उंची कमी असो वा जास्त, बॉडी टाइपनुसार निवडा 'परफेक्ट' टॉप; दिसाल अधिक स्टायलिश- अट्रॅक्टिव्ह, पाहा तुमच्यासाठी बेस्ट काय?
Updated:April 5, 2026 19:00 IST2026-04-05T19:00:00+5:302026-04-05T19:00:02+5:30
Clothing tips to look slim and tall: Choosing the right neckline for your body type: आपल्या बॉडीनुसार परफेक्ट टॉप कसे निवडायला हवे पाहूया.

आपली उंची कमी किंवा जास्त असल्यास आणि चुकीच्या पद्धतीने कपडे घातल्यास आपल्याला ते अनेकदा शोभत नाही. योग्य टॉपची निवड केल्यामुळे तुमचे खांदे, कंबर आणि उंची यांचा योग्य समतोल दिसतो, ज्यामुळे तुम्ही अधिक स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसता. मग आपला आकार 'अॅपल' असो, 'पिअर' असो वा 'आवरग्लास', फॅशनच्या जगात प्रत्येकासाठी काहीतरी खास असते.(Clothing tips to look slim and tall)
कपड्यांची फॅशन जरी रोज बदलत असली तरीपण आपल्या शरीराच्या ठेवणीनुसार योग्य कपडे निवडले, तर आपण कोणत्याही गर्दीत उठून दिसू शकतो. अनेकदा आपण महागडे टॉप्स विकत घेतो, पण ते आपल्याला शोभून दिसत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे ते आपल्या बॉडी टाइपला साजेसे नसतात. शरीरयष्टीनुसार परफेक्ट टॉप कसे निवडायला हवे पाहूया. (Choosing the right neckline for your body type)
आपली बॉडी अॅपल शेप असेल तर V-neck' असलेले टॉप्स चांगले आहेत. तसेच ए-लाईन किंवा एम्पायर वेस्ट टॉप्स ट्राय करा. खूप घट्ट टॉप्स घालणं टाळा.
पिअर शेप बॉडीमध्ये हिप्स रुंद आणि खांदे अरुंद असतात. यांच्यासाठी बोट नेक, ऑफ शोल्डर किंवा रफल्ड टॉप्स छान दिसतील. गडद रंगाची पॅन्ट आणि फिकट रंगाचे प्रिटेंड टॉप्स निवडा.
आवरग्लास बॉडीमध्ये खांदे आणि हिप्स समप्रमाणात असतात. कंबर बारीक असते. हा परफेक्ट बॉडी शेप मानला जातो. यांना पेपलम किंवा शरीराला चिकटून बसणारे टॉप्स छान दिसतात. क्रॉप-टॉप देखील निवडू शकता. कमरेला बेल्ट लावून कर्व्सना हायलाईट करू शकता.
चौकोनी किंवा स्लिम बॉडी असणाऱ्यांचे हिप्स, खांदे आणि कंबर एकाच रेषेत असते. यांच्या शरीराला जास्त कर्व्स नसतात. फ्रिल्स, लेस किंवा भरपूर डिझाईन असलेले टॉप्स निवडा. स्वीटहार्ट नेकलाईन असलेले टॉप्स चांगला पर्याय आहे. कमरेला फिटिंग असलेले पण खाली घेर असलेले टॉप्स स्टायलिश लूक देतात.