lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > शुगरचा त्रास आहे, रोज रात्री भात खाल्ला तर डायबिटिस वाढतो का? पाहा डॉक्टरांचा सल्ला

शुगरचा त्रास आहे, रोज रात्री भात खाल्ला तर डायबिटिस वाढतो का? पाहा डॉक्टरांचा सल्ला

Can Diabetic Patient Eat Rice At Night Expert Advice (Diabetes control sathi upay) : गोड आणि तांदूळ खाण्याबद्दल बरेच गैरसमज लोकांच्या मनात असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 10:30 PM2024-04-04T22:30:59+5:302024-04-05T15:22:15+5:30

Can Diabetic Patient Eat Rice At Night Expert Advice (Diabetes control sathi upay) : गोड आणि तांदूळ खाण्याबद्दल बरेच गैरसमज लोकांच्या मनात असतात.

Can Diabetic Patient Eat Rice At Night Expert Advice : Steps To Manage Your Diabetes For Life | शुगरचा त्रास आहे, रोज रात्री भात खाल्ला तर डायबिटिस वाढतो का? पाहा डॉक्टरांचा सल्ला

शुगरचा त्रास आहे, रोज रात्री भात खाल्ला तर डायबिटिस वाढतो का? पाहा डॉक्टरांचा सल्ला

डायबिटीसच्या रुग्णांनी आपल्या डाएटबाबत नेहमीच जागरूक असायला हवं कारण अन्हेल्दी पदार्थांचे सेवन केल्याने शुगर लेव्हर वाढू शकते.  (Diabetes Management Tips) ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. डायबिटीस असल्यास तुम्ही काय खाताय, किती खाताय याकडे लक्ष देणं फार महत्वाचे असते. (Steps To Manage Your Diabetes For Life) गोड आणि तांदूळ खाण्याबद्दल बरेच गैरसमज लोकांच्या मनात असतात. डायबिटीजचे रुग्ण रात्री भात खाऊ शकतात की नाही याबाबत लोकांच्या मनात बरेच गैरसमज असतात. डायटिशन आणि न्युट्रिशनस्ट याबाबत अधिक माहिती देतात. (Can Diabetic Patient Eat Rice At Night Know Expert Advice)

भाताचा प्रकार (Diabetes Control Tips)

डायबिटीसचे रुग्ण कोणत्या प्रकारचा भात खात आहे याकडे लक्ष देणं फार महत्वाचे असते.  २ प्रकारचे तांदूळ असतात. जसं की ब्राऊन राईस आणि दुसरा रिफाईंड राईस, ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो याचा अर्थ असा की रिफाईंड भाताच्या तुलनेत तुम्ही तृणधान्यांचा आहारात समावेश  करू शकता. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. 

ओटी पोट लटकतंय-मागून फिगर जाड दिसते? सकाळी उपाशी पोटी 'हा' पदार्थ घ्या-स्लिम व्हाल

पोर्शन साईज

डायबिटसचे रुग्ण जर रात्रीच्यावेळी किती भात खात आहेत याकडे लक्ष देणं महत्वाचे आहे. रात्रीच्यावेळी ओव्हरइंटींग टाळायला हवं रात्री झोपण्याआधी लाईट मील घ्यावे. झोपण्याच्या तीन तास आधी खा. रात्री झोपण्याच्या आधी भात खाताना पोर्शन साईजकडे लक्ष द्या. भात कमी कमी प्रमाणात खा.

सोबत काय खायचे?

डायबिटीसचे रुग्ण भातबरोबर काय खात आहेत हे समजून घेणं महत्वाचे आहे. रात्रीच्यावेळी भात खात असाल तर प्रोटीन्स, फायबर्स रिच फुड्सचे सेवन करू शकता. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होईल. अचानक ब्लड शुगल लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

अन्नाचा कण दिसताच लगेच मुंग्यांची रांग लागते? ३ ट्रिक्स-१ सेकंदात गायब होतील मुंग्या

कोणत्यावेळी खाता हे महत्वाचे

डायबिटीसचे रुग्ण रात्री भात खाऊ शकतात. फक्त तुम्हाला योग्यवेळ माहीत असायला हवी. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. डायबिटीसचे रुग्ण इंसुलिन घेत असतील तर रात्री भात खाण्याआधी एक्सपर्ट्सचा सल्ला घ्यायला हवा. रोज रात्री भात न खाता कधीतरी खायला हवं. 

Web Title: Can Diabetic Patient Eat Rice At Night Expert Advice : Steps To Manage Your Diabetes For Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.