Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > स्क्रीनला 'बाय', झोपेला म्हणा 'हाय'; Gen Z मध्ये 'डिजिटल सनसेट'ची क्रेझ; काय आहे हा नवा ट्रेंड?

स्क्रीनला 'बाय', झोपेला म्हणा 'हाय'; Gen Z मध्ये 'डिजिटल सनसेट'ची क्रेझ; काय आहे हा नवा ट्रेंड?

Digital Sunset : सध्या 'Gen Z' मध्ये एक खास ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे, ज्याचं नाव आहे 'डिजिटल सनसेट'. नोकरी करणारे तरुण असोत वा कॉलेजचे विद्यार्थी, सर्वजण हा ट्रेंड स्वीकारत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:09 IST2026-02-26T13:09:11+5:302026-02-26T13:09:58+5:30

Digital Sunset : सध्या 'Gen Z' मध्ये एक खास ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे, ज्याचं नाव आहे 'डिजिटल सनसेट'. नोकरी करणारे तरुण असोत वा कॉलेजचे विद्यार्थी, सर्वजण हा ट्रेंड स्वीकारत आहेत.

digital sunset gen z viral trend improve sleep quality digital sunset benefits | स्क्रीनला 'बाय', झोपेला म्हणा 'हाय'; Gen Z मध्ये 'डिजिटल सनसेट'ची क्रेझ; काय आहे हा नवा ट्रेंड?

स्क्रीनला 'बाय', झोपेला म्हणा 'हाय'; Gen Z मध्ये 'डिजिटल सनसेट'ची क्रेझ; काय आहे हा नवा ट्रेंड?

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक अनेकदा झोपेच्या समस्येने त्रस्त आहेत, ज्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्क्रीनचा (मोबाईल, लॅपटॉप) अतिवापर. रात्रीच्या वेळी स्क्रीनमधून निघणारा 'ब्लू लाईट' आपल्या मेंदूला सक्रिय ठेवतो, ज्यामुळे झोप उशिरा येते आणि आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत सध्या 'Gen Z' मध्ये एक खास ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे, ज्याचं नाव आहे 'डिजिटल सनसेट'. नोकरी करणारे तरुण असोत वा कॉलेजचे विद्यार्थी, सर्वजण हा ट्रेंड स्वीकारत आहेत. यामुळे कुटुंबासाठीचा वेळ वाढत असून लोकांना स्वतःसाठीही वेळ काढता येत आहे.

'डिजिटल सनसेट' म्हणजे काय?

रात्री झोपण्यापूर्वी काही तास आधी मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या डिव्हाईसची स्क्रीन बंद करणं म्हणजेच 'डिजिटल सनसेट'. यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. Gen Z हा ट्रेंड फॉलो करून आपला ताण कमी करण्याचा आणि स्वतःला 'रिचार्ज' करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या तरुणांना रात्री उशिरापर्यंत रील्स स्क्रोल करण्याची सवय लागली आहे त्यांच्यात हा ट्रेंड अधिक लोकप्रिय होत आहे. यामध्ये लोक झोपण्याच्या एक ते दोन तास आधी फोन सायलेंट करून स्वतःपासून दूर ठेवतात. या काळात काही जण पुस्तक वाचतात, तर काही जण मेडिटेशन करतात किंवा सॉफ्ट म्युझिक ऐकतात. अनेकजण या वेळेत आपल्या कुटुंबासोबत गप्पा मारण्याला प्राधान्य देत आहेत.

शांत झोपेसाठी फायदेशीर

डिजिटल सनसेटचा अवलंब करणाऱ्या अनेक लोकांचं असं मत आहे की, यामुळे शरीराचे नैसर्गिक झोपेचे चक्र (स्लीप सायकल) सुधारतं. अनेक तरुणांनी सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर करताना सांगितलं की, यामुळे त्यांना आता लवकर झोप लागते आणि सकाळी उठल्यावर जास्त फ्रेश वाटतं. डिजिटल सनसेट केवळ झोपेसाठीच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानला जात आहे.

गरजेचा आहे बदल

दररोज झोपण्यापूर्वी सतत स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांची जळजळ आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या वाढतात. अनेकदा डोळ्यांतून पाणीही येऊ लागतं. जेव्हा तुम्ही स्क्रीनपासून अंतर ठेवता, तेव्हा डोळ्यांना विश्रांती मिळते आणि मन शांत राहतं. स्क्रीनच्या जगापासून थोडे दूर राहून जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, तेव्हा आयुष्य अधिक संतुलित आणि आनंदी वाटतं. हा छोटासा बदल तुमची झोप आणि आरोग्य दोन्ही सुधारण्यास मदत करू शकतो.

Web Title : Gen Z बेहतर नींद और सेहत के लिए 'डिजिटल सनसेट' अपना रहा है।

Web Summary : Gen Z 'डिजिटल सनसेट' अपना रहा है—सोने से पहले स्क्रीन से दूर रहना। यह प्रवृत्ति नींद की गुणवत्ता में सुधार करती है, तनाव कम करती है और पारिवारिक समय को बढ़ावा देती है। यह ब्लू लाइट के प्रभावों का मुकाबला करता है, विश्राम और एक स्वस्थ जीवन शैली को बढ़ावा देता है।

Web Title : Gen Z embraces 'Digital Sunset' trend for better sleep and well-being.

Web Summary : Gen Z is adopting 'Digital Sunset'—unplugging from screens before bed. This trend improves sleep quality, reduces stress, and fosters family time. It combats blue light's effects, promoting relaxation and a healthier lifestyle by prioritizing rest and mental well-being.