आपल्या शरीरासाठी काही प्रमाणात कॉपर गरजेचं असतं. ते शरीराला योग्य स्वरुपात मिळण्याचा एक मार्ग म्हणजे रोज सकाळी उपाशीपोटी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणे. रात्री झोपण्यापुर्वी या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते उपाशीपोटी प्यायचं. काही विशिष्ट त्रास असणाऱ्या लोकांसाठी तर हे पाणी म्हणजे जणू काही अमृतासमान आहे (benefits of drinking 1 glass of water stored in copper glass). तांब्याच्या भांड्यातलं पाणी नियमितपणे प्यायल्यास आरोग्याला कोणकोणते फायदे होतात ते पाहूया..(Health Benefits of Drinking Water from a Copper Bottle)
तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायल्याने आरोग्याला होणारे लाभ
१. जे लोक ॲनिमिक असतात त्यांच्यासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं खूप फायदेशीर ठरतं. त्यांचं हिमाेग्लोबिन वाढण्यास मदत होते कारण हे पाणी प्यायल्यामुळे शरीराचं लोह शोषून घेण्याचं प्रमाण वाढत जातं. संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. त्यामुळे एनर्जी वाढण्यासही मदत होते.
किचनमधला ओला कचरा रोपांसाठी ठरतो उत्कृष्ट खत- 'या' पद्धतीने वापरा, बाग कायम राहील हिरवीगार
२. हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठीही तांब्याच्या भांड्यातलं पाणी मदत करतं. कारण त्यामुळे रक्ताभिसरणही चांगलं होतं. शिवाय बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही हे पाणी उपयुक्त ठरतं.
३. ज्या लोकांचे केस कमी वयातच पांढरे होत आहेत, त्यांनीही तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं. यामुळे बायोटीन, व्हिटॅमिन बी १२ आणि लोह शोषून घेण्याचं प्रमाण वाढतं.
पांढऱ्या केसांमुळे कमी वयातच म्हातारे दिसताय? 'या' पद्धतीने आवळा वापरा- केस काळेभोर राहतील
हे सगळे घटक जर शरीराला पुरेशा प्रमाणात मिळाले तर केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं. किंवा काही जणांच्या बाबतीत तर पांढरे केस काळेही होतात.
४. त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी नियमितपणे प्या. त्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. शरीरातला ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होण्यासाठी त्याची मदत होते.
काय सांगता विकतसारखे खमंग बटाटेवडे घरी जमतच नाहीत? घ्या परफेक्ट वड्यांची सिक्रेट रेसिपी
त्यामुळे त्वचा छान होते. अशी माहिती आहारतज्ज्ञांनी nutrilicious.byritajain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितलं की तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिण्याचा अतिरेक करू नका. कधी कधी ते शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतं. दिवसाच्या सुरुवातीला १ ते २ ग्लास पाणी पिणंच पुरेसं आहे. त्यापेक्षा जास्त नको.
Web Summary : Drinking water stored in copper vessels offers multiple health benefits. It aids iron absorption, boosts energy, improves heart health, prevents premature graying of hair, and enhances skin health. Consume one to two glasses daily.
Web Summary : तांबे के बर्तन में रखा पानी पीने से कई स्वास्थ्य लाभ मिलते हैं। यह आयरन के अवशोषण में मदद करता है, ऊर्जा बढ़ाता है, हृदय स्वास्थ्य में सुधार करता है, बालों को समय से पहले सफेद होने से रोकता है और त्वचा के स्वास्थ्य को बढ़ाता है। रोजाना एक से दो गिलास पिएं।