lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? बीपी लो होते? खा ४ प्रकारचे सुपरफुड्स; तारुण्य टिकेल कायम

ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? बीपी लो होते? खा ४ प्रकारचे सुपरफुड्स; तारुण्य टिकेल कायम

Calcium: Health benefits, foods, and deficiency : कॅल्शियम हाडांची रचना मजबूत करण्यासोबतच इतर अनेक आजारांपासून संरक्षण करते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 02:53 PM2024-03-27T14:53:54+5:302024-03-27T14:54:42+5:30

Calcium: Health benefits, foods, and deficiency : कॅल्शियम हाडांची रचना मजबूत करण्यासोबतच इतर अनेक आजारांपासून संरक्षण करते

Calcium: Health benefits, foods, and deficiency | ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? बीपी लो होते? खा ४ प्रकारचे सुपरफुड्स; तारुण्य टिकेल कायम

ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? बीपी लो होते? खा ४ प्रकारचे सुपरफुड्स; तारुण्य टिकेल कायम

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे नकळत आपण गंभीर आजारांच्या विळख्यात अडकतो. प्रत्येक व्यक्ती कामाच्या व्यापामुळे थकतो. अनेकवेळा हाडेही दुखतात. शरीरात असणाऱ्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे शरीर ठणकून निघते. मुख्य म्हणजे शरीरात असणाऱ्या कॅल्शियमच्या (Calcium Deficiency) कमतरतेमुळे या सगळ्या गोष्टी घडतात. अशा परिस्थितीत मजबूत हाडांसाठी शरीरात कॅल्शियम असणे आवश्यक आहे.

एवढेच नाही तर शरीरातील स्नायू आणि मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. यासह कॅल्शियम दात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करते (Health Care). पण शरीराला कोणत्या पदार्थातून कॅल्शियम मिळेल? शरीराला कॅल्शियम मिळावे यासाठी कोणते पदार्थ खावे? पाहूयात(Calcium: Health benefits, foods, and deficiency).

पनीर

कॅल्शियमचा उत्तम सोर्स पनीर आहे. पनीरचा आहारात समावेश केल्याने हाय ब्लड प्रेशर कण्ट्रोलमध्ये ठेवण्यात यासह हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते. आपण पनीरचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता. किंवा जर आपल्याला वर्कआउटची सवय असेल तर, आपण कच्चे पनीर देखील खाऊ शकता.

कधी ‘चवळी फ्राय’ खाऊन पाहिलं आहे? १० मिनिटांत होणारी चमचमीत रेसिपी, विसराल नेहमीची उसळ

अंजीर

अंजीर हे ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कॅल्शियमसोबतच यामध्ये फायबर आणि पोटॅशियमही मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.

दूध

दूध हे संपूर्ण आहार म्हणून ओळखले जाते. याच्या नियमित सेवनाने आरोग्याला अनेक फायदा होतो. यामुळे पोटाचे अनेक विकार दूर होतात. मुख्य म्हणजे कॅल्शियमची कमतरता दूर ठेवते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. पन्नाशीनंतरही हाडं ठणठणीत राहतात. दूध हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. जर आपल्याला फक्त दूध प्यायला आवडत नसेल तर, आपण त्यात ड्रायफ्रुट्स देखील घालून पिऊ शकता.

व्हिटॅमिन के डेफिशियन्सी तर नाही तुम्हाला? हाडांची कुरकूर-बीपीही वाढते? खा ‘हे’ व्हिटॅमिन केयुक्त पदार्थ

बदाम

बदाम बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी नसून, हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. बदामामध्ये उच्च प्रमाणात कॅल्शियम आढळते जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते. यव्यतिरीक्त त्यात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियमसह अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे आपण रोज ४ बदाम तर खाऊ शकता. 

Web Title: Calcium: Health benefits, foods, and deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.