lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > मेट्रोमध्ये बसायला जागा दिली नाही; बाळाला घेऊन खाली बसली माऊली, IAS अधिकारी भडकून म्हणाले.....

मेट्रोमध्ये बसायला जागा दिली नाही; बाळाला घेऊन खाली बसली माऊली, IAS अधिकारी भडकून म्हणाले.....

Delhi Metro Woman Sat On The Ground : 'तुमची पदवी फक्त कागदाचा तुकडा आहे, जर तुमच्या वागण्यात ती दिसत नसेल.'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 03:12 PM2022-06-21T15:12:59+5:302022-06-21T15:36:06+5:30

Delhi Metro Woman Sat On The Ground : 'तुमची पदवी फक्त कागदाचा तुकडा आहे, जर तुमच्या वागण्यात ती दिसत नसेल.'

Delhi Metro Woman Sat On The Ground : Delhi metro woman sat on the ground with the child ias tweet goes viral | मेट्रोमध्ये बसायला जागा दिली नाही; बाळाला घेऊन खाली बसली माऊली, IAS अधिकारी भडकून म्हणाले.....

मेट्रोमध्ये बसायला जागा दिली नाही; बाळाला घेऊन खाली बसली माऊली, IAS अधिकारी भडकून म्हणाले.....

समाजाच्या उदासीनतेवर प्रकाश टाकणारा आणि  माणुसकीला काळीम फासणारा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक महिला मेट्रोमध्ये जमिनीवर बसलेली आहे तर इतर प्रवासी सीटवर बसलेले दिसत आहेत. व्हिडिओवरून असे दिसते की महिलेला कोणीही सीट देऊ केली नाही आणि तिला जमिनीवर बसावे लागले. दरम्यान, इतर प्रवासी त्यांच्या जागेवर आरामात बसले आहेत. (Delhi metro woman sat on the ground with the child ias tweet goes viral) हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत आयएएस अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमची पदवी फक्त कागदाचा तुकडा आहे, जर तुमच्या वागण्यात ती दिसत नसेल.' (Delhi Metro Woman Sat On The Ground)

या व्हिडिओने ट्विटरवर खळबळ उडवली आहे. बर्‍याच लोकांनी सांगितले की आजकाल लोकांना त्यांच्या सोबंतींबद्दल दया वाटत नाही. भारतीय कवी आणि पत्रकार प्रितिश नंदी यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले की, 'आम्ही कोलकात्यात लहानाचे मोठे झालो, आम्हाला नेहमी उभं राहायला आणि आमची सीट  महिलांना द्यायला शिकवलं, त्या महिलेजवळ मूल असो, ती वृद्ध किंवा तरुण असो किंवा अपंग. आमच्या काळी याला शिष्टाचार म्हटले जायचे.'

डोअरला उभं राहून हात बाहेर काढणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

मात्र, एका व्यक्तीने या व्हायरल व्हिडिओची दुसरी बाजू शेअर करत हा जुना व्हिडिओ असल्याचे सांगितले. यापूर्वी हे स्पष्ट करण्यात आले होते की त्या महिलेला अनेक लोकांनी बसण्याची ऑफर दिली होती, परंतु तिने नकार दिला आणि तिने जमिनीवर बसणे पसंत केले. कारण  तिला मांडीवर बाळाला घेऊन बसणं जास्त आरामदायक वाटत होतं.

नादच खुळा! सुपरबाईक घेऊन रस्त्यावर उतरल्या आजी; व्हायरल होतोय 'कूल आजीं'चा फोटो

दुसर्‍या युजरने असेच मत मांडले आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिले, 'पण प्रवाशांनी तिला जागा दिली नाही ते आम्हाला कसे कळेल? या फोटोत पूर्ण सत्यता असेलच असं नाही. कदाचित ती आई जमिनीवर अधिक आरामात बसली असेल आणि त्या स्थितीत सीटवर बसण्यास नकार देईल? मला अजूनही वाटते की माणुसकी टिकली आहे आणि किमान एका व्यक्तीने तरी सीटची विचारणा केली असेल.'

Web Title: Delhi Metro Woman Sat On The Ground : Delhi metro woman sat on the ground with the child ias tweet goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.