lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > लेकरु धाडकन पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलवर, व्हायरल व्हिडिओ-असा कसा हा नाद?

लेकरु धाडकन पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलवर, व्हायरल व्हिडिओ-असा कसा हा नाद?

Kid Fell On The Platform Woman Continued Dance People Got Angry Watching This Viral Video : मूल प्लॅटफॉर्मवर पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलकडे, हा वेडेपणा नक्की कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2024 01:39 PM2024-02-01T13:39:51+5:302024-02-01T13:40:38+5:30

Kid Fell On The Platform Woman Continued Dance People Got Angry Watching This Viral Video : मूल प्लॅटफॉर्मवर पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलकडे, हा वेडेपणा नक्की कशासाठी?

Kid Fell On The Platform Woman Continued Dance People Got Angry Watching This Viral Video | लेकरु धाडकन पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलवर, व्हायरल व्हिडिओ-असा कसा हा नाद?

लेकरु धाडकन पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलवर, व्हायरल व्हिडिओ-असा कसा हा नाद?

फेमस होण्याच्या नादात कोण कधी काय करेल सांगता येत नाही. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कन्टेंट नसतो. पण मजेशीर असल्यामुळे काही मिनिटात व्हायरल होतात. कधी कोण मेट्रोमध्ये नाच-गाणे करताना दिसतात. तर कोणी रस्त्याच्या मधोमध अनोळखी लोकांसोबत नाचून लोकांच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात. सध्या अशाच एका महिलेने डान्स करून व्हिडिओ तयार केला तर खरा, पण डान्स करण्याच्या नादात बाईला आपलं मुल खाली पडलं असल्याचं देखील भान नसतं. ती आपला डान्स न थांबवता, पुढे नाचत जाते (Viral Video).

महिलेचा डान्स लक्षवेधी तर ठरत आहेच, पण बाळ पडलं तरी, ती डान्स आपला थांबवत नसल्यामुळे ट्रोल होत आहे(Kid Fell On The Platform Woman Continued Dance People Got Angry Watching This Viral Video).

मुलाकडे लक्ष दे की बाई..

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलासोबत प्लॅटफॉर्मवर फिरताना दिसत आहे, आणि नंतर अचानक नाचू लागते. मुलासोबत वडील देखील आहे. ज्याच्या हातात बॅग्ज आहेत. डान्स करत महिला पुढे जाते. दरम्यान, पाठीमागून धावत येणारा तिचा मुलगा खाली पडतो. आपले मूल मागे पडले असल्याची कल्पना तिला नसते. ती नाचत पुढे जाते. याकारणामुळे महिलेला नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात येत आहे.

घरातल्या कुंडीत लावलेली कोरफड विषारी तर नाही? १ गोष्ट तपासा-चटकन कळेल -धोका टळेल

व्हिडिओला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी कमेंट करत ट्रोल केलं आहे. एकाने 'निष्काळजीपणाचा कळस, एवढं रील बनवणे आवश्यक आहे का?', तर दुसऱ्याने 'आपल्या पत्नीचा हा आजार लवकरात लवकर बरा करा.' अशा पद्धतीचे संतापजनक कमेंट करत लोकांनी व्हिडिओला ट्रोल केलं आहे.

Web Title: Kid Fell On The Platform Woman Continued Dance People Got Angry Watching This Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.