Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > रेल्वे स्टेशनवर बसायला जागा नव्हती; मग तीनं चक्क बॉयफ्रेंडलाच खुर्ची बनवलं; फोटो पाहून लोक म्हणाले....

रेल्वे स्टेशनवर बसायला जागा नव्हती; मग तीनं चक्क बॉयफ्रेंडलाच खुर्ची बनवलं; फोटो पाहून लोक म्हणाले....

Social Viral : अनेकजण आपल्या पार्टनरला बरं वाटावं म्हणून तिची/त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायला तयार होतात. याचा परिणाम कसा होईल, लोक काय म्हणतील याची त्यांना पर्वा नसते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 14:00 IST2021-09-21T13:07:43+5:302021-09-21T14:00:56+5:30

Social Viral : अनेकजण आपल्या पार्टनरला बरं वाटावं म्हणून तिची/त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायला तयार होतात. याचा परिणाम कसा होईल, लोक काय म्हणतील याची त्यांना पर्वा नसते.

Social Viral : Girl sits on boy like chair at railway station platform tiktoker weird photo | रेल्वे स्टेशनवर बसायला जागा नव्हती; मग तीनं चक्क बॉयफ्रेंडलाच खुर्ची बनवलं; फोटो पाहून लोक म्हणाले....

रेल्वे स्टेशनवर बसायला जागा नव्हती; मग तीनं चक्क बॉयफ्रेंडलाच खुर्ची बनवलं; फोटो पाहून लोक म्हणाले....

Highlightsया मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडला बॉय चेअर म्हटलं आहे.  हा व्हिडीओ शूट करण्यात आला तेव्हा रेल्वे स्टेशनवर खूप लोक उपस्थित होते.

प्रेमात अनेक लोक वेडे असतात आणि आपल्या पार्टनरसाठी काहीही करायला तयार होतात हे तुम्ही ऐकून असालच. अनेकजण आपल्या पार्टनरला बरं वाटावं म्हणून तिची/त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायला तयार होतात. याचा परिणाम कसा होईल, लोक काय म्हणतील याची त्यांना पर्वा नसते.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा डोक्याला हात मारून घ्याल. रेल्वे स्टेशनवर माणसांच्या गर्दीमुळे सगळ्यांनाच बसलाला जागा मिळते असं नाही.  यावर उपाय म्हणून एका तरूणीनं चक्क आपल्या बॉयफ्रेंडलाच खर्ची बनवलं आणि त्याच्या पाठीवर बसली आहे. ही मुलगी एक टिकटॉकर असून तिनं एक व्हिडीओसुद्धा शूट केला आहे. 

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार टिकटॉकवर युजरने @sti1es आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला होता. यात दिसत असलेला मुलगा गुडघ्यावर खाली बसला होता जेणेकरून त्यांच्या गर्लफ्रेंडला पाठीवर बसता येईल. ही मुलगीसुद्धा संकोच न बाळगता आरामात त्याच्या पाठीवर बसून फोटो काढत आहे. विशेष म्हणजे एकांतात नाही तर चक्क रेल्वे स्टेशनवर हा प्रकार शूट झाला आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.असला कसला हट्ट? करीना कपूरसारखी आई बाजारातून विकत आणा, वडिलांकडे चिमुकलीचा हट्ट

या तरूणीनं फोटो सोशल मीडियावर अपलोड करताच कमेंट्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली. अमेरिकेच्या  एका प्लॅटफॉर्मवर बसलेली ही मुलगी एक टिकटॉकर आहे. या मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडला बॉय चेअर म्हटलं आहे.  हा व्हिडीओ शूट करण्यात आला तेव्हा रेल्वे स्टेशनवर खूप लोक उपस्थित होते. एक्सेस स्ट्रीट नावाच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.  ही पोस्ट व्हायरल  होताच लोकांनी संतापजनक कमेंट्स करायला सुरूवात  केली आहे.  ज्या डॉक्टरकडून मूल होण्यासाठी ९ वर्ष उपचार घेतले; त्याच्याच शुक्राणूंमुळे बाळाचा जन्म, डॉक्टरवर गुन्हा दाखल

Web Title: Social Viral : Girl sits on boy like chair at railway station platform tiktoker weird photo