Join us

आमिर खान म्हणतो- नुसताच व्यायाम करून उपयोग नाही, वजन घटविण्यासाठी 'ही' गोष्ट खूप गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 09:25 IST

Weight Loss Tips by Aamir Khan: वाढतं वजन कसं कमी करावं, असा प्रश्न पडला असेल तर अभिनेता आमिर खान याने दिलेली ही माहिती एकदा वाचा..

ठळक मुद्देव्यायाम करताय पण तरीही तुमचंही वजन कमी होत नसेल तर अमीर खान जी गोष्ट सांगतो आहे, ती तुमच्या बाबतीत तर खरी होत नाही ना हे एकदा तपासून पाहा..

अतिशय लवचिक शरीर म्हणून ओळखले जाणारे जे काही बॉलीवूड अभिनेते आहेत, त्यांच्यापैकी एक म्हणजे आमिर खान. आपल्याला माहितीच आहे की आमिर खान वर्षातून अगदी एखादा चित्रपट करतो. पण त्या चित्रपटासाठी तो स्वतःला अतिशय उत्तम पद्धतीने तयार करतो. एखाद्या चित्रपटात त्याचं वजन अगदी वाढलेलं असतं, तर दुसऱ्याच चित्रपटात तो अगदी स्लिम झालेला दिसतो. वजनामधले हे चढउतार त्याला एवढ्या जलद कसे साधता येतात, याविषयी त्याने मागे एका मुलाखतीत माहिती दिली होती. ती माहिती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही नक्कीच उपयुक्त ठरणारी आहे. (Weight Loss Tips by Aamir Khan)

 

हल्ली वाढत्या वजनाची चिंता अनेक जणांना भेडसावते आहे. कामाचं बदललेलं स्वरूप आणि आहार पद्धतीत झालेला मोठा बदल यामुळे लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच वजन वाढण्याचा त्रास होतो आहे. आता वजन वाढायला लागलं की हल्लीची तरुण मंडळी फक्त व्यायाम करण्यावर भर देतात.

अर्ध्या तासात टोमॅटो केचअप तयार! घ्या कोणतंही प्रिझर्व्हेटीव्ह, केमिकल्स नसणाऱ्या केचअपची सोपी रेसिपी 

पण आमिर खान म्हणतो की तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामावरच भर देत असाल तर ते काहीही उपयोगाचे नाही. व्यायामाच्या जोडीला जोपर्यंत तुमचा योग्य आहार येत नाही तोपर्यंत वजन कमी होणार नाही. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आमीर म्हणतो की वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे डाएट. ५० टक्के भर डाएटवर, २५ टक्के भर व्यायामावर आणि २५ टक्के भर आराम करण्यावर असा त्याचा वेटलॉस फंडा आहे. 

 

हल्ली आपण बरेच असे लोक बघतो की जे जीममध्ये जाऊन एकेक तास व्यायाम तर करतात, पण जिभेवर त्यांचा ताबा नसतो.

Home Decor: छाेटंसं घरही दिसेल प्रशस्त आणि मोठ्ठं! ५ गोष्टी करा, तुमचं घरही दिसेल आलिशान सुंदर

जंकफूड, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ खाल्ले जातात आणि मग जीममध्ये केलेली मेहनत वाया जाते. तुम्हीही व्यायाम करताय पण तरीही तुमचंही वजन कमी होत नसेल तर अमीर खान जी गोष्ट सांगतो आहे, ती तुमच्या बाबतीत तर खरी होत नाही ना हे एकदा तपासून पाहा..

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआमिर खानअन्नआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना