lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > How To Chop Vegetables: पटपट भाज्या चिरण्याची पहा सोपी पद्धत! ' अशी' चिरली तर चाकूची धारही होणार नाही कमी

How To Chop Vegetables: पटपट भाज्या चिरण्याची पहा सोपी पद्धत! ' अशी' चिरली तर चाकूची धारही होणार नाही कमी

Chopping Vegetables With Knife: सकाळच्या गडबडीत भाज्या चिरताना अनेकदा चाकू बोटांना कधी लागतो, समजतंही नाही. म्हणूनच तर बघून घ्या एकदा चाकून फटाफट भाज्या चिरण्याची ही खास पद्धत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 01:56 PM2022-04-30T13:56:10+5:302022-04-30T13:56:59+5:30

Chopping Vegetables With Knife: सकाळच्या गडबडीत भाज्या चिरताना अनेकदा चाकू बोटांना कधी लागतो, समजतंही नाही. म्हणूनच तर बघून घ्या एकदा चाकून फटाफट भाज्या चिरण्याची ही खास पद्धत.

How to chop vegetables perfectly, fast and safely without cutting fingers | How To Chop Vegetables: पटपट भाज्या चिरण्याची पहा सोपी पद्धत! ' अशी' चिरली तर चाकूची धारही होणार नाही कमी

How To Chop Vegetables: पटपट भाज्या चिरण्याची पहा सोपी पद्धत! ' अशी' चिरली तर चाकूची धारही होणार नाही कमी

Highlights बोट सांभाळत भाज्या फटाफट चिरायच्या असतील तर काही ट्रिक्स फॉलो करणं गरजेचं आहे.

स्वयंपाक घरातलं एक मुख्य काम म्हणजे भाज्या कापणे.. स्वयंपाक घरात काम करणाऱ्या प्रत्येकीला अगदी नित्यनेमाने दिवसभरातून एकदा तरी हे काम करावंच लागतं. त्यामुळे हे काम अंगवळणी पडतं खरं, पण तरीही भाज्या कापण्याची पद्धत चुकीची असेल तर चाकूची वारंवार धार कमी होणं, आपलं बोट चिरल्या जाणं.. (Chopping Vegetables With Knife without any injury) अशा काही अडचणी येतच असतात. खास करून जेव्हा कांदा आपण अधिकच बारीक कापायला जातो किंवा गाजर, रताळे, भोपळा आणि कडक भाज्या चिरायला जातो, तेव्हा बोट कापण्याचा धोका अधिकच वाढतो. म्हणूनच तर या भाज्या कापायच्या कशा याविषयीचे काही खास व्हिडिओ.. (vegetables chopping technique)

 

१. गाजरासारख्या काही कडक भाज्या चिरताना नेहमीच जरा भीती वाटते. कारण अशा भाज्या कापायच्या म्हणजे चाकूची धारही अगदी चांगली हवी.. आता बोट सांभाळत अशा भाज्या फटाफट चिरायच्या असतील तर काही ट्रिक्स फॉलो करणं गरजेचं आहे. अशा भाज्या चिरताना आपण चाकू साधारणपणे सरळ आडव्या रेषेत धरतो आणि खटकन भाजी चिरण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी चाकू चॉपिंग पॅडवर जोरात आदळतो. त्यामुळे चाकूची धार तर कमी होतेच पण तो बोटाला जोरात लागण्याचीही भीती असते. म्हणूनच अशा कडक भाज्या कापताना चाकू सरळ आडवा न धरता तिरका ठेवा आणि तशाच पद्धतीने खाली ओढून भाजी कापा. 

 

२. पावभाजी, चाट पदार्थ किंवा कोणतीही कोशिंबीर, सलाड यासाठी जेव्हा आपण कांदा कापतो, तेव्हा तो आपल्याला खूप बारीक हवा असतो. असा बारीक कांदा कसा चिरायचा याची एक खास पद्धत या व्हिडिओमध्ये शेअर करण्यात आली आहे. यासाठी कांद्याचं खालचं आणि वरचं टोक काढून घेऊन कांद्याची सालं काढून टाका. त्यानंतर त्याचे चार समान काप करा. यातल्या मोठ्या पाकळ्या वेगळ्या काढून कापा आणि लहान पाकळ्या वेगळ्या कापा. त्या नेमक्या कशा चिरायच्या, हेच सांगणारा हा व्हिडिओ यु ट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. 

 

Web Title: How to chop vegetables perfectly, fast and safely without cutting fingers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.