शरीराला फायदे मिळतात याबाबत सांगितले आहे. 

तज्ज्ञ काय सांगतात?

डॉ. भारत भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रामध्ये नमुद केले आहे की, राजा-महाराजा लोक हे नेहमी सोन्या चांदीच्या थाळीतच जेवायचे. कारण त्यांना शुत्रूंकडून जेवणात विष मिसळण्याची भीती असायची. विष चांदीमध्ये एकत्र झाल्यानंतर त्याची चव आणि खाण्याचा रंग दोन्ही बदलायचं. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार कांस्याच्या भांड्यात जेवायला हवं. तांब्याच्या भांड्याचा वापर खाण्यासाठी करू नये कारण ते सिट्रिस फूडसह रिएक्ट होते. सिट्रिस फूड खाल्ल्यानं जेवणाचा रंग बदलतो. पाणी नेहमी तांब्याच्या भांड्यातून प्यायाला हवं ते लाभदायक ठरतं. पण तांब्याच्या थाळीत जेवल्यानं अपनाची समस्या निर्माण होऊ शकते.  

कोणत्या प्रकारच्या थाळीत जेवल्यानं काय फायदे मिळतात?

1) सोन्याचं ताट-

सध्या सोन्याच्या ताटात जेवताना कोणीही फारसं दिसून येत नाही. राजा महाराजांच्या काळात सोन्याच्या थाळीचा जेवणासाठी वापर केला जात होता.  तज्ज्ञांच्यामते  शरीरातील धातू 65 अकार्बनिक पदार्थ आणि 35 टक्के कार्बनिक वस्तूंपासून तयार झालेले असतात. या धातुंमुळे शरीराला मिळणारे फायदे वाढवण्यासाठी सोनं फायद्याचं ठरतं. एंटी बायोटीकप्रमाणे आजारांना दूर ठेवण्याचे काम या धातूद्वारे केले जाते.

२) पितळाचं ताट

आयुर्वेदानुसार पितळाचं ताट बुद्धी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पितळाच्या भांड्यात जेवण जास्तवेळ गरम राहतं. पितळाच्या भांड्यात जेवल्यानं शरीराचं पीएच लेव्हल नियंत्रणात राहतं. या ताटात जेवल्यानं अन्नातील सर्व पौष्टिक घटकांचे मूल्य वाढवते. डाळीतील प्रोटिन्स पुरेपूर मिळण्यास मदत होते. पितळाच्या ताटात अन्न खाल्ल्यास गॅसचा त्रास होत नाही. पचनक्रिया चांगली राहते. 

३) चांदीचं ताट

डॉ. राहुल चतुर्वेदी म्हणतात की चांदी रक्ताचे शुद्धीकरण करते आणि शरीराची उष्णता थंड करते. म्हणून, चांदीच्या ताटात खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.  

४) तांब्याचे ताट

तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. कारण यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, जे पाण्यामधून बॅक्टेरिया काढून टाकतात, परंतु तांब्यामध्ये खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नसते. कारण तांबे विशिष्ट पदार्थांसह प्रतिक्रिया देतो आणि विषारी बनते. 

५) अल्यूमिनियम

अल्यूमिनियमचा दूर दूरपर्यंत काही उपयोग नाही. बाकीचे धातू महाग आहेत, म्हणून लोक अॅल्युमिनियम आणि स्टील वापरतात. जर आपण अ‍ॅल्युमिनियम व स्टीलमध्ये अन्न शिजवले तर फक्त १३ टक्के गुणवत्ता उरते. बाकीचे गुण निघून जातात. 

६) मातीची भांडी

आयुर्वेदात मातीच्या प्लेटमध्ये खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदाचार्य राहुल चतुर्वेदी म्हणतात की मातीच्या ताटात खाल्ल्याने मातीत गुणधर्म शरीराल मिळतात. मातीच्या भांड्यात स्वयंपाक आणि जेवण दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

७) केळ्याचे पान

उत्तर भारतातील पिंपळाच्या पानांमध्ये आणि दक्षिण भारतात केळीच्या पानात अन्न देण्याची प्रथा आजही प्रचलित आहे. या पानांमध्ये अन्न खाल्ल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. केळीच्या पानात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. जे बर्‍याच रोगांपासून संरक्षण करतात. त्यात अन्न खाल्ल्यास आरोग्यास बरेच फायदे मिळतात. 
 

Web Title: Eating in these 8 metal is beneficial for health healthiest utensil to eat food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

टायफाॅईडची साथ वेगाने पसरतेय, त्यापासून स्वतः ला सुरक्षित ठेवण्यासाठी करा ४ गोष्टी - Marathi News | As typhoid fever spreads, do these things to stay yourself safe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टायफाॅईडची साथ वेगाने पसरतेय, त्यापासून स्वतः ला सुरक्षित ठेवण्यासाठी करा ४ गोष्टी

टायफॉईड होऊन फणफण ताप येण्याची अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहत आहोत. आपल्याही घरात टायफॉईडचा शिरकाव होऊ नये, म्हणून नक्कीच या गोष्टींचे पालन करा. ...

Weight loss Tips : वाढत्या वजनाचं टेंशन घेण्यापेक्षा एक्स्ट्रा फॅट वाढूच नये म्हणून 'या' टिप्स लक्षात ठेवून फिट राहा - Marathi News | How To loss weight Faster : Weight loss Tips Avoid this 10 things for avoid fat gain and weight gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढत्या वजनाचं टेंशन घेण्यापेक्षा एक्स्ट्रा फॅट वाढूच नये म्हणून 'या' १० टिप्स लक्षात ठेवून फिट राहा

How To loss weight Faster : बारीक झाल्यानंतर पुन्हा  घालता येतील असा विचार करून वर्षानुवर्ष घट्ट होणारे कपडे तसेच ठेवले जातात. हे सगळं करण्यापेक्षा शरीरावरची चरबी वाढू नये म्हणून आहार घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या ...

तुमची जीभ बघा, ती सांगते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता! लक्षणं कोणती, उपाय काय? - Marathi News | Look at your tongue, it says vitamin D deficiency! What are the symptoms, what is the remedy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमची जीभ बघा, ती सांगते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता! लक्षणं कोणती, उपाय काय?

शरीराचं कार्य उत्तम चालावं, यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा एक घटक म्हणजे व्हिटॅमिन डी. आरोग्याच्या अशा काही तक्रारी जाणवल्या तर व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे, हे लक्षात घ्या.  ...

Sexual Health : 'या' कारणामुळे कमी होतोय लैगिंक जीवनातील रस; सुखी वैवाहीक जीवनासाठी वेळीच माहीत करून घ्या - Marathi News | Sexual Health : How being overweight can impact your sex life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' कारणामुळे कमी होतोय लैगिंक जीवनातील रस; सुखी वैवाहीक जीवनासाठी वेळीच माहीत करून घ्या

Sexual Health : ती किंवा तो फारसा आकर्षक दिसत नसल्यामुळे शरीरसंबंध ठेवण्यात रस वाटत नाही अशा जोडप्यांच्या तक्रारी तुम्ही ऐकून असाल. ...

Bhatti Vada pav In Mumbai | Wood Fired Vada Pav | Mumbai Street Food | Being Bhukkad - Marathi News | Bhatti Vada pav In Mumbai | Wood Fired Vada Pav | Mumbai Street Food | Being Bhukkad | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :Bhatti Vada pav In Mumbai | Wood Fired Vada Pav | Mumbai Street Food | Being Bhukkad

तुम्ही आज पर्यंत स्टोव्ह वर बनवलेला वडापाव खाल्ला असेल पण तुम्ही कधी भट्टी मध्ये बनवलेला वडापाव खाल्ला आहे का ? आज आम्ही घेऊन आलो आहे ७० वर्षांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील मुंबई येथील सर्वोत्कृष्ट वडापाव निर्माते शिंदे बंधू यांनी पिढ्यानं पिढ ...

पितृपक्षाच्या स्वयंपाकात घरोघरी केली जाणारी अमसूल चटणी! पित्तशामक चटणीची चटकदार रेसिपी  - Marathi News | Amsul chutney made at home in pitru paksha! A savory recipe for chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपक्षाच्या स्वयंपाकात घरोघरी केली जाणारी अमसूल चटणी! पित्तशामक चटणीची चटकदार रेसिपी 

कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात पितृपक्षाच्या स्वयंपाकात हमखास केला जाणारा एक पदार्थ म्हणजे अमसूल चटणी. ही चटणी करण्यासाठी घ्या ही सोपी रेसिपी. ...