Join us  

भात जास्त खातच नाही-तरी पोट सुटलं? नाश्त्याला ५ पदार्थ खा, गायब होईल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:24 AM

Best Breakfast For Weight Loss (Vajan kami karnyasathi nashtyala kay khayche) : नाश्ता फक्त पोट भरण्यासाठी नसून त्यातून तुम्हाला काही आवश्यक घटकही मिळालयला हवेत. ज्यामुळे तुमचा मेटाबॉलिझ्म वाढेल

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्हाला कॅलरीज बर्न करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा माहीत असायला हव्यात. (Weight Loss Food) हेल्दी पद्धतीने तुम्ही वजन कमी करू सकता. (Vajan kami karnyache upay) वजन कमी करण्यासाठी नाश्ता आणि दोन्ही वेळच्या जेवणाला तुम्ही काय खाता हे फार महत्वाचे असते. (Breakfast Ideas For Weight Loss)

नाश्ता फक्त पोट भरण्यासाठी नसून त्यातून तुम्हाला काही आवश्यक घटकही मिळालयला हवेत. ज्यामुळे तुमचा मेटाबॉलिझ्म वाढेल आणि शरीराला कॅलरी बर्न होण्यास मदत होईल. आहारतज्ज्ञ शिखा यांच्यामते वजन कमी करण्यासाठी आणि कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्ही कॅलरी बर्निंगकडे जास्त लक्ष द्यायला  हवं. नाश्त्यामध्ये काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करू शकता. (Top 5 Breakfast Food For Weight Loss)

रिसर्चनुसार वजन कमी करण्यासााठी काहीवेळा कॅलरी डिफिसेट मोडमध्ये जाणं आवश्यक असतं. म्हणजेच जास्तवेळ उपाशी न राहता तुम्ही काय खाता, किती खाता याचा अंदाज ठेवावा.   इडली सांभार, पोहा, उपमा, बीन्स सॅलेड्स, क्विनोआ पॅनकेक्स,  फळं, दही अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. प्रोटीनमुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि कॅलरीज बर्न होण्यासही मदत होते. नाश्त्याला तुम्ही ग्रीक योगर्ट, टोफू किंवा प्रोटीन स्मूदीचा समावेश करू शकता. प्रोटीनमुळे मांसपेशी चांगल्या राहण्यास मदत होते. कॅलरीजसुद्धा बर्न होतात.

1) धान्य

नाश्त्याला ओटमील, क्विनोआ, ब्राऊन ब्रेड, ब्रान सिरियल यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे एनर्जी मिळेल आणि जास्तवेळ पोट भरलेलं राहील. यात फायबर्स आणि इतर पोषक तत्व  असात. फायबर्स ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. 

थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा; बळकट हाडं-आजार राहतील लांब

२) हेल्दी फॅट्स

नाश्त्याला सुका मेवा, बीया, नट बटर, एवोकाडो, ऑलिव्ह ऑईलचा समावेश करा. हेल्दी फॅट्समुळे बराचवेळ तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही ओव्हर इटींग करणार नाही. 

खूप मेहनत करूनही वजन कमी नाहीये? या आजारामुळे वजन घटवणं होतं कठीण-४ वेट लॉस टिप्स

३) ग्रीन टी

सकाळची सुरूवात ग्रीन टीने करा. यातील  कॅटेचिन आणि कॅफेन मेटाबॉलिझ्म वाढवून कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात.  ग्रीन टी फॅट्स जाळण्यास प्रभावी ठरते. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. हेल्दी  आहार आणि व्यायामावे तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

४) बेरीज

नाश्त्याला ब्लुबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी यांसारख्या एंटीऑक्सिडेंट्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. बेरीजमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स फॅट्स कमी करण्यात आणि कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात. 

डाग लागलेली केळी खायची की फेकून द्यायची? डॉक्टर सांगतात तब्येतीसाठी कोणती केळी उत्तम...

५) चिया सिड्स

नाश्त्याला फायबर्स, प्रोटीन्स, ओमेगा ३ फॅटी एसिड्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. चिया सिड्स पाणी शोषून घेण्यास मदत करतात ज्यामुळे पोट फुगत नाही आणि जास्तवेळ पोट भरलेलं राहतं आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. यात फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स