lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > ज्या डॉक्टरकडून मूल होण्यासाठी ९ वर्ष उपचार घेतले; त्याच्याच शुक्राणूंमुळे बाळाचा जन्म, डॉक्टरवर गुन्हा दाखल

ज्या डॉक्टरकडून मूल होण्यासाठी ९ वर्ष उपचार घेतले; त्याच्याच शुक्राणूंमुळे बाळाचा जन्म, डॉक्टरवर गुन्हा दाखल

Social Viral : सप्टेंबर १९८५ मध्ये जन्मलेली हेलक्विस्ट खरं समोर आल्यानंतर मानसिक धक्क्यात होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:45 PM2021-09-17T17:45:24+5:302021-09-17T18:08:46+5:30

Social Viral : सप्टेंबर १९८५ मध्ये जन्मलेली हेलक्विस्ट खरं समोर आल्यानंतर मानसिक धक्क्यात होती.

Social Viral : Woman horrified after discovering her gynecologists is her father in america | ज्या डॉक्टरकडून मूल होण्यासाठी ९ वर्ष उपचार घेतले; त्याच्याच शुक्राणूंमुळे बाळाचा जन्म, डॉक्टरवर गुन्हा दाखल

ज्या डॉक्टरकडून मूल होण्यासाठी ९ वर्ष उपचार घेतले; त्याच्याच शुक्राणूंमुळे बाळाचा जन्म, डॉक्टरवर गुन्हा दाखल

सध्याच्या अनियमित जीवनशैलीत अनेक जोडप्यांना मूल होण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात.  शरीरातील पौष्टिक घटकांची कमतरता, हार्मोन्सचे संतुलन बिघडणे, उशीरा लग्न होणं  अशा अनेक कारणांमुळे गर्भधारणा होण्यास विलंब होतो. दरम्यान अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला ९ वर्षांपासून मूल होण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञाकडे उपचार घेत होती. नंतर तिच्या मुलीला कळलं की तिचा जन्म याच डॉक्टराच्या  शुक्राणूंपासून झाला आहे. आता या महिलेनं डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

३५ वर्षांच्या मॉर्गन हेलक्विस्टनं डॉक्टरवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. तिनं केलेल्या दाव्यानुसार ७० वर्षीय स्त्री रोग तज्ज्ञ मॉरिस वोर्टमॅन तिचे वडील आहेत. मिररच्या रिपोर्टनुसार या महिलेनं सांगितलं की, तिचा जन्म कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातून झाला होता आणि डॉक्टर वोर्टमॅननं तिच्या आईला मूल जन्माला घालण्यासाठी शुक्राणू दिले होते. 

रिपोर्टनुसार हेलक्विस्टच्या आई वडीलांना असं माहीत होतं की, ते  शुक्राणू एका मेडीकलच्या विद्यार्थ्याचे आहेत. एप्रिल महिन्यात न्यूयॉर्कच्या रोचेस्टर मध्ये मासिक पाळी विकार केंद्रात वोर्टमॅनची नियुक्ती झाल्यानंतर महिलेला कळलं की तेच तिचे खरे वडील आहेत. 

वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार या तक्रारीत दावा करण्यात आला आहे की, वोर्टमॅनने हेलक्विस्टला अल्ट्रासाऊंड पाहण्यासाठी बोलवले होते. त्यावेळी एका डिएनए परिक्षणानंतर समोर आलं की वोर्टमॅन हेलक्विस्टचे खरे वडील आहेत

सप्टेंबर १९८५ मध्ये जन्मलेली हेलक्विस्ट खरं समोर आल्यानंतर मानसिक धक्क्यात होती. ती म्हणाली की मला आधी माहीत असतं की हेच डॉक्टर माझे वडील आहेत तर मी त्यांच्यांकडे उपचार करायला कधीही  गेली नसती. हेलक्विस्टच्या आईनं १९८० दशकाच्या सुरूवातीला कृत्रिम गर्भधारणा केली होती. कारण एका गंभीर अपघातात हेलक्विस्टच्या वडीलांच्या कमरेच्या  खालचा भाग लकवाग्रस्त झाला होता.  

Web Title: Social Viral : Woman horrified after discovering her gynecologists is her father in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.