lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट सुटलंय-कंबर मोठी दिसते? 7 दिवस या पद्धतीने दुधीचे सेवन करा, स्लिम होईल पोट-मेंटेन व्हाल

पोट सुटलंय-कंबर मोठी दिसते? 7 दिवस या पद्धतीने दुधीचे सेवन करा, स्लिम होईल पोट-मेंटेन व्हाल

Bottle Gourd Can Help You Lose Weight : जेवल्यानंतर जड फिल होणं टाळता येतं आणि जास्त खाण्याच्या क्रेव्हिंग्सही टाळता येतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 02:10 PM2024-04-21T14:10:32+5:302024-04-21T15:14:17+5:30

Bottle Gourd Can Help You Lose Weight : जेवल्यानंतर जड फिल होणं टाळता येतं आणि जास्त खाण्याच्या क्रेव्हिंग्सही टाळता येतात. 

Bottle Gourd Can Help You Lose Weight : According To Research Bottle Gourd Can Help You Lose Weight | पोट सुटलंय-कंबर मोठी दिसते? 7 दिवस या पद्धतीने दुधीचे सेवन करा, स्लिम होईल पोट-मेंटेन व्हाल

पोट सुटलंय-कंबर मोठी दिसते? 7 दिवस या पद्धतीने दुधीचे सेवन करा, स्लिम होईल पोट-मेंटेन व्हाल

पोटावरची चरबी वाढणं, एक्स्ट्रा चरबी वाढणं हा एक मोठा टास्क आहे. (Health Tips) आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत लठ्ठपणा कमी करणं खूपच कठीण झालंय, फॅट्स कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (Weight Loss Tips) मोठं पोट आणि कंबरेच्या लटकणाऱ्या चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. (Bottle Gourd Can Help You Lose Weight)

काही सोपे नियम वजन कमी करण्यासााठी फायदेशीर ठरू शकतात.  वजन कमी करण्यासाठी दूधीचा ज्यूस फायदेशीर ठरतो.  (According To Research Bottle Gourd Can Help You Lose Weight) कारण  यात कमीत कमी कॅलरीज असतात हाय न्युट्रिशनचा चांगला स्त्रोत आहे. वजन कमी करण्यासाठी दूधीचा ज्यूस फायदेशीर ठरतो. याच्या सेवनाने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. 

लिब्रेट. कॉमच्या रिपोर्टनुसार  ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी दूधीचा रस अत्यंत प्रभावी आहे. वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये या रसाचा नियमित समावेश केला पाहिजे. हा रस जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि लोहाने परिपूर्ण असल्याने तो अत्यंत पौष्टिक आहे. हा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास भूक कमी करण्यासाठी ओळखले जाते.

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

दुधीचा ज्यूस पिण्याचे फायदे

१) लो कॅलरी

दूधीचा ज्यूस कमी कॅलरीजयुक्त असतो. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जेवल्यानंतर जड फिल होणं टाळता येतं आणि जास्त खाण्याच्या क्रेव्हिंग्सही टाळता येतात. 

२) पोषक तत्वांचा स्त्रोत

दुधीचा ज्यूस व्हिटामीन्स, मिनरल्स आणि अन्य पोषक तत्वांचा स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीराच्या गरजा कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे हेल्दी राहण्यास मदत होते. 

रात्री झोपताना १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ मिसळून प्या; ५ मिनिटांत ढाराढूर व्हाल, शांत झोप येईल

दुधीचा ज्यूस घरी कसा बनवायचा?

एक मध्यम आकाराची दूधी घ्या. दूधी धुवून सालं काढून घ्या आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर हे तुकडे मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये घाला आणि व्यवस्थित वाटून घ्या. नंतर गाळून घ्या दूधीचा ज्यूस तयार आहे. थंड पाण्यासोबत पिण्यासाठी एका भांड्यात घाला त्यानंतर थोडावेळ  तसंच  ठेवा. 

दुधीचा ज्यूस कसा प्यायचा? (How To Consume Bottle Gourd)

सकाळी  रिकाम्या पोटी दूधीचा ज्यूस प्या.  तुम्ही कोथिंबीरीसोबत हे पाणी पिऊ शकता. यात  लिंबाचा रसही मिसळू शकता. रोज सकाळी याचे सेवन करा. नियमित दूधीचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी  करण्यास मदत होते. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, डाएट किंवा वर्कआऊट रुटीनने सुरूवात करा. 

Web Title: Bottle Gourd Can Help You Lose Weight : According To Research Bottle Gourd Can Help You Lose Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.