lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > लॅपटॉप स्वच्छ करताना घ्या ६ गोष्टींची विशेष काळजी, नाहीतर होतील लाखाचे बारा हजार..

लॅपटॉप स्वच्छ करताना घ्या ६ गोष्टींची विशेष काळजी, नाहीतर होतील लाखाचे बारा हजार..

How To Clean Your Laptop at Home : 'गोपी बहु'सारखं लॅपटॉप धुवायला जावू नका, घरीच साफ करत असाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2024 04:55 PM2024-02-04T16:55:47+5:302024-02-04T16:56:16+5:30

How To Clean Your Laptop at Home : 'गोपी बहु'सारखं लॅपटॉप धुवायला जावू नका, घरीच साफ करत असाल तर...

How To Clean Your Laptop at Home | लॅपटॉप स्वच्छ करताना घ्या ६ गोष्टींची विशेष काळजी, नाहीतर होतील लाखाचे बारा हजार..

लॅपटॉप स्वच्छ करताना घ्या ६ गोष्टींची विशेष काळजी, नाहीतर होतील लाखाचे बारा हजार..

आजकाल आपण सगळेच जण लॅपटॉपचा (Laptop) वापर करतो. फार कमी लोकांकडे कॉम्प्युटर सापडेल. प्रोफेनशल आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये लॅपटॉपचा पुरेपूर वापर होतो. शिवाय काही कॉलेजमधील विद्यार्थी अभ्यासासाठी लॅपटॉपचा वापर करतात. लॅपटॉप घेऊन आपण एका जागेपासून दुसऱ्या जागी जाऊ शकतो. वर्क फ्रॉम होम वाढल्यानं अनेकांकडे लॅपटॉप आहेच. पण आठवडाभरात किंवा महिन्यानंतर लॅपटॉप खराब होतो, किंवा त्याची स्क्रीन आणि की-बोर्डमध्ये धूळ जमा होते.

दुकानात लॅपटॉप स्वच्छ करायला दिल्यास ते अधिक पैसे आकारतात (Cleaning Tips). जर आपल्याला घरीच लॅपटॉप स्वच्छ करायचं असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्सच्या मदतीने लॅपटॉप खराब न होता स्वच्छ होईल(How To Clean Your Laptop at Home).

लॅपटॉप स्वच्छ करताना घ्यावयाची काळजी

- आपला लॅपटॉप हा स्वच्छ करायला घेतल्यानंतर तो सर्वप्रथम बंद करा. शक्य असल्यास आपण बॅटरीही काढू शकता.

- लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या केमिकल किंवा अल्कोहोल बेस्ड प्रॉडक्ट्सचा वापर करू नका. लॅपटॉप आणि टीव्हीमध्ये एलसीडी स्क्रीनचा वापर केला जातो. त्यामुळे या उत्पादनांमुळे स्क्रीन खराब होण्याची शक्यता जास्त आहे.

कपड्यांवरचे डाग काढायचा घ्या सोपा फॉर्म्युला, १ चमचा सॅनिटायझरची जादू-न घासता कपडे चकाचक

- लॅपटॉपवर साचलेली धूळ साफ करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर करू नका. यामुळे लॅपटॉपच्या हार्डवेअरचे गंभीर नुकसान होऊ शकते.

- कीबोर्ड स्वच्छ करताना स्प्रेचा वपर करू नका. यामुळे की-बोर्ड खराब होऊ शकते. बऱ्याचदा या कारणामुळे कीबोर्ड तर खराब होतेच शिवाय, त्याची बटणे लवकर काम करत नाहीत.

- लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कपडाचा वापर करा. जर आपल्याकडे हे कापड उपलब्ध नसेल तर, सुती कापडाचा वापर करा. स्क्रीन क्लिन करताना हलक्या हाताने स्क्रीन स्वच्छ करा. थोडे पाणी शिंपडा आणि मग स्क्रीन स्वच्छ करा.

लेकरु धाडकन पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलवर, व्हायरल व्हिडिओ-असा कसा हा नाद?

- की-बोर्ड स्वच्छ करण्यासाठी आपण पेटिंग ब्रशचा वापर करू शकता. या ब्रशच्या मदतीने आपण की-बोर्डमध्ये अडकलेली घाण सहज काढू शकता. शिवाय धूळही साफ करू शकता. 

Web Title: How To Clean Your Laptop at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.