1 / 7वजन वाढीची समस्या सगळ्यांनाचं सतावते. वजन कमी करण्यासाठी (Cold Water Drinking Tip To Include In Your Daily Routine For Effective Weight Loss) एक्सरसाइज व डाएट सोबतच हायड्रेटेड राहणे देखील महत्वाचे असते. हायड्रेटेड राहण्यासाठी आपण भरपूर पाणी पितो. सध्या उन्हाळा सुरु असल्याने आपण शक्यतो थंड पाणी पिणे पसंत करतो. थंड पाणी पिण्याने उन्हाळ्यात थंडावा मिळत असला तरी देखील थंड पाणी पिण्याने आपले वजन वाढते असा अनेकांचा समज असतो. 2 / 7वारंवार थंड पाणी पिण्याने आपले वजन वाढते (Drink Cold water this way to burn calories & lose weight) याचबरोबर चयापचय क्रियेचा वेग मंदावतो, असे समज करून घेतले आहेत. परंतु याउलट, जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा शरीराला ते पाणी सामान्य तापमानापर्यंत आणण्यासाठी थोडी अतिरिक्त ऊर्जा (कॅलरीज) खर्च करावी लागते. ही प्रक्रिया प्रत्यक्षात तुमच्या चयापचयाला थोडा वेग देते, ज्यामुळे थंड पाणी पिण्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. 3 / 7२००३ मध्ये 'द जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजी अँड मेटाबोलिझम' मध्ये प्रकाशित झालेल्या ( Cold Water for Weight LOSS) एका अभ्यासानुसार, ५०० मिली थंड पाणी पिण्याने चयापचय क्रियेचा दर ३० टक्क्यांनी वाढू शकतो, जो एका तासापेक्षा जास्त काळ टिकतो. नियमितपणे याच उपायाची पुनरावृत्ती केल्यास, कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित करण्यास थंड पाणी पिण्याची सवय फायदेशीर ठरते. 4 / 7जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता, तेव्हा ते शरीराचे अंतर्गत तापमान (सामान्यतः सुमारे ३७°C) थोड कमी करते. शरीर पुन्हा तेच तापमान राखण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करते. ही प्रक्रिया थर्मोजेनेसिस (Thermogenesis) म्हणून ओळखली जाते. या प्रक्रियेमध्ये शरीर उष्णता निर्माण करण्यासाठी कॅलरीज खर्च करते, म्हणजेच आपल्या शरीरातील ऊर्जा जळते.5 / 7थंड पाणी पिणे हा वजन कमी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग असू शकतो. थंड पाणी चयापचय क्रियेचा वेग वाढवते, ज्यामुळे शरीर जास्त कॅलरीज बर्न करते. जेवणापूर्वी एक ग्लास थंड पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे कमी खाल्ले जाते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते, ज्यामुळे पचन सुरळीत होण्यास मदत होते.6 / 7वजन कमी करण्यासाठी थंड पाणी पिण्याची योग्य पद्धत आहे. सकाळी उठल्यावर १ ते २ ग्लास थंड पाणी प्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात लिंबू पिळून देखील पिऊ शकता, हे पेय मूत्रपिंडातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. जेवणाच्या २० ते ३० मिनिटे आधी ५०० मिली थंड पाणी प्या, जेणेकरून भूक नियंत्रित राहील. याचबरोबर २.५ ते ३ लिटर पाणी दिवसभरात लहान - लहान घोट घेत पीत राहा. 7 / 7जास्त थंड पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. किडनी किंवा हृदय रोग्यांनी थंड पाणी पिण्याबाबत आणि पाण्याच्या प्रमाणाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्हाला थंड पाण्याची एलर्जी असेल तर नेहमीचे सामान्य तापमान असणारे पाणी प्यावे.