Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नेहमीचा चहा करताना त्यात घाला ‘या’ ३ गोष्टी, चहा लागेल फक्कड-सुटलेलं पोटही होईल कमी

नेहमीचा चहा करताना त्यात घाला ‘या’ ३ गोष्टी, चहा लागेल फक्कड-सुटलेलं पोटही होईल कमी

Weight Loss Tea : चहा तर सोडता येत नाही मग, त्या चहालाच अधिक पौष्टिक करण्याची ही युक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:26 IST2025-07-07T10:18:11+5:302025-07-07T12:26:45+5:30

Weight Loss Tea : चहा तर सोडता येत नाही मग, त्या चहालाच अधिक पौष्टिक करण्याची ही युक्ती

Ayurvedic doctor shares 3 ingredients to burn belly fat | नेहमीचा चहा करताना त्यात घाला ‘या’ ३ गोष्टी, चहा लागेल फक्कड-सुटलेलं पोटही होईल कमी

नेहमीचा चहा करताना त्यात घाला ‘या’ ३ गोष्टी, चहा लागेल फक्कड-सुटलेलं पोटही होईल कमी

Weight Loss Tea : भारतात जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात चहानं होते. चहाशिवाय अनेकांचा दिवस चांगला जात नाही. मात्र, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर चहा बंद करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अशाही काही गोष्टी असतात ज्या चहात टाकल्या तर आपल्याला शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यास मदत मिळते. 

आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी चहा टाकायच्या ३ गोष्टींबाबत सांगितलं आहे. चला तर पाहुया या चहात कोणत्या गोष्टी टाकल्यानं वजन कमी करण्यास मदत मिळते.

पुदिना

लठ्ठपणा कमी करण्यासाठी डॉक्टर सलीम जैदी सकाळी चहात पुदिन्याची पानं टाकण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांनुसार, पुदिन्यात काही असे नॅचरल तत्व असतात, जे पचनक्रिया सुधारतात आणि भूक नियंत्रित करतात. यानं वजन कमी करण्यास मदत मिळते. त्याशिवाय पुदिन्याच्या चहानं ब्लोटिंग आणि जडपणाही कमी होतो. ज्यामुळे पोट हलकं वाटतं. सोबतच पोटातील उष्णताही यानं कमी होते.

बडीशेप

आपल्या सकाळच्या चहामध्ये बडीशेप टाकू शकता. बडीशेपमधील एंथोल नावाच्या तत्वानं पचन तंत्र मजबूत होतं आणि भूक कंट्रोलमध्ये राहते. आयुर्वेदानुसार, बडीशेप पचनासाठी सगळ्यात चांगली असते. बडीशेप टाकलेल्या चहानं शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात आणि चरबी कमी करण्यास यानं मदत होते.

हिरवी वेलची

बडीशेप आणि पुदिन्यासोबतच डॉक्टर चहामध्ये वेलची टाकण्याचा सल्ला देतात. यानं चहाची टेस्ट तर वाढतेच, सोबतच मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासही मदत मिळते. शरीरात जमा एक्स्ट्रा फॅट हळूहळू कमी करण्यास मदत मिळते. खासकरून काळ्या चहात वेलची टाकून प्यायल्यास अधिक फायदा मिळतो.

जर आपल्याला नॅचरल पद्धतीनं वजन कमी करायचं असेल तर या गोष्टी चहात टाकू शकता. तसेच चहामध्ये आपण लिंबाचा रस आणि मधही टाकू शकता. तसेच चहात दूध टाकणं टाळा यानंही फायदा होईल. या गोष्टींसोबतच लाइफस्टाईल हेल्दी ठेवा. नियमितपणे व्यायामही करा.

Web Title: Ayurvedic doctor shares 3 ingredients to burn belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.