Lokmat Sakhi >Social Viral > डस्टबीनमधून येणारा वास घरभर पसरतो, कचरापेटी साफ ठेवण्याची १ सोपी युक्ती

डस्टबीनमधून येणारा वास घरभर पसरतो, कचरापेटी साफ ठेवण्याची १ सोपी युक्ती

Easy Trick to Clean and maintain Dustbin properly : ओला कचरा बंद पेटीत कुजत असल्याने हा वास अनेकदा आपल्याला नकोसा होणारा असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 02:20 PM2023-12-15T14:20:10+5:302023-12-15T15:17:52+5:30

Easy Trick to Clean and maintain Dustbin properly : ओला कचरा बंद पेटीत कुजत असल्याने हा वास अनेकदा आपल्याला नकोसा होणारा असतो.

Easy Trick to Clean and maintain Dustbin properly : The smell from the dustbin spreads throughout the house, 1 easy trick to keep the dustbin clean | डस्टबीनमधून येणारा वास घरभर पसरतो, कचरापेटी साफ ठेवण्याची १ सोपी युक्ती

डस्टबीनमधून येणारा वास घरभर पसरतो, कचरापेटी साफ ठेवण्याची १ सोपी युक्ती

कचरापेटी किंवा डस्टबिन ही आपल्या घरातील एक महत्त्वाची गोष्ट असते. घरातील सगळ्या प्रकारचा कचरा एकत्रित साठवण्याची जागा असल्याने आपण हा डस्टबिन एकतर गॅलरीत ठेवतो किंवा दाराच्या बाहेर ठेवतो. कचऱ्याचा वास येऊ नये, तो इकडे तिकडे उडू नये हाच त्यामागचा उद्देश असतो. अनेकांकडे ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा केला जातो. मात्र काही ठिकाणी अजूनही हे दोन्ही प्रकारचे कचरे एकाच ठिकाणी साठवले जातात. ओला कचरा, डायपर, अन्नपदार्थ जास्त काळ कचरापेटीत राहीले तर नकळत त्याचा वास यायला लागतो. ओला कचरा बंद पेटीत कुजत असल्याने हा वास अनेकदा आपल्याला नकोसा होणारा असतो (Easy Trick to Clean and maintain Dustbin properly). 

इतकेच नाही तर कचऱ्यामुळे  या कचरापेटीवर माश्या आणि चिलटं घोंगावतात. ही पेटी घरात असेल तर आरोग्याच्या दृष्टीने ते अजिबात चांगले नसते. मग कचरा लवकरात लवकर घराबाहेर टाकणे आणि कचरापेटी साफ करणे अशा २ महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. सतत अशाप्रकारे कचरापेटी स्वच्छ करायला आपल्या हाताशी पुरेसा वेळ असतोच असे नाही. म्हणूनच कचरापेटीतून घाण वास येऊ नये आणि ती स्वच्छ राहावी यासाठी नेमके काय करायचे याची सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. ही ट्रिक कोणती आणि ती कशी वापरायची पाहूया..  

१. सगळ्यात आधी कचरापेटी स्वच्छ धुवायची आणि पूर्ण कोरडी करायची.

२. त्यानंतर डब्याच्या आत खाली रद्दी पेपर घालायचा, त्यामुळे डब्यात ओलावा राहीला असेल तर तो शोषला जाण्यास मदत होईल. 

३. या पेपरवर २ ते ३ चमचे बेकींग सोडा नीट पसरुन घालायचा.

४. मग यावर नेहमीप्रमाणे डस्टबिन बॅग लावायची, बेकींग सोड्यामुळे ओल्या कचऱ्याचा वास दबला जाण्यास मदत होते.    

Web Title: Easy Trick to Clean and maintain Dustbin properly : The smell from the dustbin spreads throughout the house, 1 easy trick to keep the dustbin clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.