Lokmat Sakhi >Relationship > ४२ वर्षांनी  प्रियकर रुग्णालयात दिसला; त्याला पाहताच ती जोरजोरात रडली अन् मग....

४२ वर्षांनी  प्रियकर रुग्णालयात दिसला; त्याला पाहताच ती जोरजोरात रडली अन् मग....

Elderly Woman Wept After Seeing Lover In Hospital After 42 Year : अमेरिकन मॅगजिन पिपलच्या वृत्तानुसार या दोघांचीही नाव स्टिफन वॅट्स आणि जीन वॅट्स अशी आहेत.  ते अमेरिकेचे रहिवासी आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 01:00 PM2023-02-05T13:00:24+5:302023-02-05T13:08:23+5:30

Elderly Woman Wept After Seeing Lover In Hospital After 42 Year : अमेरिकन मॅगजिन पिपलच्या वृत्तानुसार या दोघांचीही नाव स्टिफन वॅट्स आणि जीन वॅट्स अशी आहेत.  ते अमेरिकेचे रहिवासी आहेत.  

Elderly Woman Wept After Seeing Lover In Hospital After 42 Years, Both Married In Old Age | ४२ वर्षांनी  प्रियकर रुग्णालयात दिसला; त्याला पाहताच ती जोरजोरात रडली अन् मग....

४२ वर्षांनी  प्रियकर रुग्णालयात दिसला; त्याला पाहताच ती जोरजोरात रडली अन् मग....

सोशल मीडियावर ४२ वर्षांपूर्वी वेगळ्या झालेल्या एका कपल्सची लव्हस्टोरी व्हायरल होत आहे.  जवळपास  ४ दशकांनंतर त्यांची भेट झाली आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. त्याची पहिली भेट १९७१ साली महाविद्यालयात झाली होती. या दोघांनी एकमेकांना ७ वर्ष डेट केलं. (Elderly Woman Wept After Seeing Lover In Hospital After 42 Years, Both Married In Old Age)

अमेरिकन मॅगजिन पिपलच्या वृत्तानुसार या दोघांचीही नाव स्टिफन वॅट्स आणि जीन वॅट्स अशी आहेत.  ते अमेरिकेचे रहिवासी आहेत.  जीन ६९ वर्षांची असून स्टिफन ७१ वर्षांचा आहे. सुरूवातीच्या काही भेटींमध्ये त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

जीननं स्टिफनवर आपलं प्रेम असल्याचं सांगितलं. पण त्यावेळी त्या दोघांच्याही घरचे लोक लग्नासाठी तयार नव्हते. जीनच्या आईनं आंतरजातीय संबंधांसाठी विरोध केला आणि लग्नासाठी नकार दिला. यानंतरही दोघांनी एकमेकांना भेटणं बंद केलं नाही.

७ वर्ष एकमेकांना डेट केलं. नोकरी लागल्यानंतर ते वेगवेगळ्या शहरांमध्ये शिफ्ट झाले. त्यावेळी नातं टिकवून ठेवणं अवघड झालं. एक दिवस स्टिफनला फोन करून जीन म्हणाली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मी घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही.

जीनची स्थिती समजून घेत स्टिफननं तिच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. ४० वर्षांनी त्याला पाहिल्यानंतर जीन भावूक होऊन रडायला लागली. २०२१ मध्ये पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर जीन एकटी राहत होती. याचवेळी तिला स्टिफनचा पत्ता मिळाला.

त्याला भेटण्यासाठी शिकागोमध्ये पोहोचल्यानंतर तिला कळलं की तो रुग्णालयात अडमीट आहे. जीन स्टिफनला आपल्या घरी घेऊन आली. स्टिफनला कोणतेही अपत्य नव्हते. ब्रेन स्ट्रोक झाल्यापासून तो व्हिलचेअरवरच आहे.  अलिकडेच  स्टिफननं आपलं लहानपणीचं प्रेम स्टिफनशी लग्न केलं. आता हे दोघंही आनंदानं राहात आहेत. 

Web Title: Elderly Woman Wept After Seeing Lover In Hospital After 42 Years, Both Married In Old Age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.