lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > व्हिटॅमिन के डेफिशियन्सी तर नाही तुम्हाला? हाडांची कुरकूर-बीपीही वाढते? खा ‘हे’ व्हिटॅमिन केयुक्त पदार्थ

व्हिटॅमिन के डेफिशियन्सी तर नाही तुम्हाला? हाडांची कुरकूर-बीपीही वाढते? खा ‘हे’ व्हिटॅमिन केयुक्त पदार्थ

Vitamin K: Health benefits, daily intake, and sources : 'व्हिटॅमिन के'चे आरोग्याला फायदे अनेक, कोणत्या पदार्थातून व्हिटॅमिन के मिळते; पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 03:26 PM2024-03-26T15:26:38+5:302024-03-26T15:34:34+5:30

Vitamin K: Health benefits, daily intake, and sources : 'व्हिटॅमिन के'चे आरोग्याला फायदे अनेक, कोणत्या पदार्थातून व्हिटॅमिन के मिळते; पाहा..

Vitamin K: Health benefits, daily intake, and sources | व्हिटॅमिन के डेफिशियन्सी तर नाही तुम्हाला? हाडांची कुरकूर-बीपीही वाढते? खा ‘हे’ व्हिटॅमिन केयुक्त पदार्थ

व्हिटॅमिन के डेफिशियन्सी तर नाही तुम्हाला? हाडांची कुरकूर-बीपीही वाढते? खा ‘हे’ व्हिटॅमिन केयुक्त पदार्थ

निरोगी राहण्यासाठी शरीराला आवश्यक जीवनसत्त्वांची गरज भासते. जीवनसत्त्वे योग्य प्रकारे न मिळाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जीवनसत्त्वांमध्ये 'व्हिटॅमिन के' देखील खूप महत्वाचे आहे (Vitamin K). व्हिटॅमिन केचे फायदे किती? कोणत्या पदार्थातून व्हिटॅमिन के मिळते? असे अनेक प्रश्न आपल्याला देखील पडले असतील.

व्हिटॅमिन के मुळे दुखापत झाल्यास रक्त गोठण्यास आणि रक्तातील कॅल्शियमची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत होते. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले प्रोथ्रोम्बिन नावाचे प्रथिन, व्हिटॅमिन केमुळे तयार होते (Health Benefits). व्हिटॅमिन के चा आणखी एक स्त्रोत म्हणजे व्हिटॅमिन के २. याला मेनाक्विनोन असेही म्हणतात. व्हिटॅमिन केची कमतरता दुर्मिळ आहे. पण आपण काही पदार्थांमधून ही कमतरता दूर करू शकता(Vitamin K: Health benefits, daily intake, and sources).

व्हिटॅमिन केची कमतरता दूर करण्यासाठी कोणते पदार्थ खावे?

केल

पालकाप्रमाणे दिसणारी ही हिरवी पाले भाजी अनेकांनी खाल्ली असेल. केल ही भाजी अगदी सामान्य दिसत असली तरी देखील तिचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळते. शिवाय मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी देखील आहे. एक वाटी केलची भाजी आपल्या शरीराला ६८० टक्के व्हिटॅमिन के पुरवते.

बिना हेल्मेट-ट्रिपल सीट त्यात अश्लील रोमान्स; मुलींनो हे काय वागणं म्हणायचं? -व्हायरल व्हिडिओ

ब्रोकोली

ब्रोकोलीच्या सेवनाने शरीराला एकच नाही तर अनेक फायदे मिळतात. ब्रोकोलीमध्ये फायबर, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम असते. एक कप ब्रोकोली खाल्ल्याने शरीराला दैनंदिन गरजेच्या ९२ टक्के व्हिटॅमिन के मिळते.

पालक

आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालकाचा उल्लेख नक्कीच केला जातो. पालकामध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. एक कप पालकामध्ये १८० टक्के व्हिटॅमिन के आढळते. पालक केवळ व्हिटॅमिन केच नाही तर व्हिटॅमिन ए, आयर्न आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे.

पांढरी मिरी कधी खाऊन पाहिली आहे का? ब्लड प्रेशर ते लठ्ठपणापर्यंतच्या आजारावर खास उपाय, तज्ज्ञ सांगतात..

एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये काही प्रमाणात व्हिटॅमिन के आढळते. यासह त्यात हेल्दी फॅट्स आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे हाडं आणि शरीर निरोगी राहते.

Web Title: Vitamin K: Health benefits, daily intake, and sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.