Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > व्यायाम न करताही वजन उतरेल भराभर, रोज 'असं' डाएट करा, फक्त ३० दिवसांत दिसाल फिट

व्यायाम न करताही वजन उतरेल भराभर, रोज 'असं' डाएट करा, फक्त ३० दिवसांत दिसाल फिट

How To Lose Weight Without Doing Exercise: वजन कमी करायचं पण व्यायामाला वेळच नाही? असं तुमचंही होत असेल तर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR) यांनी महिलांसाठी सांगितलेल्या या खास टिप्स पाहा... (best diet chart for weight loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2024 11:49 AM2024-05-22T11:49:26+5:302024-05-22T15:29:39+5:30

How To Lose Weight Without Doing Exercise: वजन कमी करायचं पण व्यायामाला वेळच नाही? असं तुमचंही होत असेल तर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR) यांनी महिलांसाठी सांगितलेल्या या खास टिप्स पाहा... (best diet chart for weight loss)

diet chart by icmr for the women who do not exercise regularly, best diet chart for weight loss | व्यायाम न करताही वजन उतरेल भराभर, रोज 'असं' डाएट करा, फक्त ३० दिवसांत दिसाल फिट

व्यायाम न करताही वजन उतरेल भराभर, रोज 'असं' डाएट करा, फक्त ३० दिवसांत दिसाल फिट

Highlightsयोग्य पद्धतीने आहार घेऊन वजन कमी कसं करायचं, याचा खास सल्ला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR ने महिलांना दिला आहे

वजन वाढतंय ही तक्रार अनेकींची असते. पण बऱ्याचदा असं होतं की घरातलं काम, ऑफिसचं काम हे सगळं सांभाळताना घरातल्या महिलांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. दिवसाचे २४ तास सुद्धा पुरत नाहीत, तिथं व्यायामासाठी वेळ कसा आणि कधी काढावा, हा प्रश्न त्यांना पडतो. म्हणूनच तुमचंही असंच झालं असेल तर आता व्यायाम न करताही केवळ योग्य पद्धतीने आहार घेऊन वजन कमी कसं करायचं, याचा खास सल्ला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR ने महिलांना दिला आहे. हे काही आहाराचे नियम पाळले तर नक्कीच काही दिवसांतच तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. (diet chart by ICMR for the women who do not exercise regularly)

 

व्यायाम न करता वजन कसं कमी करायचं?

ICMR ने जो डाएट चार्ट दिला आहे, तो अशा महिलांसाठी आहे ज्याचं वजन ५५ किलोच्या आसपास असून त्यांचा बीएमआय १८-५- २३ या प्रमाणात आहे. 

केस आणि त्वचा होईल सुंदर, तब्येतही राहील उत्तम- ओमेगा ३ ॲसिड देणारे ६ पदार्थ रोज खा

वजन कमी करण्यासाठी महिलांनी साधारण ४७० कॅलरी मिळतील एवढा नाश्ता करावा. त्यापैकी ६० ग्रॅम भिजवून उकडलेलं कडधान्य असावं. ३० ग्रॅम हरबरे, राजमा असे पदार्थ असावेत, ५० ग्रॅम हिरव्या पालेभाज्या असाव्या तर २० ग्रॅम सुकामेवा असावा.

 

दुपारच्या जेवणातून साधारणपणे ७४० कॅलरी मिळतील अशा पद्धतीने आहार असावा. त्यानुसार तुमच्या जेवणात ८० ग्रॅम धान्य, २० ग्रॅम डाळी, १५० ग्रॅम भाज्या, ५० ग्रॅम हिरव्या पालेभाज्या, १५ ग्रॅम तेल, १५० मिली दही किंवा पनीर तर ५० ग्रॅम फळं असावे. 

थायरॉईडचा त्रास कमी करणारी ५ योगासनं, वाचा सेलिब्रिटी ट्रेनर अंशुका परवानी यांचा खास सल्ला...

रात्रीच्या जेवणातून साधारण ४१५ कॅलरी मिळाव्यात. यात पुन्हा तुमच्या जेवणात ६० ग्रॅम धान्य, १५ ग्रॅम डाळी, ५० ग्रॅम भाज्या, ५ ग्रॅम तेल, १०० मिली दही आणि ५० ग्रॅम फळं अशा पद्धतीने तुमचं ताट सजलेलं असावं. दोन जेवणांच्या मध्ये भूक लागलीच तर इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही ५० मिली दूध पिऊ शकता. साखर, मैदा असं सगळं टाकून जर अशा पद्धतीचा निरोगी, सकस आहार घेतला तर वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल. 
 

Web Title: diet chart by icmr for the women who do not exercise regularly, best diet chart for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.