lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > हृदयस्पर्शी! अंध आई-वडिलांना जेवण भरवणारी लेक पाहून लोकांना आठवला श्रावणबाळ, पाहा व्हिडिओ

हृदयस्पर्शी! अंध आई-वडिलांना जेवण भरवणारी लेक पाहून लोकांना आठवला श्रावणबाळ, पाहा व्हिडिओ

Emotional video of blind parents and a little daughter : व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या आई-वडिलांसाठी श्रावण बाळ बनली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 01:42 PM2022-12-14T13:42:06+5:302022-12-14T18:16:55+5:30

Emotional video of blind parents and a little daughter : व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या आई-वडिलांसाठी श्रावण बाळ बनली आहे.

Emotional video of blind parents and a little daughter went viral on social media | हृदयस्पर्शी! अंध आई-वडिलांना जेवण भरवणारी लेक पाहून लोकांना आठवला श्रावणबाळ, पाहा व्हिडिओ

हृदयस्पर्शी! अंध आई-वडिलांना जेवण भरवणारी लेक पाहून लोकांना आठवला श्रावणबाळ, पाहा व्हिडिओ

असं म्हणतात की मुली नशिबवानांच्या घरी जन्म घेतात. मुलींना लक्ष्मीचं स्वरूप मानलं  जातं. लेक आई-वडिलांच्या प्रत्येक सुखदु:खात कायम पाठिशी उभी असते. अलिकडे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही भरून येईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना त्यांच्या मुलांची आठवण झाली आहे. मन जिंकणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी आपल्या अंध आई वडिलांची  दृष्टी बनली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही सेकंदासाठी तुम्हीही भावूक व्हाल. (Emotional video of blind parents and a little daughter)

जर कुटुंब सोबत असेल तर मोठं संकटही लहान वाटतं असं म्हटलं जातं. सध्याच्या काळात खूश राहणं खूपच  कठीण तितकंच सोपं झालंय सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जे पाहिल्यानंतर डोळे पाणावतात आणि चेहऱ्यावर हास्य येतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचा दिवस आनंदात गेला आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या आई-वडिलांसाठी श्रावण बाळ बनली आहे. आज खूप कमी लोक असे आहेत, जे आपल्या पालकांना आधार देतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाळेच्या गणवेशामध्ये दिसणारी मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत एका स्टॉलवर बसून फास्ट फूड खाताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी ती मुलगी दोघांनाही हात धरून सोबत घेऊन जाते.

'दिखता नही क्या!' स्कूटी चालवताना तिनं बाईकला जोरदार धडक दिली; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले..

सोशल मीडियावर हा व्हिडिओ @Gulzar_sahab  या अकाऊंटवरून शेअर  करण्यात आला आहे. आतापर्यंत ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला  असून आतापर्यंत १ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Web Title: Emotional video of blind parents and a little daughter went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.