Lokmat Sakhi >Social Viral > कमाल! ऑस्ट्रेलियन तरुणीनं १० मिनिटात बनवली 'भेळपुरी'; भेळ चाखून पाहताच परिक्षक म्हणाले...

कमाल! ऑस्ट्रेलियन तरुणीनं १० मिनिटात बनवली 'भेळपुरी'; भेळ चाखून पाहताच परिक्षक म्हणाले...

Australian Girl Made Bhelpuri In 10 minutes : हा नाश्ता भारतीयांसाठी अतिशय सामान्य आहे परंतु या डिशने मास्टरशेफ परिक्षकांना थक्क केले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 01:30 PM2022-06-13T13:30:10+5:302022-06-13T16:08:10+5:30

Australian Girl Made Bhelpuri In 10 minutes : हा नाश्ता भारतीयांसाठी अतिशय सामान्य आहे परंतु या डिशने मास्टरशेफ परिक्षकांना थक्क केले.  

Australian girl made bhelpuri in 10 minutes judge says how to make tell me also | कमाल! ऑस्ट्रेलियन तरुणीनं १० मिनिटात बनवली 'भेळपुरी'; भेळ चाखून पाहताच परिक्षक म्हणाले...

कमाल! ऑस्ट्रेलियन तरुणीनं १० मिनिटात बनवली 'भेळपुरी'; भेळ चाखून पाहताच परिक्षक म्हणाले...

भारतीय जेवणामुळे जगभरातील प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटते हे एक-दोनदा नव्हे तर अनेक वेळा सिद्ध झाले आहे. तुम्ही जगाच्या कोणत्याही भागात वास्तव्यास असलात तरी तुम्हाला भारतातील अन्नाची चव नक्कीच आवडेल. मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाच्या बाबतीतही असेच होते. शोच्या परिक्षकांना भेळ हा भारतीय पदार्थ तुफान आवडला. ज्याचा आपण संध्याकाळच्यावेळी अनेकदा आनंद घेतो. हा नाश्ता भारतीयांसाठी अतिशय सामान्य आहे परंतु या डिशने मास्टरशेफ परिक्षकांना थक्क केले.  (Australian girl made bhelpuri in 10 minutes judge says how to make tell me also)

स्पर्धक सारा टॉडने शोच्या एका फेरीत भेळपुरी बनवली, ज्यासाठी तिला सर्व गोष्टी जलद पूर्ण कराव्या लागल्या. भेळपुरी किती स्वादिष्ट असते हे सर्वांनाच माहीत आहे आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही.   ही अप्रतिम डिश बहुतेक भारतीयांसाठी आवडता हा नाश्ता आहे ज्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. असाच काहीसा प्रकार मास्टरशेफ ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळाला.

कोण आहे सारा?

सारा एक भारतीय ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी शेफ आहे. ती शोच्या या १६व्या सीझनमध्ये काही भारतीय स्वादिष्ट पदार्थांसह परिक्षकांना थक्क करण्यासाठी परत आली आहे. तिने तिची संपूर्ण कहाणी त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. शोमधील तिचे फोटो शेअर करताना तिने पोस्टला कॅप्शन दिले की, परिक्षकांनी तिला 10 मिनिटांत एक स्वादिष्ट पदार्थ कसा बनवायला सांगितला आणि प्रथम भेळपुरी तिच्या मनात आली.

'आता याचं कोणीच बिघडवू शकत नाही'! पोराला नजर लागू नये म्हणून आजींचा जुगाड, पाहा व्हिडिओ

चाचणी घेताच ते म्हणाले 10 मिनिटे झाली आहेत. इतका चविष्ट पदार्थ कसा बनवला हे आम्हाला पण जाणून घ्यायचे आहे असं परिक्षक साराला म्हणाले, दरम्यान सोशल मीडियावर सारावर अभिमानास्पद कमेंट्ससह कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Web Title: Australian girl made bhelpuri in 10 minutes judge says how to make tell me also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.