lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > उन्हाळ्यात एसी तर लावता पण वीजबिल जास्त येण्याची भीती वाटते? ३ टिप्स- बिल येईल कमी

उन्हाळ्यात एसी तर लावता पण वीजबिल जास्त येण्याची भीती वाटते? ३ टिप्स- बिल येईल कमी

How to Reduce Your AC's Electricity Bills This Summer? : एसीमुळे वाढलेलं वीजबिल पाहून वापरणं टाळताय? वापरा नीट, राहा कूल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 03:03 PM2024-03-27T15:03:26+5:302024-03-27T15:04:39+5:30

How to Reduce Your AC's Electricity Bills This Summer? : एसीमुळे वाढलेलं वीजबिल पाहून वापरणं टाळताय? वापरा नीट, राहा कूल..

How to Reduce Your AC's Electricity Bills This Summer? | उन्हाळ्यात एसी तर लावता पण वीजबिल जास्त येण्याची भीती वाटते? ३ टिप्स- बिल येईल कमी

उन्हाळ्यात एसी तर लावता पण वीजबिल जास्त येण्याची भीती वाटते? ३ टिप्स- बिल येईल कमी

उन्हामुळे जीव नकोसा झालाय? बाहेर पडताच शरीरातून घामाच्या धारा निघतात. पण बाहेरून घरी आल्यानंतर जीव काहीसा भांड्यात पडतो (Summer Special). शरीराला कुल करण्यासाठी आपण पंख्याखाली बसतो. किंवा एसी चालू करतो. परंतु, वाढत्या गर्मीमध्ये एसीची हवा सुखदायी ठरते. पण महिनाभर एसी वापरल्यानंतर वीजबिल पाहिल्यानंतर आणखीन घाम फुटतो तो वेगळाच (Air Conditioner).

एअर कंडिशनरची मागणी सध्या बाजारात वाढली आहे. परंतु, एसीच्या अतिवापरामुळे वीजबिल जास्त येते. म्हणून आपण एअर कंडिशनर कमी किंवा वापरणं टाळतो. वाढत्या बिलाचे टेन्शन घेण्यापेक्षा आपण काही टिप्स फॉलो करू शकता. या टिप्समुळे वीजबिलाचे टेन्शन न घेता, आपण एअर कंडिशनरची हवा एन्जॉय करू शकता(How to Reduce Your AC's Electricity Bills This Summer?).

कमी तापमानात एसी चालवू नका

काही लोकं एसी कायम १६ डिग्री अंशांवर ठेवतात. यामुळे गारवा मिळतो, पण वीजबिलही जास्त येते. एसी कायम २२ ते २४ डिग्री अंशांवर ठेवा. कारण तापमानात प्रत्येक एक अंश वाढ झाल्यास ६ टक्के अधिक विजेची बचत होते. अशा परिस्थितीत १६ अंशांऐवजी २४ अंशांवर एसी चालवल्यास सुमारे ५६ टक्के विजेची बचत होईल.

ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? बीपी लो होते? खा ४ प्रकारचे सुपरफुड्स; तारुण्य टिकेल कायम

योग्य वेळी सर्व्हिसिंग करा

एसी वेळोवेळी सर्व्हिस करत रहा. असे न केल्यास एसीची कूलिंग कमी होते. अशा परिस्थितीत, त्याचे तापमान कमी होईल. ज्यामुळे एसी चालवल्यास वीज बिल जास्त येते. एसी फिल्टर वेळोवेळी स्वच्छ केला पाहिजे. शिवाय आपल्या एसी मॉडेलला किती वेळा सर्व्हिसिंगची आवश्यकता आहे, याची माहिती काढून ठेवा.

व्हिटॅमिन के डेफिशियन्सी तर नाही तुम्हाला? हाडांची कुरकूर-बीपीही वाढते? खा ‘हे’ व्हिटॅमिन केयुक्त पदार्थ

दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा

एसी चालवताना खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावेत. जर खिडक्या आणि दारे बंद असतील तर खोली थंड ठेवण्यासाठी एअर कंडिशनरला कमी कष्ट घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत विजेचा खर्च कमी होतो.

Web Title: How to Reduce Your AC's Electricity Bills This Summer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.