lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > लग्नात नवरीचा पाणीपुरीवर ताव! पाणीपुरी महत्त्वाची, लग्न असलं म्हणून काय झालं, पाहा व्हायरल व्हिडिओ

लग्नात नवरीचा पाणीपुरीवर ताव! पाणीपुरी महत्त्वाची, लग्न असलं म्हणून काय झालं, पाहा व्हायरल व्हिडिओ

पाणीपुरीला कशाचीच तोड नाही, स्वत:चं लग्न असू नाहीतर आणखी काही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 05:55 PM2022-01-01T17:55:33+5:302022-01-01T18:07:15+5:30

पाणीपुरीला कशाचीच तोड नाही, स्वत:चं लग्न असू नाहीतर आणखी काही...

Bride's eating Panipuri in marriage! Panipuri is important, what happened even though its marriage, watch the viral video | लग्नात नवरीचा पाणीपुरीवर ताव! पाणीपुरी महत्त्वाची, लग्न असलं म्हणून काय झालं, पाहा व्हायरल व्हिडिओ

लग्नात नवरीचा पाणीपुरीवर ताव! पाणीपुरी महत्त्वाची, लग्न असलं म्हणून काय झालं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Highlightsपाणीपुरी प्रेम, स्वत:च्या लग्नातही नवरी मारतीये तावपाणीपुरीला कशाचीच तोड नाही, हातात कटोरी घेऊन नवरी लग्नात खातीये मनसोक्त पाणीपुरी

पाणी पुरी म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. पाणीपुरीसाठी रस्त्यावर रांगा लावणारे लोक आपण अनेकदा पाहिले असतील. यातही तरुणींना पाणीपुरीचे असणारे वेड आपण नेहमीच पाहतो. लग्नातही हल्ली वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतात आणि याठिकाणी पाणीपुरीच्या स्टॉलभोवती भरपूर गर्दी किंवा रांग असलेली पाहायला मिळते. आता लग्नाला आलेल्या लोकांनी पाणीपुरी खाण्यासाठी गर्दी केली तर ठिक आहे हो. पण चक्क एका नवरीनेच आपल्या लग्नात पाणीपुरीवर ताव मारला. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेक तरुणी तिच्यात आपल्याला पाहात असल्याचे दिसते. या नवरीचे नाव महिमा अगरवाल असून तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ती लिहीते, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कोणी हे नाही सांगितले की मला पाणीपुरी किती आवडते. लग्नाच्या लाल रंगाच्या भरजरी लेहंग्यामध्ये महिमा एकामागे एक पाणीपुरी खाताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवरीचे किंवा नवरा नवरीचे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले असून नेटीझन्स यावर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसतात.

इतकेच नाही तिच्या हातातील बोलमध्ये एक पाणीपुरी दिल्यावर तिच्या बाजूला उभ्या असणाऱ्या तिच्या नवऱ्याला ती म्हणते, ही घे ही पीठापासून केलेली आहे, मला नको असे म्हटल्यावर  मागून अनेकांचा हसण्याचा आवाजही येतो. काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ १७ लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की ५० हजार जणांनी तो लाइक केला आहे. या व्हिडिओला नेटीझन्सचे भरपूर प्रेम मिळत असून त्यावर असंख्य प्रतिक्रियाही येत आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नात डुलक्या घेणारी एक नवरी बरीच व्हायरल झाली होती. तर मेकअप करताना मॅगी खाणाऱ्या एका नवरीचाही व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. दुल्हा वेट करेगा म्हणत भूक लागल्याने ही नवरी मॅगी खाताना दिसत होती. तर लग्नात पुशअप्स करणारी नवरीही बरीच चर्चेचा विषय ठरली होती. 

Web Title: Bride's eating Panipuri in marriage! Panipuri is important, what happened even though its marriage, watch the viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.